My Next Guest Needs No Introduction या हॉलिवूडमधील प्रसिद्ध शोमध्ये शाहरुखने याविषयी सांगितले होते. डेव्हिड लेटरमॅनच्या या शोमध्ये शाहरुखने तो गौरीला शोधत कसं मुंबईत पोहोचला होता हे सांगितले. २०१९ साली नेटफ्लिक्सवर आलेल्या या शोमध्ये त्याने याविषयी भाष्य केले होते. त्यावेळी गौरी मुंबईत काही कारणामुळे निघून आली होती. शाहरुखला तिला शोधायचे होते पण ती मुंबईत कुठे आली आहे हे त्याला माहीत नव्हते, तरी त्याने मित्रांसोबत मुंबईत येण्याची योजना आखली.
हे वाचा-विजय देवरकोंडा आणि रश्मिका लपत-छपत कुठे निघाले? Video पाहून नेटकऱ्यांनी लावायचा तो अंदाज लावलाच
शाहरुखला त्यावेळी हे माहीत होते की तिला स्विमिंग आवडते, त्यामुळे तो मुंबईत जाऊन समुद्रावर गौरीला शोधेल अशी त्याची योजना होती. पण शाहरुखला हे माहीत नव्हते की मुंबईत एक नव्हे तर खूप समुद्र आहेत. त्याला मुंबईतील एका टॅक्सी ड्रायव्हरने त्याला याविषयी माहिती करून दिली. त्याच्याकडे आणि मित्रांकडे मिळून ४०० रुपये होते. त्यामुळे त्यांनी त्या टॅक्सी ड्रायव्हरला सांगितले की हे ४०० रुपये पुरतील तोपर्यंत आम्हाला सर्व बीचवर घेऊन जा. मीटरमध्ये एवढी रक्कम पूर्ण झाली की आम्ही उतरून जाऊ.
हे वाचा-मराठी सिनेसृष्टीतील या जोडप्याने खरेदी केली महागडी कार, किंमत आहे तब्बल…
मात्र काही समुद्र फिरून झाल्यावर शाहरुखचे मित्र वैतागले आणि त्यांनी त्याला सांगितले की आपल्याकडे एवढेच पैसे आहेत, खाण्यासाठी ठेवावे लागतील. तुझी लव्ह स्टोरी आता संपली. तरी सुद्धा एका शेवटच्या समुद्रावर जायचे ठरले. तिथे एका मुलीचा आवाज शाहरुखने ऐकला आणि ती गौरीच होती! तिची पहिली प्रतिक्रिया- ‘तू इथे काय करतोयंस?’ अशी होती.
जेव्हा डेव्हिडने या घटनेविषयी गौरीशी बातचीत केली तेव्हा ती म्हणाली होती शाहरुखसोबतच्या नात्याविषयी तिच्या घरच्यांना माहीत नव्हते. तिला ब्रेक हवा होता, म्हणून ती मुंबईत आली होती, कारण शाहरुख त्यावेळी खूप पझेसिव्ह होता. मात्र जेव्हा ते दोघे त्यावेळी भेटले ते पुन्हा कधी वेगळे झाले नाहीत.
Source link
MajhiNews Marathi News, Latest Marathi News, Marathi News Paper, Maharashtra Breaking News | मराठी ताज्या बातम्या