महाकालचे दर्शन न घेताच परतले आलिया-रणबीर; अभिनेत्याचं ‘बीफ प्रेम’ भोवलं

मुंबई: रणबीर कपूर आणि आलिया भट्ट (Ranbir Kapoor and Alia Bhatt) लवकरच आई-वडील होणार आहेत आणि त्याआधी त्यांनी पहिल्यांदाच एकत्र काम केलेला ‘ब्रह्मास्त्र’ हा सिनेमा प्रदर्शित होतोय. ‘ब्रह्मास्त्र’ रिलीज होण्यापूर्वी दोघेही महाकालच्या मंदिरात दर्शनासाठी उज्जैनला पोहोचले. मात्र रणबीर कपूरने काही वर्षांपूर्वी केलेल्या बीफबाबतच्या वक्तव्याचा हिंदू संघटनांनी निषेध केला. यामुळे त्यांना उज्जैनहून दर्शन न घेताच परतावे लागले.

मंगळवारी ब्रह्मास्त्र चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वी आलिया भट्ट, पती रणबीर कपूर आणि दिग्दर्शक अयान मुखर्जीसह उज्जैनच्या महाकाल मंदिरात आशीर्वाद घेण्यासाठी पोहोचली होती, मात्र हिंदू संघटनांनी ब्रह्मास्त्र टीमला विरोध केला. त्यामुळे आलिया-रणबीरला आशीर्वाद घेता आले नाहीत, ते दर्शनाशिवायच मुंबईमध्ये परतावे लागले.


काही दिवसांपूर्वी रणबीरची जुनी मुलाखत सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. ज्यामध्ये रणबीर त्याला बीफ आवडत असल्याचे म्हणत होता. ट्रोल आर्मीने ही जुनी मुलाखत सोशल मीडियावर पोस्ट केली आणि बघता बघता हा व्हिडिओ व्हायरल झाला होता. आधीच ब्रह्मास्त्र बॉयकॉट करण्याची मागणी केली जात होती, या व्हिडिओनंतर या मागणीला आणखी जोर चढला.

हे वाचा-रणबीर कपूरच्या आवडीचं आहे Beef ! त्या व्हिडिओचा ब्रह्मास्त्रला बसणार फटका?

आता जेव्हा रणबीर कपूर पत्नी आलियासह उज्जैन याठिकाणी महाकाल मंदिराला भेट देण्यासाठी पोहोचला तेव्हा बजरंग दल (Ruckus Outside Ujjain Temple) आणि इतर संघटनांनी या जोडप्याला विरोध केला. विरोध इतका वाढला की या जोडप्याला दर्शन न घेताच मुंबईला परतावे लागले. पोलिसांनी बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांना पकडण्याचाही प्रयत्न केल्याचे समजते आहे.


हे वाचा-द कपिल शर्मा शोमध्ये दिसणार नाही भारती सिंह, कारण सांगत स्वत:चं केला खुलासा

यावेळी आलिया भट आणि रणबीर कपूर पारंपरिक अशा अंदाजात दिसत होते. त्यांच्यासोबत अयानही होता. उज्जैनला महाकाल मंदिरात दर्शनासाठी जात असल्याची माहिती त्यांनी सोशल मीडियावरुनही दिली होती. पण पुढे असं घडेल असं कुणाच्याही ध्यानीमनी नव्हतं. आलियानेच इन्स्टाग्रामवर ते उज्जैनला जात असल्याचा व्हिडिओ शेअर केला होता. या व्हिडिओमध्ये अयान, आलिया आणि रणबीरने ब्रह्मास्त्रच्या आगाऊ बुकिंगविषयीही माहिती दिली. या जोडीचे पॅपाराझींने काढलेले फोटो-व्हिडिओदेखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.



Source link

About Admin

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.
@majhinews1

Check Also

‘आशिकी 3’ मध्ये कार्तिक आर्यनसोबत झळकणार ‘ही’ प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री?

मुंबई, 7 सप्टेंबर-  बॉलिवूडमधील यशस्वी अभिनेत्यांच्या यादीत कार्तिक आर्यनची गणना केली जाते. कार्तिक आर्यनने आपला …

रश्मिका मंदानाने ‘पुष्पा 2’बाबत दिली मोठी अपडेट; शूटिंगबाबत म्हणाली….

मुंबई, 7 सप्टेंबर-  साऊथ सुपरस्टार अल्लू अर्जुन आणि नॅशनल क्रश रश्मिका मंदानाच्या ‘पुष्पा’ या चित्रपटाने …