लिव्हर सडल्यामुळे बनतं Cholesterol, हा एक उपाय गाळून फेकतो शरीरातील घाण व विषारी पदार्थ

शरीराला कोलेस्टेरॉलची गरज असते. हा एक मेणासारखा पदार्थ असतो जो रक्तात आढळतो. निरोगी पेशी तयार करण्यासाठी शरीर याचा वापर करते. लिव्हर शरीराला आवश्यक असते तेवढे कोलेस्टेरॉल तयार करते. लिव्हरने तयार केलेले कोलेस्ट्रॉल चांगले असते ज्याला आपण एचडीएल कोलेस्ट्रॉल(HDL Cholesterol) म्हणतो. पण सॅच्युरेटेड फॅट आणि ट्रान्स फॅट असलेले अन्नपदार्थ खाल्ल्याने खराब कोलेस्ट्रॉल शरीरात पोहोचते. रक्तामध्ये पोहोचल्यानंतर ते नसांमध्ये साचते आणि यामुळे हार्ट अटॅक व हार्ट स्ट्रोकचा धोका निर्माण होतो.

वाईट कोलेस्ट्रॉल काढून टाकण्याचे कामही लिव्हरच करते. पण लिव्हरने नीट काम करणं थांबवलं किंवा लिव्हर कमकुवत झालं तर वाईट कोलेस्टेरॉल वाढू लागतं. तर यावर तुम्ही मात करू शकता आणि हे कोलेस्टेरॉल वाढण्यापासून रोखू शकता. पण त्यासाठी काही गोष्टी तुम्हाला माहित असायला हव्यात आणि त्याच आपण आज या लेखातून जाणून घेणार आहोत.

वाईट कोलेस्टेरॉल संपवणारे व्यायाम

NCBI वर प्रकाशित झालेल्या एका संशोधनात असे म्हटले आहे की, खराब कोलेस्टेरॉल दूर करण्यासाठी रेजिस्टेंस ट्रेनिंग फायदेशीर असते. याला वेट ट्रेनिंग असे देखील म्हणतात. परंतु तुम्हाला असा व्यायाम करावा लागेल, ज्यामध्ये वजनापेक्षा जास्त रिपीटेशनवर (व्यायाम वा पुनरावृत्ती) भर दिला जाईल. त्यामुळे तुम्ही कोण्या जाणकाराचा सल्ला घेऊन त्यानुसार असे खास व्यायाम करायला हवेत.

हेही वाचा :  घाणेरडं कोलेस्ट्रॉल मुळापासून उपटून फेकून १०० च्या स्पीडने धावेल रक्त, फक्त दररोज खा १० पदार्थ

(वाचा :- हे 4 घरगुती पदार्थ खाऊन 98 किलोच्या मुलाने घटवलं तब्बल 33 किलो वजन, थट्टा उडवणारेही विचारतत Weight Loss Secret)

पुश अप्सने कमी होते हाय-कोलेस्टेरॉल

पुश-अप हा शरीराचा वजनाचा अर्थात एक बॉडीवेट व्यायाम आहे जो घरी आरामात करता येतो. यामध्ये व्यायामाच्या पुनरावृत्तीकडे अर्थात रिपीटेशन वर भर दिला जातो. लक्षात ठेवा की पुश-अप देखील रेजिस्टेंस ट्रेनिंगच्या अंतर्गत येते. त्यामुळे तुम्ही पुश-अप्स करत असाल तर अधिक उत्तम, पण नसाल करत तर करायला सुरुवात करा, यामुळे तुम्हाला खुप फायदा होईल.

(वाचा :- ही चूक करणा-यांनो सावधान, एकाचवेळी होतील 6 आजार व सडवतील आतील पूर्ण शरीर, Ayurveda Dr च्या 3 महत्वपूर्ण गोष्टी)

पुश-अप्स करण्याची योग्य पद्धत

  1. पुश-अप्स करण्यासाठी प्रथम हाय प्लेंकच्या स्थितीत या.
  2. आता श्वास घेत घेत छाती जमिनीच्या दिशेने न्या.
  3. लक्षात ठेवा की छाती जमिनीवर ठेवावी लागते आणि गुडघे वाकलेले नसावेत.
  4. याशिवाय हिप्स, कंबर आणि मान एका सरळ रेषेत असावी आणि टक लावून समोरच पाहावे.
  5. त्यानंतर एक सेकंद थांबल्यानंतर श्वास सोडताना हाय प्लेंकच्या स्थितीत परत यावे.
  6. हा झाला एक रेप्स आता त्याच पद्धतीने तुम्हाला जमतील तेवढे रेप्स करा.
  7. अशा रेप्सचे तुम्ही एकूण 3 सेट करू शकता.
हेही वाचा :  Symptoms of High Cholesterol : कोलेस्ट्रॉल वाढल्यावर येऊ शकतो हार्ट अटॅक, कोलेस्ट्रॉल वाढल्यास डोळ्यांवर दिसतात 'ही' लक्षणे, लगेच करा चेकअप!

(वाचा :- Diabetes Symptoms : डायबिटीज झाला असेल तर सकाळी दिसतात ही 7 भयंकर लक्षणं, दुर्लक्ष करत असाल तर मृत्यू आलाय जवळ)

वाढते गुड कोलेस्टेरॉल

व्यायाम केल्याने रक्तातील चांगले कोलेस्टेरॉल वाढते. बीएमसीमध्ये प्रकाशित झालेल्या संशोधनात असे आढळून आले की, ज्या महिलांनी जास्त शारीरिक हालचाली केल्या त्यांच्यामध्ये एचडीएल कोलेस्टेरॉलचे प्रमाण कमी शारीरिक हालचाली करणाऱ्या स्त्रियांपेक्षा जास्त होते. हीच गोष्ट सिद्ध करते की जेवढी तुम्ही शारीरिक हालचाल कराल तेवढा तुम्हाला जास्त फायदा होईल आणि तुमचे कोलेस्टेरॉल उत्तम राहील.

(वाचा :- Vicky Kaushal Weight Loss: बर्गर-पिझ्झा खाऊन वेटलॉस करणा-या विकी कौशलवर तुम्हीही जळाल, सिक्रेट वेटलॉस फंडा उघड)

कोलेस्टेरॉल कमी करणारे अन्य व्यायाम

बारबेल-डंबेल वर्कआउट, धावणे पोहणे इ. व्यायाम सुद्धा तुम्ही करू शकता आणि याचा एक मोठा फायदा तुम्हाला पहायला मिळेल. वाईट कोलेस्ट्रॉल वाढल्याने रक्ताभिसरण कमी होऊ लागते, त्यामुळे अवयवांना पुरेसे पोषण मिळत नाही आणि ते कमकुवत होऊ लागतात. म्हणूनच वाईट कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी पुश-अप, बारबेल-डंबेल वर्कआउट, धावणे पोहणे असे व्यायाम करा.

(वाचा :- Ayurveda Weight Loss : आयुर्वेद डॉ दावा – फक्त तीन आठवड्यांत जळून जाईल शरीरातील सर्व चरबी, फॉलो करा या 5 टिप्स)

हेही वाचा :  Summer foods for Cholesterol : सावधान, वाढलेल्या कोलेस्ट्रॉलमुळे वाढतो हार्ट स्ट्रोक व हार्ट अटॅकचा धोका, आताच खायला घ्या ‘हे’ 6 पदार्थ!

डिस्क्लेमर: हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी असून यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. अधिक जास्त माहितीसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य ते बदल करावा.

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Raj Thackeray : ‘नारायण राणे मुख्यमंत्री झाले अन्…’, राज ठाकरेंनी भरसभेत घेतली फिरकी; सांगितला ‘तो’ किस्सा!

Raj Thackeray Kankavli Sabha : एकेकाळचे दोन शिवसैनिक आज तब्बल 20 वर्षांनी एकाच मंचावर दिसले. …

Maharastra Politics : कोकणात ‘ह्याका गाड, त्याका गाड’… तो काय गाडणार? ठाकरेंवर राणेंचा ‘प्रहार’

Uddhav Thackeray vs Narayan Rane : कोकणात लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं उद्धव ठाकरे विरुद्ध नारायण राणे …