द्रविड यांच्याकडून घडली मोठी चूक; वर्ल्डकपपूर्वी खेळाडूंना दुखापत का होत आहे, जाणून घ्या कारण

मुंबई : भारताचे खेळाडू T 20 World Cup 2022पूर्वी एकापाठोपाठ एक दुखापतग्रस्त होताना दिसत आहेत. पण यामध्ये भारताचे प्रशिक्षर राहुल द्रविड यांची एक मोठी चूक असल्याचे समोर आले आहे.

वर्ल्डकप हा नेमका कधी आहे, हे सर्वांना माहिती होते. विश्वचषकापूर्वी जसप्रीत बुमरा, दीपक चहर यांना गंभीर दुखापती झाल्या होत्या. त्यामुळे हे दोघेही मोठ्या स्पर्धांमध्ये खेळू शकले नव्हते. पण हे दोघे जेव्हा जेव्हा फिट झाले तेव्हा मात्र एक प्रशिक्षक म्हणून द्रविड यांच्याकडून काही चुका झाल्या आणि त्याचाच परीणाम भारतीय संघावर झाल्याचे पाहायला मिळत आहे.

यापूर्वी जडेजा आणि बुमरा यांच्या रुपात भारताला एकामागून एक मोठे धक्के बसले आहेत. आता तर राखीव खेळाडू असलेला दीपक चहरही दुखापतग्रस्त झाला आहे. जेव्हा बुमरा आणि चहर हे फिट झाले तेव्हा त्यांना लगेच खेळवण्याचा निर्णय भारतीय संघ व्यवस्थापनाने घेतला. बुमराच्या बाबतीत म्हणायचे तर बुमरा हा दुखापतीमुळे आशिया चषकात खेळू शकला नव्हता. त्यानंतर तो फिट झाला. तो फिट झाल्यावर विश्वचषकासाठी जास्त काळ नव्हता. त्यामुळे त्याला ट्वेन्टी-२० सीरिजमध्ये खेळवण्यात कोणताच मुद्दा दिसत नव्हता. पण भारतीय संघ व्यवस्थापनाने त्याला खेळवण्याचा निर्णय घेतला आणि तिथेच घात झाला. चहरबाबतही हीच गोष्ट घडली. बुमरा संघाबाहेर पडला होता. त्यामुळे चहर हा संघात येऊ शकतो, असे दिसत होते. पण तरीही चहरला वनडे मालिका खेळण्याचा अट्टाहास भारतीय संघ व्यवस्थापनाने घेतला आणि हा दुसरा मोठा फटका भारतीय संघाला बसला. त्यामुळे विश्वचषक डोळ्यापुढे असताना खेळाडूंना मालिकेत खेळवण्याचा आत्मघाती निर्णय द्रविड यांच्यासह संघ व्यवस्थापनाने घेतला आणि त्याचा फटका आता भारतीय संघाला बसला आहे.

चहरला झालेली ही पहिलीच दुखापत नाही. यापूर्वी दीपक चहरला फ्रेब्रुवारी महिन्यात दुखापत झाली होती. त्यानंतर झिम्बाब्वे दौऱ्यात तो संघात परतला होता. आता पुन्हा एकदा त्याला दुखापत झाल्याने टीम इंडियाचे टेन्शन वाढले आहे. द.आफ्रिकेविरुद्धच्या टी-२० मालिकेत दीपकने ३ सामन्यात चांगली गोलंदाजी केली होती. ३ विकेटसह अखेरच्या सामन्यात ३१ धावा केल्या होत्या. तर झिम्बाब्वे दौऱ्यातील २ सामन्यात ५ विकेट घेतल्या होत्या. पण त्याला वनडे मालिकेत खेळवण्याचा निर्णय चुकीचा ठरल्याचे आता समोर आले आहे. त्यामुळे आता चहर विश्वचषकासाठी फिट होणार का, याकडे सर्वांचे लक्ष असेल.

Source link

About Admin

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.
@majhinews1

Check Also

रोहित अँड कंपनीसाठी पुढचे 8 दिवस खास, कसं सुरु आहे टीम इंडियाचं प्रॅक्टिस सेशन?

पर्थ, 8 ऑक्टोबर: मिशन टी20 वर्ल्ड कपसाठी टीम इंडिया ऑस्ट्रेलियात दाखल झाली आहे. ऑस्ट्रेलियात पोहोचताच …

पाकिस्तानचा राग बांगलादेशवर, आशिया कपमध्ये लेडी सेहवागनं केली ‘ही’ कमाल

सिल्हेत-बांगलादेश, 08 ऑक्टोबर: महिलांच्या आशिया कपममध्ये भारतीय संघाला काल पाकिस्ताननंकडून पराभव स्वीकारावा लागला. पण त्यानंतर …