या दु:खद घटनेदरम्यान त्यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ज्यामध्ये त्यांनी आधीच यमराज आणि मृत्यूचा उल्लेख केला आहे. राजू यांचा हा व्हिडिओ खूप जुना आहे. या व्हिडीओमध्ये ते म्हणत आहे कि, ”नमस्कार, आयुष्यात असे काम करा की यमराज जरी तुम्हाला न्यायला आला तरी त्याला सांगा तू म्हशीवर बस. आपण चालत आहात, बरे वाटत नाही. तू चांगला माणूस आहेस, थोर माणूस आहेस, म्हणून तुम्ही म्हशीवर बसा.’ त्यांचा हा व्हिडीओ कॉमेडी अंदाजात केलेला जरी असला तरी लोक आता हा व्हिडीओ पाहून त्यांची आठवण काढत आहेत.
राजू श्रीवास्तव यांचा जन्म 25 डिसेंबर 1963 रोजी कानपूरमध्ये झाला होता. कॉमेडियनचे खरे नाव सत्य प्रकाश श्रीवास्तव आहे. त्यांच्या वडिलांचे नाव रमेशचंद्र श्रीवास्तव आणि आईचे नाव सरस्वती श्रीवास्तव होते. राजूचे वडील सुप्रसिद्ध कवी होते, जे बाळा काका या नावाने प्रसिद्ध होते. तर आई गृहिणी होती. 1993 मध्ये राजूचे शिखा श्रीवास्तवसोबत लग्न झाले होते. राजूला दोन मुले आहेत. एक मुलगा, ज्याचे नाव आयुष्मान आणि मुलगी अंतरा.
हेही वाचा – Raju Srivastava : मृत्यूलाही चकवा देऊन राजू आला होता परत, ‘हे’ शब्द ठरले अखेरचे!
10 ऑगस्ट रोजी जेव्हा राजू श्रीवास्तव यांना हृदयविकाराचा झटका आला तेव्हा त्यांना पाहण्यासाठी लोकांची एकच ओढ लागली होती. त्याचे मित्र आणि कुटुंबीय सतत राजूला भेटायला जात होते आणि प्रत्येकजण त्याच्या प्रकृतीबद्दल अपडेट्स देत होता. त्यांच्या प्रकृतीत बरीच सुधारणा झाल्याचेही अनेकांनी सांगितले पण आता राजूने आयुष्याची लढाई हरली आणि जगाचा निरोप घेतला आहे.
Published by:Nishigandha Kshirsagar
First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Source link
MajhiNews Marathi News, Latest Marathi News, Marathi News Paper, Maharashtra Breaking News | मराठी ताज्या बातम्या