हे वाचा-‘ब्रह्मास्त्र’मध्ये काम करायला तयार नव्हते नागार्जुन? या एका अटीवर झाले तयार
मीडिया रिपोर्टनुसार, दीपा गेल्या काही दिवसांपासून एकटीच राहत होती. तिच्या कुटुंबीयांनी तिला या घटनेआधी फोन करण्याचा प्रयत्न केला होता, पण तिने कॉल उचचला नाही. त्यावेळी काहीतरी संशयास्पद घडले असावे, असे त्यांना वाटले. त्यावेळी त्यांनी तिच्या एका मैत्रिणीला तिची चौकशी करण्यासाठी पाठवले असता अभिनेत्री पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळून आल होती. सरकारी रुग्णालयात अभिनेत्रीच्या मृतदेहाचे पोस्टमार्टम केले जात आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून याप्रकरणी अधिक तपास सुरू आहे. दरम्यान विविध मीडिया रिपोर्टनुसार असे समोर आले आहे की, प्रेमभंग झाल्याने अभिनेत्रीने हे टोकाचे पाऊल उचलले.
हे वाचा-मला RSS मध्ये घ्या म्हणतोय KRK! मोहन भागवत आणि फडणवीसांंकडे केली मागणी
रिपोर्ट्सनुसार असेही समोर आले आहे की तिच्या घरातून समोर आलेल्या एका नोटमध्ये तिने कुणाचेही नाव लिहिलेले नाही. पण असेही बोलले जात आहे की, ती एका व्यक्तीच्या प्रेमात आकंठ बुडाली होती. मात्र तिला या नात्यामधील तणाव सहन होत नव्हता. सोशल मीडियावरही तिने अनेकदा कोणाचही नाव न घेता प्रेमासंबंधीचे मेसेज पोस्ट केले होते. ती मानसिक तणावाचाही सामना करत होती. कॉलिवूड सिनेमातील ही अभिनेत्री ‘Vaidhaa’ या सिनेमाचा भाग होती.
Source link
MajhiNews Marathi News, Latest Marathi News, Marathi News Paper, Maharashtra Breaking News | मराठी ताज्या बातम्या