काहीही खाल्लं की लगेच फुगतं पोट? मग गॅस व अॅसिडीटी चुटकीसरशी दूर करतात या 5 गोष्टी, आजच करा

पोट फुगणं ही एक सामान्य समस्या आहे, जी अनेकदा जड आहार घेतल्याने, प्रमाणापेक्षा जास्त खाल्ल्यामुळे किंवा सोडा घातलेले पदार्थ खाल्ल्यानंतर उद्भवतो. या त्रासात इतका त्रास होतो की पोट फुटेल असं वाटू लागतं. ही एक अतिशय अस्वस्थ स्थिती आहे, ज्यामुळे पोटात सुद्धा दुखतं जे असह्य होणारं असू शकतं. थोडथोडकं काहीही खाल्ल्यानंतर पोट फुगत असेल तर खाली दिलेल्या घरगुती उपायांनी ते टाळता येऊ शकते. डायटीशियन मनप्रीत यांनी पोटफुगीवर अत्यंत साध्यासोप्या अशा घरगुती उपायांची माहिती दिली आहे.

​जेवण चावून चावून खा

डाएटिशियनच्या मते, अन्न व्यवस्थित 32 वेळा चावून चावून खाल्ले पाहिजे. असे केल्याने खाल्लेल्या अन्नाचे पचन लवकर होते आणि शरीराच्या प्रत्येक अवयवाला संपूर्ण पोषण मिळते. अन्नाचे पचन व्यवस्थित झाले की पोट फुगण्याची समस्या उद्भवत नाही.

​जेवणाच्या 30 मिनिटे आधी लिंबूपाणी प्या

-30-

लिंबू पोटासाठी खूप चांगले मानले जाते. म्हणूनच जेवण्यापूर्वी ३० मिनिटे लिंबू पाणी जरूर प्यावे. लिंबू पाणी तुमची पचनसंस्था शांत करून शरीरातील पीएच लेव्हल संतुलित करते.

हेही वाचा :  Old Pension : राज्यात जुन्या पेन्शनवरुन वादाला तोंड, नेमकी काय आहे 'ही' योजना ?

​दही आणि पुदीना

दुपारच्या जेवणात दह्यात काही पुदिन्याची पाने मिसळून ते दही खा. हा उपाय तुमच्या पोटातील पाचक एंजाइम्स सक्रिय करतो आणि पचनक्रिया सुधारून ती जलद गतीने होण्यास मदत करतो.

​डाळीत हिंग घाला

काही कडधान्यांचे सेवन केल्याने पोट फुगण्याची तक्रार होऊ शकते. हे टाळण्यासाठी डाळीत न विसरता चिमूटभर तरी हिंग जरूर घाला. हिंगामुळे पचनशक्ती वाढते, त्यामुळे अन्न लवकर पचते आणि पोट फुगण्याची, गॅस व अॅसिडीटीची समस्याही होत नाही.

​झोपण्याआधी प्या गुलकंद घातलेले दूध

रात्री झोपण्यापूर्वी गुलकंद घातलेले दूध अवश्य प्यावे. हा घरगुती उपाय तुमच्या पचनसंस्थेला शांत करून शरीरातील पीएच लेव्हल संतुलित करतो. शिवाय गुलकंद घातलेले दूध चवीला अत्यंत स्वादिष्ट लागते.

टीप : हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. हे कोणत्याही प्रकारे कोणत्याही औषधाचा किंवा उपचारांचा पर्याय असू शकत नाही. अधिक माहितीसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

‘माझ्याकडे चीप..ईव्हीएम हॅक करतो’ दीड कोटींचा सौदा; धक्कादायक कहाणी

EVM Machine Hack call: देशभरात लोकसभा निवडणुकीसाठी मतदान सुरु आहे.  ईव्हीएम मशिनच्या माध्यमातून हे मतदान …

पत्नीचं हॉस्पिटलचं बिल पाहून पतीचं धक्कादायक कृत्य, थेट ICU मध्ये गेला अन्…

पतीने रुग्णालयातच पत्नीची गळा दाबून निर्घृणपणे हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अमेरिकेत हा …