माझी तुझी रेशीमगाठ घेणार निरोप पण नव्या रुपात भेटणार ‘यश’; श्रेयस तळपदे या भूमिकेसाठी सज्ज

मुंबई : माझी तुझी रेशीमगाठ संपणार हे कळल्यावर श्रेयस तळपदेचे चाहते हळहळले. कारण श्रेयसनं साकारलेला यश घराघरात पोहोचला होता. पण आता रसिक प्रेक्षकांसाठी चांगली बातमी आहे. श्रेयस तळपदेचा सिनेमा आपडी थापडा लवकरच म्हणजे दसऱ्याला रिलीज होतोय. श्रेयसनं तशी माहिती सोशल मीडियावर दिली आहे.

ब्लॉकबस्टर ठरणार हृतिक-सैफचा विक्रम वेधा? प्रदर्शनाआधीच होतंय कौतुक

श्रेयस तळपदेनं शेअर केलेल्या पोस्टमध्ये तो म्हणतोय, फॅमिलीचा पिक्चर, बघू फॅमिलीबरोबर. ‘आपडी-थापडी’ दसऱ्याच्या मुहूर्तावर ५ ऑक्टोबरपासून सिनेमागृहांत! बऱ्याच दिवसांनी श्रेयसचा सिनेमा येतोय, ही त्याच्या चाहत्यांसाठी आनंदाची गोष्ट आहे. सिनेमा एका छोट्या मुलीभोवती फिरतो. आपडी थापडी हा एक छोट्यांचा खेळ आहे. आपडी थापडी गुळाची पापडी, असं बालगीतही आहे. पूर्वी गावात अंगणात हा खेळ खेळला जायचा. या सिनेमात बाप-लेकीची कथा आहे. तो बाबा आहे श्रेयस तळपदे आणि आई आहे मुक्ता बर्वे. कोकणच्या पार्श्वभूमीवर सिनेमा आकार घेतो.

सिनेमातली श्रेयस आणि मुक्ताची वेशभूषा पूर्ण वेगळी आहे. गावरान लूक आहे. प्रेक्षकांना सिनेमाची उत्सुकता आहे. श्रेयसच्या वाढदिवसालाच सिनेमाचा टीझर आला होता. त्यावेळी पोस्ट शेअर करत लिहिलं होतं, ‘आजच्या दिवशी आपणा सर्वांसाठी एक खास भेट. माझ्याबरोबरच आपलं प्रेम आणि आशीर्वाद आमच्या या नवीन बाळालाही लाभो, हीच बाप्पा चरणी प्रार्थना.’ या सिनेमात श्रेयस आणि मुक्तासोबत संदीप पाठक, नंदू माधव, खुशी हजारे, नवीन प्रभाकर अशी तगडी कलाकार मंडळी आहेत. या जोडीचा हा पहिलाच सिनेमा असल्याने त्यासाठी चाहते खूपच उत्सुक आहेत.

Video : गणपतीला अरुंधतीच्या घरी अनिरुद्ध धडकला, दिला अनाहुत सल्ला

मुक्ता बर्वे सध्या चारचौघी या नाटकात काम करतेय. तिचा वाय सिनेमाही खूप गाजला. चांगले कलाकार असलेला ‘आपडी थापडी’ची प्रतीक्षा प्रेक्षक करत आहेत.

अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा आईसोबत लालबागचा राजाच्या चरणी लीन

Source link

About Admin

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.
@majhinews1

Check Also

9 वर्षांच्या कठोर परिश्रमानंतर बनलाय ‘ब्रह्मास्त्र’; समोर आला फर्स्ट रिव्ह्यू

मुंबई, 9 सप्टेंबर-   बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर आणि आलिया भट्टचा बहुप्रतीक्षित चित्रपट ‘ब्रह्मास्त्र’ आज …

‘धर्मवीर’ फेम प्रसाद ओक मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या भेटीला, काय आहे कारण?

मुंबई, 9 सप्टेंबर-   मराठी मनोरंजनसृष्टीत सध्या अभिनेता प्रसाद ओकचं नाव चर्चेत आहे. या अभिनेत्याने ‘चंद्रमुखी’ …