RRR आणि बाहुबलीला मागे टाकणार ‘ब्रह्मास्त्र’? दोन दिवसांपासून नावावर आहे हा रेकॉर्ड

मुंबई: आलिया भट्ट आणि रणबीर कपूरचा (Alia Bhatt Ranbir Kapoor Brahmastra) या वर्षातील सर्वात मोठा चित्रपट ‘ब्रह्मास्त्र’ रिलीज होण्यास अवघे काही दिवस उरले आहेत. या चित्रपटाला सुरुवातीला प्रचंड बहिष्काराचा (Boycott Brahmastra Trend) सामना करावा लागला होता पण आता हा चित्रपट प्रेक्षकांमध्ये चमत्कार घडवणार असल्याचे दिसते. कारण आलिया आणि रणबीरचे चाहते त्यांच्या चित्रपटाबद्दल खूप उत्सुक आहेत. यासोबतच चित्रपटाची आगाऊ बुकिंग सुरू झाली आहे. हे पाहून चित्रपटाला लवकरच चांगला नफा मिळेल असे वाटते.

दोन दिवसांत मोडले विक्रम

‘ब्रह्मास्त्र’चे आगाऊ बुकिंग दोन दिवसांपूर्वीच सुरू झाले आहे, सिनेमाने यामध्ये रेकॉर्ड केला आहे. हा सिनेमा आगाऊ बुकिंगच्या बाबतीत हॉलिवूड चित्रपट आणि दक्षिणेतील बडे चित्रपट- ‘बाहुबली – द कन्क्लुजन’ आणि ‘केजीएफ २’ यांच्या मागेच आहे. ‘ब्रह्मास्त्र’ने ‘RRR (हिंदी)’ आणि ‘भूल भुलैया’ला जवळपास अडीच दिवसात PVR चेन प्रॉपर्टीजमध्ये मात दिली आहे. इतर दोन सिनेमांने मागे टाकणे अद्याप बाकी आहे.

हे वाचा-कतरिनाने साजरा केलेला सुहाग दिन? काय बोलून गेली अभिनेत्री

मोठ्या चित्रपटांच्या पुढे आहे ‘ब्रह्मास्त्र’

अजूनही मोठ्या मल्टिप्लेक्स आणि थ्रीडी स्क्रिनिंगपुरतेच हे बुकिंग होत आहे. ब्रह्मास्त्रने ‘वॉर’, ‘ठग्स ऑफ हिंदोस्तान’ किंवा ‘सुलतान’ या सिनेमांच्या आगाऊ बुकिंगपेक्षा जास्त वेगाने बुकिंग केले आहे. लहान मल्टिप्लेक्समध्ये अजूनही जागा शिल्लक आहे आणि जर याठिकाणीही मोठ्या मल्टिप्लेक्स सारखाच प्रतिसाद मिळाला तर ब्रह्मास्त्र मोठा रेकॉर्ड मोडू शकेल.

Source link

About Admin

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.
@majhinews1
Previous Raju Shrivastav यांच्या हेल्थबाबत मोठी अपडेट समोर, शरीरात जाणवली हालचाल

Check Also

विवेक अग्निहोत्रींचं बॉलिवूडबाबत मोठं वक्तव्य; म्हणाले ‘बॉयकॉट संस्कृती चांगलीच’

मुंबई, 17 सप्टेंबर :  गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावरून  बॉलिवूडवर जोरदार टीका होत आहे. कोणताही …

बच्चन कुटुंबाच्या 3 पिढ्या येणार एकत्र; बिग बींची नात करणार कुटुंबाची पोलखोल

मुंबई, 17 सप्टेंबर : बॉलिवूडचे बिग बी अमिताभ बच्चन कोणत्या न कोणत्या कारणावरुन चर्चेत असतात. त्यांच्याविषयी …