कपिल शर्मा या सिनेमात फार गरीब कुटुंबातील एक कुटुंबप्रमुख म्हणून आयुष्य जगताना दिसणार आहे. नोकरी मिळत नसल्यानं त्याला डिलिव्हरी बॉयची नोकरी करावी लागते. ज्विगाटो नावाच्या कंपनीमध्ये तो डिलिव्हरी बॉय म्हणून काम करत असतो. या प्रवासात त्याला येणारे अडथळे, कुटुंबाचं प्रेशर आणि लोकांना जेवण पोहोचवण्याची त्याची धडपड सगळं काही पाहायला मिळणार आहे. आपल्या घरी जेवण रात्री अपरात्री, सकाळी संध्याकाळी जेवण पोहोचवणारा डिलिव्हरी बॉय त्याच्या आयुष्यात किती स्टगल करत असतो, त्याला कोणत्या आव्हानांचा सामना करावा लागतो याचं संपूर्ण चित्रण सिनेमातून करण्यात येणार आहे.
हेही वाचा – ‘विकी डोनर’ नंतर आता स्त्रीरोग तज्ञाच्या भूमिकेत दिसणार आयुष्मान; ‘डॉक्टर जी’ येतोय प्रेक्षकांच्या भेटीला
सिनेमाच्या ट्रेलरमध्ये पाहायला मिळतय, डिलिव्हरी बॉयची नोकरी करत असताना त्याला आयुष्यात किती आव्हानांचा सामना करावा लागतोय. एका डिलिव्हरी बॉयला कशाप्रकारे एक गुड बॉय बनून चांगलं रेटिंग आणि इंसेटिंवच्या मागे गोल गोल फिरावं लागतं, हे दाखवण्यात आलं आहे. ‘वो मजदूर हे इसलिए मजबूर हे, क्या पता वो मजबूर हैं इसलिए मजबदूर है’, ट्रेलरमधील कपिल शर्माचं हे वाक्य सगळ्यांचं लक्ष वेधून घेत आहे.
कपिल शर्माच्या ज्विगाटो या सिनेमाचा प्रीमियर टोरंटो फिल्म फेस्टिव्हल 2022मध्ये करण्यात आला आहे. या फेस्टमध्येही सिनेमाला प्रचंड प्रेम मिळालं. त्यानंतर आता हा सिनेमा बुसान फिल्म फेस्टिव्हल 2022मध्ये देखील दाखवला जाणार आहे. या फेस्टची सुरूवात 5 ऑक्टोबरपासून होणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Source link
MajhiNews Marathi News, Latest Marathi News, Marathi News Paper, Maharashtra Breaking News | मराठी ताज्या बातम्या