Breaking News

‘नदीसाठी…नदीकाठी’ म्हणत दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर गोदावरीचा टीझर प्रदर्शित

मुंबई, 05 ऑक्टोबर : राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात आपली मोहोर उमटवल्यानंतर निखिल महाजन दिग्दर्शित ‘गोदावरी’ चित्रपट आता प्रदर्शनासाठी सज्ज झाला आहे. गेली अनेक दिवस प्रेक्षक सिनेमाची वाट पाहत आहेत. येत्या 11 नोव्हेंबरला सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येतोय मात्र त्याआधी सिनेमाची टीझर प्रेक्षकांना पाहायला मिळाला आहे. आज दसऱ्याच्या मुहूर्तावर गोदावरी सिनेमाचा टीझर प्रदर्शित झाला आहे.  सिनेमातील सगळ्या कलाकारांची पहिली झलक टीझरमधून समोर आली आहे.  अभिनेता जितेंद्र जोशी,   विक्रम गोखले, नीना कुळकर्णी, संजय मोने, प्रियदर्शन जाधव, गौरी नलावडे यांच्या प्रमुख भूमिका  सिनेमात पाहायला मिळत आहेत.

‘गोदावरी’ हा महाराष्ट्रातील प्रत्येक कुटुंबाला जोडणारा सिनेमा आहे. टीझरमध्ये जितेंद्र जोशी आणि त्याच्या कुटुंबाच्या नातेसंबंधातील चढउतार, परंपरा आणि भावनांचे उत्तम मिश्रण पाहायला मिळतं आहे. पण या कुटुंबाचं आणि ‘गोदावरी’चं नक्की काय नाते आहे, हे सध्या गुलदस्त्यात असले तरी लवकरच याचे उत्तर प्रेक्षकांना मिळणार आहे.

हेही वाचा – ‘त्याला जबरदस्त मालमसाला लावून..’, जितेंद्र जोशीची सई ताम्हणकरच्या B.E Rojgaar साठी पोस्ट

चित्रपटाबद्दल दिग्दर्शक निखिल महाजन म्हणतात, ”कुटुंबाने एकत्र पाहावा असा हा चित्रपट आहे. आयुष्यात एखादी गोष्ट साध्य करताना अनेक गोष्टी, नाती मागे राहतात. नात्याचे मूल्य सांगणारा, नात्यांची नव्याने ओळख करून देणारा हा कौटुंबिक चित्रपट प्रेक्षकांना नक्कीच आवडेल.”

जगभरातील चित्रपट महोत्सवात उमटवली मोहोर

गोदावरी हा सिनेमा केवळ देशातच नाही आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातही झळकला आहे. इफ्फी महोत्सवात ‘ गोदावरी’ चित्रपटाने आंतरराष्ट्रीय स्तरावरही लौकिक मिळवला आहे. तर न्यूयॉर्क इंडियन फिल्म फेस्टिव्हल(NYIFF), वॅनकोवर इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल, न्यूझीलंड इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल, पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव, एफआयपीआरईएससीआय – इंडिया ग्रँड प्रिक्स अशा अनेक महोत्सवात ‘गोदावरी’ने आपला झेंडा रोवला आहे.

आता घरच्या प्रेक्षकांची मने जिंकण्यासाठी  ‘गोदावरी’ हा सिनेमा सज्ज  झाला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

Source link

About Admin

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.
@majhinews1

Check Also

माधुरी दीक्षितने खरेदी केलं आलिशान घर; किंमत वाचून बसणार नाही विश्वास

मुंबई, 5 ऑक्टोबर-   ‘धक धक गर्ल’ माधुरी दीक्षित बॉलिवूडच्या लोकप्रिय आणि सुंदर अभिनेत्रींपैकी एक आहे. …

तेजस्विनी पंडित घेऊन आलीय शापित कुटुंबाची कथा, टीझर पाहून अंगावर येईल काटा

मुंबई :प्लॅनेट मराठी ओटीटीवर निरनिराळ्या वेब सीरिज येत असतात. लवकरच अथांग ही सीरिज येत आहे. …