बापरे, नसांमध्ये कॉलेस्ट्रॉल साचल्यास येतो हार्ट अटॅक,नसा व आतड्यातून कोलेस्ट्रॉल झटक्यात बाहेर फेकतात हे उपाय

एलडीएल कोलेस्ट्रॉल (LDL Cholesterol) एक वाईट आणि खराब पदार्थ आहे, जे शरीरातही निरुपयोगी मानले जाते. शरीरासाठी या घटकाचे कोणतेही उपयुक्त कार्य नाही. हे एचडीएल कोलेस्ट्रॉल (HDL Cholesterol) अर्थात चांगल्या कोलेस्ट्रॉलपेक्षा विरुद्ध प्रकारचे असते. आपले लिव्हर हे चांगले आणि आवश्यक कोलेस्ट्रॉल पुरेशा प्रमाणात तयार करत राहते. पण चरबीयुक्त अन्नपदार्थ खाल्ल्याने खराब कोलेस्टेरॉल वाढते आणि ते नंतर नसांमध्ये जमा होते.

सॅच्युरेटेड आणि ट्रान्स फॅट असलेल्या खाद्यपदार्थांच्या सेवनामुळे धोकादायक कोलेस्ट्रॉल वाढू लागते. लोणी, तूप, मांस, चीज, दुग्धजन्य पदार्थ, आइस्क्रीम, खोबरेल तेल इत्यादी खाद्यपदार्थांमध्ये अशी चरबी अर्थात फॅट आढळते. ज्यामुळे हाय डेंसिटी असलेले लिपोप्रोटीन कोलेस्ट्रॉल वाढू शकते आणि हे शरीरासाठी धोकादायक असते. अनेकजण याच गोष्टीकडे लक्ष देत नाहीत वा त्यांना याबद्दल जागरूकताच नसते त्यामुळे शरीरावर त्याचा वाईट परिणाम होऊ लागतो आणि शरीर अनेक आजारांना बळी पडते. कधी कधी तर जीवघेणी स्थिती सुद्धा निर्माण होऊ शकते.

हृदयाजवळ पोहचू देऊ नका कोलेस्ट्रॉल

उच्च कोलेस्ट्रॉलमुळे नसांमध्ये चिकट पदार्थ जमा होतात. जेव्हा त्याचे प्रमाण नसांमध्ये खूप जास्त होते तेव्हा यामुळे रक्तवाहिन्या बंद होतात आणि रक्त पुरेशा प्रमाणात वाहू शकत नाही. अनेक वेळा हा पदार्थ तुटून हृदयाजवळ पोहोचतो आणि नसा बंद झाल्याने हृदयविकाराचा झटका येतो. म्हणूनच कोलेस्ट्रॉलवर लक्ष ठेवले पाहिजे आणि अशी स्थिती आपल्या शरीरात निर्माण होऊ नये म्हणून सतर्क राहिले पाहिजे.

हेही वाचा :  रक्तातील घाणेरडे कोलेस्ट्रॉल गाळून बाहेर फेकतात हे ५ पदार्थ, LDL रक्तात पोहचत नाही

(वाचा :- Remedies for Cough: घसा व छातीतील जमा कफ बाहेर फेकून कोरडा व ओला खोकला होईल कायमचा छुमंतर, फक्त करा हे 6 उपाय)

फायबरयुक्त पदार्थ खाण्यावर द्यावा भर

फायबरयुक्त पदार्थ खाल्ल्याने कोलेस्ट्रॉलची पातळी वाढत नाही. NCBI वर प्रकाशित केलेल्या संशोधनात असे म्हटले आहे की, विरघळणारे फायबर हे कोलेस्ट्रॉलला आतड्यांमध्येच बांधून ठेवते आणि ते विष्ठेच्या रूपात शरीरातून बाहेर काढले जाते. म्हणूनच एकूण आणि खराब कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी फायबर युक्त गोष्टी खाल्ल्या पाहिजेत. जेणेकरून शरीरातील कोलेस्ट्रॉलचे प्रमाण नियंत्रणात राहिल आणि वाईट कोलेस्ट्रॉल वाढणार नाही.

(वाचा :- Lung Cancer Symptoms: फुफ्फुसांत दिसली ही लक्षणं तर समजून जा झालाय लंग कॅन्सर, फक्त 5 महिनेच जगण्याचे चान्सेस)

खूप सफरचंद खा

हेल्थलाइननुसार, एका मध्यम आकाराच्या सफरचंदात 1 ग्रॅम विरघळणारे फायबर असते. म्हणूनच आहारात सफरचंद खाल्ल्याने वाईट कोलेस्ट्रॉल कमी होऊ शकते. तुम्ही दररोज 1-2 सफरचंद आरामात खाऊ शकता. याच कारणामुळे म्हणतात की एक सफरचंद रोज खाल्ले तर तुम्हाला डॉक्टरकडे जाण्यची गरज नाही. कारण अनेक आजार हे कोलेस्टेरॉलची निगडीत असतात आणि सफरचंद हे कोलेस्ट्रॉलला रोखते. जर तुम्ही सफरचंद खात नसाल तर आहारात त्याचा समावेश करायला सुरुवात करा.

हेही वाचा :  काहीही खाल्लं की लगेच फुगतं पोट? मग गॅस व अॅसिडीटी चुटकीसरशी दूर करतात या 5 गोष्टी, आजच करा

(वाचा :- Sleep Fact : टाचणीचा आवाजही गाढ झोपेतून करत असेल तुम्हाला जागं तर व्हा सावध, कधीही होऊ शकतात हे 4 गंभीर आजार)

गाजर देखील आहेत फायदेशीर

थंडीत उपलब्ध होणाऱ्या गाजरांमध्ये डायट्री फायबरचे प्रमाण जास्त असते. म्हणूनच गाजर खाल्ल्याने नसांमध्ये घाण जमा होण्यापासून बचाव होतो. 128 ग्रॅम गाजरांमध्ये सुमारे 2.4 ग्रॅम विरघळणारे फायबर असते. म्हणून आहारात आवर्जून गाजरांचा समावेश करा आणि हेल्दी राहण्यावर भर द्या.

(वाचा :- सकाळी उठून ही कामे केल्याने रॉकेटच्या स्पीडने धावतो मेंदू, वयाच्या शंभरीपर्यंत स्मरणशक्तीला धक्काही लागत नाही)

वाटाणे, ओट्स आणि ईसबगोल सुद्धा ठरतील उपयुक्त

वाटाणे आणि ओट्समध्ये देखील विद्राव्य अर्थात विरघळणारे फायबर असते. वाटाणे आणि ओट्स शिजवून अन्न म्हणून तुम्ही खाऊ शकता. यांमध्ये अन्य चांगले घातक आणि पोषक तत्व असल्याने त्याचा सुद्धा शरीराला खूप फायदा होतो. त्यामुळे आवर्जून वाटाणे आणि ओट्स आहारात समाविष्ट करा आणि बघा तुम्हालाच त्याचा फायदा दिसून येईल. तर मंडळी, असं आहे हे कोलेस्ट्रॉलचे गौडबंगाल आणि त्यापासून तुम्हाला स्वत:चा बचाव करायचा असेल तर न चुकता आपल्या आहाराकडे लक्ष द्या आणि हेल्दी पदार्थ खाण्यावर अधिकाधिक भर द्या.

हेही वाचा :  लिव्हर सडल्यामुळे बनतं Cholesterol, हा एक उपाय गाळून फेकतो शरीरातील घाण व विषारी पदार्थ

(वाचा :- भारतीय एअरपोर्टवरील तब्बल 200 प्रवाशांत सापडला Omicron BF.7, जगायचं असेल तर दिवसभर करा ही कामे – आयुष मंत्रालय)

टीप : हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी असून यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. अधिक जास्त माहितीसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य ते बदल करा.

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

पंकजा मुंडे बीडमध्ये भाजपचा बालेकिल्ला राखणार का? जनतेचा कौल कोणाला?

Beed Loksabha Constituency Special Report : राज्यात लोकसभा निवडणुकांचे बिगुल वाजलं आहे. आतापर्यंत महाराष्ट्रातील दोन …

ठाण्यात सापडल्या ईव्हीएम मशीन आणि हजारो मतदान कार्ड, घोटाळ्याचा संशय?

Loksabha 2024 : ठाण्यातील दादोजी कोंडदेव स्टेडियममध्ये निवडणूक साहित्य, EVM आणि हजारो मतदानकार्ड आढळून आल्याने …