‘मन कस्तुरी रे’ या आगामी चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये अभिनय आणि तेजस्वी सध्या व्यग्र आहेत. नुकतंच पिल्लई एज्युकेशन कॅम्पसमध्ये या चित्रपटाचा लॉन्चिंग सोहळा पार पडला. हा सोहळा फारच धमाकेदार झालेला पाहायला मिळाला. विशेष म्हणजे अभिनय आणि तेजस्वीने ढोल वाजवत या सोहळ्यासाठी हजेरी लावली होती. या दोघांनी ढोल पथकाच्या तालावर ताल धरत तुफान नृत्यदेखील केलं. या दोघांचे कार्यक्रमादरम्यानचे व्हिडीओ आणि फोटो सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत.
(हे वाचा: तेजस्वी प्रकाशच्या मराठी सिनेमाचं गाणं रिलीज; दणकून नाचली अभिनेत्री, Video व्हायरल)

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओंवर प्रचंड लाईक्स आणि कमेंट्स केल्या जात आहेत. सोबतच अभिनयनेसुद्धा कार्यक्रमादरम्यानचा आपल्या डान्सचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. इतकंच नव्हे तर डान्स करत असताना अभिनयच्या तोंडात काहीतरी असल्याचं जाणवत आहे. तो काहीतरी चघळताना दिसून येत आहे. हीच बाब ध्यानात घेत एका नेटकऱ्याने अभिनयला ट्रोल करण्याचा प्रयत्न केला आहे.
अभिनयचा हा इन्स्टाग्राम व्हिडीओ पाहून नेटकऱ्याने कमेंट करत म्हटलंय, ‘तू मावा खातोस का?’ यावर आपल्या हटके अंदाजात उत्तर देत अभिनयने म्हटलं, ‘तोंड संभाळून बोला… मावा खात नाही पण मवाली आहे मी’. अशा तिखट शब्दांत प्रत्युत्तर देत अभिनयने नेटकऱ्याच तोंड बंद केलं आहे. सध्या अभिनची ही प्रतिक्रिया प्रचंड चर्चेत आली आहे. येत्या 4 नोव्हेंबरला ‘मन कस्तुरी रे’ सिनेमा प्रदर्शित होणार आहे. त्याआधी सिनेमाचं दणकून प्रमोशन सुरू आहे. नुकतंच सिनेमात एक गाणं प्रदर्शित करण्यात आलं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Source link
MajhiNews Marathi News, Latest Marathi News, Marathi News Paper, Maharashtra Breaking News | मराठी ताज्या बातम्या