अभिनेत्री दीपानं फार कमी वयात तिचं करिअर केलं. आत्महत्या करुन ती तिचं आयुष्य संपवेल असं कोणालाही वाटलं नव्हतं. तिच्या जाण्यानं तिच्या कुटुंबिय आणि मित्र मैत्रिणींना मोठा धक्का बसला आहे. मीडिया रिपोर्टनुसार, दीपाचा मित्र प्रभाकरन यानं पोलिसांना माहिती दिली. त्यानं दिलेल्या माहितीनुसार, घटना घडल्यानंतर सर्वात आधी तो पोहोचला त्यानंतर त्यानं ही माहिती अभिनेत्रीच्या भावाल दिली. भावाने बहिणीच्या आत्महत्येची माहिती कोयम्बेड्डु पोलिसांनी दिली. माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल होऊन त्यांनी अभिनेत्रीचा मृतदेह ताब्यात घेऊन तो शवविच्छेदनासाठी पाठवला.
हेही वाचा – 250हून अधिक सिनेमात काम करणाऱ्या अभिनेत्रीकडे उपचारांसाठी नाहीत पैसे; सरकारी रुग्णालयात आहे अँडमिट
The 29-year-old Tamil actor Pauline Jessica, popularly known by her stage name Deepa, died by suicide. She was found dead in her apartment in Chennai.
(Pic Source: Pauline Jessica’s Instagram account) pic.twitter.com/pdGyIZELJF
— ANI (@ANI) September 20, 2022
पोलिसांना तपासांती दीपाच्या रूममध्ये एका डायरी मिळाली ज्यात एक नोट लिहिलेली होती. ही नोट सुसाइट नोट असल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे. ज्यात अभिनेत्रीनं तिला तिचं आयुष्य आवडत नाही असं म्हटलं आहे. तिला सपोर्ट करणारे कोणीही नाहीत असंही तिनं लिहिलं आहे. दीपाने नोटमध्ये अनेक गोष्टी लिहिल्या आहेत. त्यातील एक गोष्ट सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे. तिनं नोटमध्ये लिहिल्याप्रमाणे, ती रिलेशनशिपमध्ये होती आणि त्यात तिला धोका मिळाला. त्यामुळे तिनं तिचं आयुष्य संपवण्याचा निर्णय घेतला.
दीपाच्या नोटमध्ये लिहिलेल्या माहितीनुसार पोलीस तिच्या बॉयफ्रेंडचा शोध घेत आहेत. या प्रकरणी तपास सुरू असून अभिनेत्रीच्या मृत्यूमागील कारण शोधण्याचा पोलीस प्रयत्न करत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Source link
MajhiNews Marathi News, Latest Marathi News, Marathi News Paper, Maharashtra Breaking News | मराठी ताज्या बातम्या