पहिल्या वन डेआधी चहरला दुखापत
लखनौमध्ये भारत आणि दक्षिण आफ्रिका संघांमध्ये पहिला वन डे सामना पार पडला. या वन डे आधी सराव करताना दीपक चहरचा पाय मुरगळला होता. त्यामुळे त्याला लखनौ वन डेत अंतिम अकरात स्थान मिळालं नाही. त्यानंतर त्याच्या दुखापतीचं कारण समोर आलं. आणि आता तर तीच दुखापत भारतासाठी चिंतेचं कारण ठरली आहे. चहर हा टी20 वर्ल्ड कपसाठीच्या भारतीय संघात स्टँड बाय खेळाडू आहे. इतकच नव्हे तर जखमी बुमराच्या जागी त्याच्या नावाची मोठी चर्चा सध्या सुरु आहे.
हेही वाचा – MS Dhoni: पांढरा टी-शर्ट, काळा मास्क… पाहा धोनीचा नवा अवतार, CSK ने शेअर केले फोटो
वॉशिंग्टन सुंदरची संघात एन्ट्री
बीसीसीआयनं चहरच्या बदली भारतीय संघात अष्टपैलू खेळाडू वॉशिंग्टन सुंदरला संघात स्थान दिलं आहे. विंडीज दौऱ्यादरम्यान वॉशिंग्टन सुंदरला दुखापत झाली होती. त्यामुळे अनेक दिवस तो क्रिकेटपासून दूर होता. पण दुखापतीतून सावरल्यानंतर बीसीसीआयच्या निवड समितीनं त्याला दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दोन वन डेसाठी भारतीय संघात जागा दिली आहे. त्यामुळे रांचीतल्या दुसऱ्या वन डेत सुंदर भारतीय संघात सामील होईल.
🚨 NEWS 🚨: Washington Sundar replaces Deepak Chahar in ODI squad. #TeamIndia | #INDvSA
More Details 🔽https://t.co/uBidugMgK4
— BCCI (@BCCI) October 8, 2022
रविवारी होणार दुसरा सामना
भारत आणि दक्षिण आफ्रिका संघातला दुसरा सामना रविवारी दुपारी खेळवला जाणार आहे. पहिल्या वन डे सामन्यात भारताला अवघ्या 9 धावांनी पराभव स्वीकारावा लागला होता. त्यामुळे टेम्बा बवुमाचा दक्षिण आफ्रिकन संघ मालिकेत सध्या 1-0 अशा आघाडीवर आहे. रांचीतली दुसरी वन डे जिंकून मालिकेत बरोबरी साधण्याचा टीम इंडियाचा प्रयत्न राहिल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Source link
MajhiNews Marathi News, Latest Marathi News, Marathi News Paper, Maharashtra Breaking News | मराठी ताज्या बातम्या