JEE Main 2022: जेईई मेन परीक्षा लांबणीवर, नव्या तारखा जाणून घ्या

JEE Main 2022 Date: जेईई मेन २०२२ परीक्षेची (JEE Main 2022) तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी महत्वाची अपडेट आहे. जेईई मुख्य २०२२ एप्रिल सत्राच्या तारखा वाढवण्याचा निर्णय नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (National Testing Agency, NTA) घेतला आहे. यासंदर्भात उमेदवारांकडून सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात मागणी केली जात होती. उमेदवारांच्या मागणीची पूर्तता करण्यासाठी नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) ने इंजिनीअरिंग प्रवेश परीक्षेच्या तारखांमध्ये बदल करण्याची घोषणा केली आहे.

एनटीएने जाहीर केलेल्या नोटीसनुसार, जेईई मुख्य २०२२ चा पहिला टप्पा म्हणजेच एप्रिल सत्र आता २० जून ते २९ जून या कालावधीत घेण्यात येईल. याआधी २१, २४, २५ आणि २९ एप्रिल आणि १ आणि ४ मे या तारखा जाहीर करण्यात आल्या होत्या. जेईई मेन २०२२ च्या तारखांमध्ये बदल झाल्यामुळे उमेदवारांना आता परीक्षेच्या तयारीसाठी आणखी एक महिना मिळाला आहे.

JEE Main 2022 Date:दुसऱ्या सत्राच्या तारखांमध्ये बदल

एनटीए जेईई मेन २०२२ च्या एप्रिल सत्रासोबत दुसऱ्या टप्प्याच्या म्हणजेच मे सत्राच्या तारखा देखील बदलण्यात आल्या आहेत. एनटीएच्या सूचनेनुसार, जेईई मेन २०२२ चे मे सत्र आता २१ जुलै ते ३० जुलै २०२२ दरम्यान आयोजित केले जाणार आहे. यापूर्वी या टप्प्यासाठी २४ मे ते २९ मे २०२२ या तारखा निश्चित करण्यात आल्या होत्या. जेईई मेन २०२२ फेज २ ची तयारी करत असलेल्या उमेदवारांना देखील एक महिन्याचा अतिरिक्त वेळ मिळाला आहे.

IIT Madras: ११ वी आणि १२ वीच्या विद्यार्थ्यांनाही करता येणार BSc डेटा सायन्ससाठी अर्ज
NEET UG च्या रिक्त जागांवर आजपासून प्रवेश प्रक्रिया सुरु
८ एप्रिलपर्यंत जेईई मेन २०२२ अर्ज दुरुस्ती

एनटीएने जेईई मेन २०२२ च्या पहिल्या सत्रासाठी अर्ज केलेल्या उमेदवारांसाठी ६ एप्रिल २०२२ पासून अर्ज दुरुस्त करण्याची विंडो उघडली आहे. ज्या उमेदवारांना त्यांच्या अर्जामधील कोणत्याही त्रुटी दूर करायच्या असतील किंवा आवश्यक सुधारणा करायच्या असतील ते उमेदवार एनटीएद्वारे निश्चित केलेल्या तारखेपर्यंत बदल करु शकतात. ८ एप्रिल २०२२ रात्री ९ वाजेपर्यंत अर्जांमध्ये सुधारणा करता येणार आहे. तपशीलांमध्ये दुरुस्त्या असल्यास उमेदवारांना एनटीएने विहित केलेले शुल्क देखील भरावे लागेल.

जेईई मुख्य २०२२ परीक्षेच्या तारखांचे नोटिफिकेशन पाहण्यासाठी येथे क्लिक करा

JEE Mains च्या नोंदणीसाठी ‘ही’ कागदपत्रे आवश्यक, शेवटची तारीख जाणून घ्या
NEET UG २०२२ च्या नोटिफिकेशनसंदर्भात महत्वाची अपडेट

Source link

About Admin

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.
@majhinews1
Next या देशासाठी तुमचं योगदान काय? संजय राऊत यांचा देवेंद्र फडणवीस यांना सवाल

Check Also

FYJC Admission: अकरावीला ६,७३७ विद्यार्थ्यांना प्रवेश

म. टा. प्रतिनिधी, पुणेपुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरातील ज्युनिअर कॉलेजांमध्ये अकरावीच्या प्रवेशासाठी राबविण्यात येणाऱ्या ऑनलाइन प्रवेश …

युक्रेनहून परतलेल्या विद्यार्थ्यांच्या पदरी निराशाच, प्रवेशासाठी शोधावा लागणार दुसरा देश

म. टा. प्रतिनिधी, नाशिकरशिया-युक्रेन युद्धामुळे वैद्यकीय शिक्षण अर्धवट सोडून भारतात परतलेल्या विद्यार्थ्यांची परवड सहा महिन्यांनंतरही …