Breaking News

ऐश्वर्याला जाणूनबुजून बॉडी रिव्हिलिंग कपडे घालून रणबीर कपूरसोबत रोमांस करायला लावला

निळ्या डोळ्यांची सुंदर अभिनेत्री म्हणून ज्या सौंदर्यवतीला ओळखले जाते ती म्हणजे ऐश्वर्या राय बच्चन (Aishwarya Rai Bachchan) होय. ती एक अशी अभिनेत्री आहे जी इंडस्ट्रीपासून एवढी वर्षे दूर असून सुद्धा तिचे ग्लॅमर अजिबात कमी झालेले नाही. तिची एक साधी गोष्ट असेल तरी सुद्धा ती नेहमी चर्चेत असते. याचे सर्वात मोठे कारण असे सांगितले जाते की तिने केवळ आपल्या कारकिर्दीत फिल्म इंडस्ट्रीमध्येच योगदान दिले नाही तर इंटरनेशनल ब्यूटी प्रोडेक्ट्सची ब्रँड एम्बेसेडर बनून तिने भारताचे नाव सुद्धा मोठे केले होते.

एक भारतीय अभिनेत्री जागतिक पातळीवर मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध झाली होती आणि म्हणूनच तिची ही ओळख आज सुद्धा टिकून आहे. एक यशस्वी अभिनेत्री ते आता बच्चन कुटुंबाची एक आदर्श सून असा तिचा हा संपूर्ण प्रवास आजच्या भारतीय नारीसाठी खरंच प्रेरणादायी आहे. (सर्व फोटोज : इंडियाटाइम्स, फिल्मफेयर आणि ट्विटर@AishwaryaRaiWeb)

पण एक गोष्ट चाहत्यांना आवडत नाही

ऐश्वर्या ही तिच्या चाहत्यांच्या गळ्यातील ताईत आहे. पण एक अशी गोष्ट आहे जी तिच्या चाहत्यांना बिल्कुल आवडत नाही. त्यांना ऐश्वर्याला साडीत पहायला आवडतं, ट्रेडीशनल किंवा ऐथिनिक लुकमध्ये पहायला आवडतं. पण जेव्हा ती एखादा बोल्ड लुक कॅरी करते किंवा अत्यंत हॉट आउटलुक मध्ये समोर येते तेव्हा मात्र ते तिला खरो खोटी सुनवायला सुद्धा मागे पुढे पाहत नाहीत. अशावेळी ऐश्वर्याला सुद्धा मोठा बॅकलॅशचा सामना करावा लागतो. असंच काहीसं घडलं होतं ‘ए दिल है मुश्कील’ चित्रपटाच्या वेळेस!

(वाचा :- आलिया भट्टच्या डोहाळे जेवणात आजी नीतू कपूरने केली नटून-थटून ग्लॅमरस एंट्री, आलियाच्या आईचा लुकही पडला फिका..!)

रणबीरसोबत जबरदस्त केमिस्ट्री

हा सगळा किस्सा रणबीर कपूर आणि ऐश्वर्या रायच्या ‘ए दिल है मुश्कील’ चित्रपटाशी निगडीत आहे. दोघांच्य वयात खूप जास्त अंतर असून सुद्धा या दोन्ही स्टार्सने जी काही रोमँटिक केमिस्ट्री दाखवली होती ते पाहून अनेकांचे डोळेच चक्रावले. कारण कधीही कोणीच हे दोघे असे सिन्स देखील याची अपेक्षा देखील केली नव्हती. या दोघांवर लक्ष जाण्यामागे एक किलर फोटोशूट सुद्धा होते जे पाहून अनेकांनी आपली आपली मते मांडली. या दोघांनी अशा काही पोजेस दिल्या होत्या ज्या त्यांनी कदाचित आपल्या कारकिर्दीत दिल्या नव्हत्या.

(वाचा :- मलायकाची बॅकलेस व डीप चोळीत बोल्डनेसची हद्द पार, पिवळा धम्मक लेहंगा व ब्लाउजचा डीप कट बघून चाहत्यांची बोलती बंद)

टीजिंग इफेक्ट केला अॅड

पूर्णपणे लोकांकडे आपले लक्ष जावे म्हणून ऐश्वर्याच्या कपड्यांमध्ये मुद्दाम जबरदस्त टीजिंग इफेक्ट क्रियेट केला होता. जो तिच्या एलिगेंट ऑरा मधील सेक्सीनेसचा लेव्हल वाढवत होता. पाहायला गेलं तर ऐश्वर्याने नॉर्मल कपडेच परिधान केले होते पण ज्या प्रकारे तिचा लुक स्टाईल केला गेला होता तो अत्यंत बोल्ड होता. पातळ कपड्यांपासून तयार झालेल्या ह्या व्हाईट शर्ट मध्ये ऐश्वर्याने भले स्कीन कव्हर करण्यासाठी लॉंग बुट परिधान केले होते पण नेक पोर्शन वर याला हॉट टच दिल गेला होता.

(वाचा :- अरे कोण म्हणेल आलिया भट्ट आई बनणार आहे? लो कट व डीप नेक ड्रेस घालून केलं इतकं बोल्ड फोटोशूट की बघतच राहिले लोक)

ऑफ शोल्डर आउटफिट

हा काही फक्त एकच फोटो नाही तर असे अनेक फोटो समोर आले आणि चर्चांना अक्षरश: उधाण आलं. हा ऑफ शोल्डर ड्रेस परिधान करून तर ऐश्वर्याने अगदीच खळबळ उडवून दिली होतो. पण यात तिने अगदी स्मार्टली ड्रेस्ड केला आहे आणि रणबीर सोबत तिने ज्या पोझ घेतल्या आहेत त्या टू हॉट वाटत होत्या आणि त्यामुळेच अनेकांची त्याबाबत मते वेगवेगळी होती. त्या दोघांनी एवढ्या कम्फटेर्बल पोझ दिल्या होत्या की अजिबात वाटत नव्हते की दोघांमध्ये 9 वर्षांचे अंतर आहे.

(वाचा :- शहनाज गिलला छोट्याशा बॅकलेस फ्रॉकमध्ये बघून चाहत्यांना फुटला दरदरून घाम,बोल्ड लुकमध्ये दिसली प्रिंसेस सिंड्रेला)

बच्चन कुटुंब सुद्धा खुश नव्हतं

हे फोटो रिलीज झाल्यावर अनेक चाहत्यांनी तर आपल्या तिखट प्रतिक्रिया दिल्याच पण स्वत: बच्चन कुटुंबीय सुद्धा या फोटोशूट मुळे आणि एकंदरीत रणबीर आणि ऐश्वर्याच्या केमिस्ट्री मुळे जास्त खुश नव्हतं अशा अनेक बातम्या समोर आल्या. अनेकांनी या बाबत अमिताभ बच्चन, ज्या बच्चन आणि अभिषेक बच्चन यांच्या प्रतिक्रिया सुद्धा जाणून घेतल्या. पण त्यांच्या प्रतिक्रियांमधून असं काही त्यांना वाटतंय असं दिसून आलं नाही आणि शेवटी या सगळ्या अफवा असल्याचं स्पष्ट झालं. पण या सगळ्या प्रकरणातून हे स्पष्ट झालं कि आपल्या लाडक्या अभिनेत्रीला अशा बोल्ड अवतारात पाहून अनेक चाहत्यांची मते मात्र दुखावली गेली!

(वाचा :- एक नव्हे तर अनेक कट्स असलेल्या स्लिट कट ड्रेसमध्ये नोरा फतेहीने दाखवली बोल्डनेसची जादू, काळ्या तिळाने वेधलं लक्ष)

रणबीरला विचारली कपड्यांमागची कहाणी

माशाबेल इंडियासोबतच्या संवादादरम्यान रणबीर कपूरने ऐश्वर्यासोबत केलेल्या फोटोशूटबद्दल चर्चा झाली. अशा स्थितीत फोटो पाहून रणबीर म्हणाला, ‘हे फोटो पाहून कोण जळणार नाही?’ रणबीरने सांगितले की, तो ऐश्वर्यापेक्षा खूप लहान आहे, पण तरीही ती त्याच्यासोबत काम करताना खूप फ्रेंडली दिसत होती. ऐश्वर्यासारखी मैत्रीण मिळाल्याने मी स्वतःला खूप भाग्यवान समजतो आणि तिच्यासोबत मला चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली. ऐश्वर्यासोबत पडद्यावर रोमान्स करण्याची संधीही अनेकांना मिळत नाही.

(वाचा :- छोटीशी चोळी व शरारा सेटमध्ये कमालीची कातिल दिसतीये माधुरी दीक्षित, ओठांवरच्या हसूने करोडो चाहत्यांना केलं घायाळ)

Source link

About Admin

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.
@majhinews1
Previous हिऱ्यासारखा चमकणाऱ्या डीपनेक ड्रेसमध्ये नोराच्या ग्लॅमरस लूक, फ्लॉन्ट केले टोन्ड लेग्स

Check Also

हिऱ्यासारखा चमकणाऱ्या डीपनेक ड्रेसमध्ये नोराच्या ग्लॅमरस लूक, फ्लॉन्ट केले टोन्ड लेग्स

बॉलिवूडची डान्सिंग क्वीन नोरा फतेही (Nora Fatehi) एक उत्तम डान्सर आहे हे तुम्हाला आधीच माहीत …

गॅस, अॅसिडिटी, पोट साफ न होणं, मुळव्याधाने केलंय जीवन हैराण? करा हे उपाय

Authored by Pratiksha More | Maharashtra Times | Updated: Oct 8, 2022, 10:45 AM Ayurvedic …