फेब्रुवारीत करोना रुग्णांचे मृत्यू अधिक !


नागपूर : सार्वजिनक आरोग्य विभागाच्या एकात्मिक रोग सव्‍‌र्हेक्षण कार्यक्रम अहवालानुसार, महाराष्ट्रात जानेवारी २०२२ मध्ये करोनाच्या एकूण रुग्णांच्या तुलनेत ०.१० टक्के रुग्णांचा मृत्यू झाला होता. हे प्रमाण फेब्रुवारी- २०२२ मध्ये ०.७० टक्के आहे.

राज्यात १ जानेवारी ते ३१ जानेवारी २०२२ दरम्यान करोनाचे १० लाख ३३ हजार ११८ रुग्ण आढळले.  या काळात १,०७८ रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे रुग्णांच्या तुलनेत मृत्यूचे प्रमाण ०.१० टक्के नोंदवले गेले. ३१ जानेवारीला राज्यात सक्रिय रुग्णसंख्या २ लाख ७ हजार ३५० होती.  राज्यात १ फेब्रुवारी ते १८ फेब्रुवारी २०२२ दरम्यान करोनाचे १ लाख १९ हजार ८७८ रुग्ण आढळले.  या काळात ८४२ रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे मृत्यूचे प्रमाण ०.७० टक्के नोंदवले गेले. दरम्यान, करोना नियंत्रणात येत असल्याने १८ फेब्रुवारीला राज्यात सक्रिय रुग्णसंख्या  २१ हजार १५९ रुग्ण इतकी खाली आली.  राज्यात मार्च २०२० ते ३१ डिसेंबर २०२१ पर्यंत करोनाचे ६६ लाख ७८ हजार ८२१ रुग्ण आढळले होते. यापैकी उपचारादरम्यान १ लाख ४१ हजार ५२६ रुग्ण दगावले. त्यामुळे यावेळी मृत्यूचे प्रमाण २.११ टक्के नोंदवले गेले होते. त्यामुळे पहिल्या दोन लाटेच्या तुलनेत तिसऱ्या लाटेत करोनाचा मृत्युदर खूपच कमी आहे.

हेही वाचा :  धावत्या रेल्वेत अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न करणाऱ्या विकृताला अटक

The post फेब्रुवारीत करोना रुग्णांचे मृत्यू अधिक ! appeared first on Loksatta.

Source link

About Admin

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

“मराठी कलाकार स्वत: सेटवर हिंदीत बोलतात”, अजय-अतुलच्या जोडीतील अतुलने केली तक्रार

मराठी राजभाषा दिनाच्या निमित्तानं दिलेल्या मुलाखतती अतुलने ही तक्रार केली आहे. दिग्दर्शक नागराज मंजुळे आणि …

Russia – Ukraine War : ठाणे जिल्ह्यातील ३१ विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकले

हे सर्व विद्यार्थी वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी युक्रेनमध्ये गेलेले आहेत. ठाणे जिल्ह्यातील विविध शहरांमधील ३१ विद्यार्थी …