रोज खाल्ल्या जाणा-या या 1 पदार्थात ठासून भरलंय रक्ताच्या नसा ब्लॉक करणारं कोलेस्ट्रॉल

बॅड कोलेस्ट्रॉल (Bad cholesterol) एक जीवघेणा पदार्थ आहे, जो रक्ताच्या नसा ब्लॉक करतो. वैद्यकीय भाषेमध्ये याला एलडीएल कोलेस्ट्रॉल (LDL cholesterol) असे म्हटले जाते. याचे प्रमाण जेव्हा वाढते तेव्हा ब्लड सर्क्युलेशन थांबते आणि हृदयविकार सुरू होतो. पण तुम्हाला माहित आहे का की प्रत्येक घरात खाल्ल्या जाणाऱ्या या एका पदार्थामध्ये बॅड कोलेस्ट्रॉल अगदी ठासून भरलेले असते. ते आपण जाणून घेऊयाच.

पण हे त्या आधी जाणून घेऊया की बॅड कोलेस्ट्रॉल का वाढते? तर अन्नामध्ये गुड आणि बॅड दोन्ही फॅट्स असतात. हे खाल्ल्याने गुड आणि बॅड कोलेस्ट्रॉल तयार होते. ऑस्ट्रेलियन राज्य सरकारच्या हेल्थ वेबसाइटनुसार, सॅच्युरेटेड आणि ट्रान्स फॅट्समुळे खराब कोलेस्ट्रॉल निर्माण होते. त्यामुळे शरीरात हृदय, मेंदू आणि नसांच्या अनेक समस्या निर्माण होतात.

कोलेस्टेरॉलची लक्षणे काय आहेत?

गंभीर गोष्ट हीच आहे की शरीरात कोलेस्टेरॉलचे कोणतेच स्पष्ट लक्षण दिसत नाहीत त्यामुळे कोलेस्टेरॉल वाढले आहे का आणि किती वाढले आहे हे आपण लगेच ओळखू शकत नाही. वास्तवात कोलेस्टेरॉल वाढल्याने रक्त वाहिन्या म्हणजेच रक्ताच्या नसांमध्ये अडथळा निर्माण होती आणी त्यामुळे शरीरातील रक्त प्रवाह हा स्लो होतो.या व्यतिरिक्त असे काही संकेत आहेत जे तुमच्या शरीरातील कोलेस्टेरॉल वाढले आहे असे सांगतात. ते संकेत नेमके कोणते आहेत हेच आपण आज या लेखातून जाणून घेणार आहोत.

हेही वाचा :  मुंबईत राहतो जगातील सर्वात श्रीमंत भिकारी; 7.5 कोटींची संपत्ती, उच्चभ्रू भागात आहे आलिशान घर

(वाचा :- Omicron ला घेऊ नका अजिबात हलक्यात, शरीरातील हे महत्त्वाचे अवयव करतोय कायमचे निकामी, ताबडतोब सुरू करा ही 5 कामे)

तुपामध्ये असते सर्वात जास्त बॅड कोलेस्ट्रॉल

NHS ने जाहीर केलेल्या रिपोर्टनुसार, सॅच्युरेटेड फॅटच्या यादीत तूप पहिल्या स्थानावर आहे. कारण, त्यात 50 टक्क्यांहून अधिक सॅच्युरेटेड फॅट असते, जे खराब कोलेस्ट्रॉल बनवते. हेल्थलाइनच्या अहवालानुसार, 14 ग्रॅम तुपात सुमारे 9 ग्रॅम सॅच्युरेटेड फॅट असते. काय बसला ना तुम्हाला सुद्धा धक्का? तुम्ही जे तूप रोज मिटक्या मारून खाता त्याची ही आहे वाईट बाजू जी फार कमी लोकांना माहित आहे. म्हणूनच डॉक्टर व अन्य जाणकार सुद्धा तुपाचे मर्यादित सेवन करण्याचाच सल्ला देतात.

(वाचा :- Food for Strong Bones: हाडांचा संपूर्ण भुगा होईपर्यंत बघू नका वाट, ताबडतोब घरी आणा या 6 गोष्टी आणि बघा कमाल.!)

तूप खाऊच नये?

आता तुम्ही म्हणाल तूप एवढे वाईट आहे मग ते खावे की नाही? तर मंडळी, हे सर्व सर्वस्वी तुमच्यावर अवलंबून आहे. कोणत्याही गोष्टीचा अतिरेक वाईट एवढे लक्षात ठेवा. सॅच्युरेटेड फॅट व्यतिरिक्त तुपात हेल्दी फॅट्स, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन ई, व्हिटॅमिन के, प्रोटीन यांसारखे पोषक घटक असतात जे शरीरासाठी आवश्यक असतात. म्हणूनच आहारातून तूप पूर्णपणे काढून टाकणे योग्य नाही. तुम्ही दररोज मर्यादित प्रमाणात तूप खाऊन बॅड कोलेस्ट्रॉल नियंत्रित करू शकता.

हेही वाचा :  हात आणि हातांच्या बोटांवरून ओळखा घाणेरड्या कोलेस्ट्रॉलची लक्षणे

(वाचा :- Weight Loss: मेणासारखी वितळेल पोटाची चरबी, या वेळात गाढ झोपी गेलात तर जिम व डाएटची गरज नाही – एक्सपर्टचा सल्ला)

एका दिवसात किती तूप सेवन करावे?

यूकेच्या हेल्थ गाईडलाईन्स अनुसार, 19 ते 64 वयोगटातील निरोगी पुरुष दिवसाला 30 ग्रॅम सॅच्युरेटेड फॅटचे सेवन करू शकतात. तर त्याच वयाच्या स्त्रिया एका दिवसात 20 ग्रॅम सॅच्युरेटेड फॅटचे सेवन करू शकतात. याच आधारे एका दिवसात किती तुपाचे सेवन करावे त्याचे प्रमाण ठरवता येते. पण तुम्ही खूप जास्त गोंधळले असाल आणि नक्की काय करावे हे तुम्हाला कळत नसेल तर तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या. ते तुमच्या शारीरिक स्थितीला तपासून योग्य तो सल्ला नक्की देतील.

(वाचा :- किडनी स्टोन, मुतखडा, गुडघेदुखी, हाडांचा चुरा होणं या समस्या झटक्यात होतील दूर,हा पदार्थ ठरेल चमत्कार)

या फूड्सपासून राहा चार हात लांब

  1. लोणी
  2. केक
  3. बिस्किटे
  4. बेकन मांस
  5. चीज
  6. पेस्ट्रीज
  7. आईस्क्रिम
  8. मिल्क शेक
  9. चॉकलेट

(वाचा :- Omicron Symptom: जगभरात कहर माजवलेल्या ओमिक्रॉन BF.7 चं मुख्य लक्षण Hyposmia, नाकात होते वाढ, कसे ओळखावे संकेत)

कोलेस्ट्रॉल बाहेर फेकणारे फुड्स

जर शरीरात बॅड कोलेस्ट्रॉल वाढले असेल तर लसूण, भेंडी, वांगी, फरसबी, केळी, कांदा आणि फायबरयुक्त पदार्थ अशा हेल्दी फॅट्स असणाऱ्या गोष्टींचे आहारातून सेवन करावे. कारण, हेल्दी फॅट्स शरीरातील बॅड कोलेस्टेरॉल नष्ट करण्यास मदत करतात आणि फायबर त्यांना बाहेर काढतात. त्यामुळे तुम्हाला जर बॅड कोलेस्ट्रॉलं वाढल्याचे कळले तर उपाय म्हणून ह्या पदार्थांचा आहारात समावेश करायला सुरुवात करा. तुम्हाला लवकरच फरक दिसेल आणि तुम्ही ह्या समस्येपासून मुक्त व्हाल.

हेही वाचा :  Guava For Cholesterol : घाणेरडं कोलेस्ट्रॉल कमी करतोय पेरू, नसा साफ होण्यासाठी ठरतोय वरदान

(वाचा :- पोट साफ होण्यासाठी व इम्युनिटी वाढवण्यासाठी औषधासमान आहेत या 5 भाज्या, रोज खाल्लं तर करोना स्पर्शही करणार नाही)

टीप : हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी असून यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. अधिक जास्त माहितीसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य ते बदल करा.

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Video: दाभोसा धबधब्यावर स्टंटबाजी, 120 फुटावरुन दोन तरुणांची उडी, एकाचा मृत्यू

Palghar News Today: मे महिन्यात शाळ- कॉलेजना सुट्ट्या लागतात. त्यामुळं अनेकजण पर्यटनासाठी बाहेर पडतात. पालघर …

Akola News : मुलांची काळजी घ्या! कुलरचा शॉक लागून 7 वर्षीय चिमुकलीचा मृत्यू

जयेश जगड, झी मीडिया, अकोला (Akola News in Marathi) : विदर्भ, मराठवाड्यासह राज्यात उन्हाचा तडाखा दिवसेंदिवस वाढतोय. अशात …