एकाच मंचावर आजी- नातीची जुगलबंदी, आशा भोसलेंच्या वाढदिवशी नातीनं शेअर केलेला Video नक्की बघा

मुंबई : लोकप्रिय आणि ज्येष्ठ गायिका आशा भोसले (Asha Bhosle) यांचा आज ८९ वा वाढदिवस आहे. आशाताईंच्या जन्मदिनानिमित्तानं त्यांच्या असंख्य चाहत्यांनी त्यांना वेगवेगळ्या प्रकारे शुभेच्छा दिल्या आहेत. आशा भोसले यांची गाणी ऐकून अनेकांच्या दिवसाची सुरुवात होत असते. त्यांच्या आयुष्यातील प्रत्येक क्षणात आशाताईंची गाणी साक्षीदार असतात. आशा ताईंच्या वाढदिवसाच्या निमित्तानं त्यांची नात जनाई भोसलेनं कविता लिहित इन्स्टाग्रामवर शेअर केली आहे. ही कविता शेअर करत असताना जनाईनं एक खास व्हिडिओ शेअर केला आहे. त्यामध्ये तिच्यात आणि आशा ताई स्टेजवर गाण्याची जुगलबंदी ऐकू येते.

आशाताईंचं नव्वदीत पदार्पण, असा सेलिब्रेट झाला वाढदिवस

आशाताईंसारखीच आहे जनाई

जनाई (Zanai Bhosle) सोशल मीडियावर खूपच सक्रीय असते. जनाईलादेखील आजी यांच्यासारखं गायिका व्हायचं आहे. आशा ताईंच्या वाढदिवशी जनाईनं त्यांच्यावर रचलेली कविता सोशल मीडियावर शेअर केली आहे.


आजीला दिल्या अशा शुभेच्छा

आशा भोसले यांना जनाईनं जन्मदिवसाच्या एकदम अनोख्या पद्धतीनं शुभेच्छा दिल्या आहेत. तिनं आजीबरोबरचा एक व्हिडिओ क्लिप शेअर केला आहे. याबरोबरच तिनं हृद कविता शेअर केली आहे. या कवितेत जनाईनं लिहंलं आहे की, ‘८९ वर्ष! प्रत्येक व्यक्तीला वाटतं की त्याला तुझ्यासारखं गाता यावं. तू तुझा आवाज तर मला दिलास, परंतु त्याबरोबर वेगळी ओळख निर्माण करायला ही तू शिकवलंस, चांगलं माणूस व्हायला तू शिकवलं, आकाशाला कवेत घ्यायला तू मला शिकवलं पण त्याबरोबरच जमिनीवर रहायलादेखील शिकवलंस. माझ्या स्वप्नांना तू समजून घेतलं आणि माझा आधार होणं हे तू तुझं कर्तव्य समजलं. माझ्यावर विश्वास ठेवला आणि भरभरून प्रेमदेखील केलं. दिवस असो वा रात्र आशा आई तुझ्या प्रत्येक श्वासबरोबर मी देखील श्वास घेईन. माझ्या जीवात जोपर्यंत जीव आहे तोपर्यंत.’

राणी एलिझाबेथने दिलेल्या निमंत्रणाला बिग बींनी दिलेला नकार


आशाताईंना मिळालेत अनेक पुरस्कार

आशा भोसले या उत्तम गायिका आहेत. त्यांनी भारतीय सिनेविश्वामध्ये खूप लोकप्रियता मिळवली आहे. हरहुन्नरी गायिका म्हणून आशाताईंनी नाव कमावलं आहे. त्यांना गायनाबद्दल दोन राष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत. त्याशिवाय त्यांनी अनेक भारतीय भाषांमध्येही गाणी गायली आहेत.



Source link

About Admin

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.
@majhinews1

Check Also

9 वर्षांच्या कठोर परिश्रमानंतर बनलाय ‘ब्रह्मास्त्र’; समोर आला फर्स्ट रिव्ह्यू

मुंबई, 9 सप्टेंबर-   बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर आणि आलिया भट्टचा बहुप्रतीक्षित चित्रपट ‘ब्रह्मास्त्र’ आज …

माझी तुझी रेशीमगाठ घेणार निरोप पण नव्या रुपात भेटणार ‘यश’; श्रेयस तळपदे या भूमिकेसाठी सज्ज

मुंबई : माझी तुझी रेशीमगाठ संपणार हे कळल्यावर श्रेयस तळपदेचे चाहते हळहळले. कारण श्रेयसनं साकारलेला …