‘आईचे दागिने आणि ज्वेलरी…’ स्वरानं लग्नानंतर शेअर केली खास पोस्ट

Swara Bhasker: अभिनेत्री स्वरा भास्कर (Swara Bhasker) ही फहाद अहमदसोबत (Fahad Ahmad) विवाहबद्ध झाली. फहाद  हा सामाजिक कार्यकर्ता असून समाजवादी पक्षाची युवक आघाडी असलेल्या समाजवादी युवजन सभा या संघटनेचा महाराष्ट्र अध्यक्ष आहे. स्वरानं नुकतेच फहादसोबतचे काही खास फोटो शेअर केले आहेत. तिनं या फोटोला खास कॅप्शन देखील दिलं आहे. 

स्वराची पोस्ट

स्वरानं फहादसोबतचे फोटो ट्विटरवर शेअर केले. या फोटोला तिनं कॅप्शन दिलं, ‘थ्री चीअर्स फॉर स्पेशल मॅरेज अॅक्ट. ते अस्तित्वात आहे आणि ते प्रेमाला संधी देते. प्रेम करण्याचा अधिकार, तुमचा जीवन साथीदार निवडण्याचा अधिकार, लग्न करण्याचा अधिकार.’

स्वरानं दुसऱ्या पोस्टमध्ये लिहिलं, ‘कुटुंब, मित्रांच्या प्रेमाने आणि त्यांच्या पाठिंब्यानं आनंद मिळाला. माझ्या आईची साडी आणि तिचे दागिने घातले. आम्ही स्पेशल मॅरेज अॅक्टच्या अंतर्गत नोंदणी केली. आता धुमधडाक्यात लग्न करण्याची तयारी करत आहोत.’

काय आहे स्पेशल मॅरेज अॅक्ट?
स्पेशल मॅरेज अॅक्ट  1954 मध्ये आंतरजातीय आणि आंतरधर्मीय विवाह करण्यास परवानगी दिली जाते. या कायद्यामध्ये ज्या जोडप्याला विवाह बंधनात अडकायचे आहे, त्याला रजिस्टर लग्न  करण्याच्या आधी 30 दिवस आपली कादपत्रे आणि अर्ज द्यावा लगातो. अर्ज प्राप्त झाल्यावर जोडप्याला लग्न  रजिस्टर करण्यासाठी 30 दिवसांचा कालावधी दिला जातो. 30 दिवसानंतर जोडप्याची परवानगी असेल तर ते लग्न रजिस्टर केले जाते. 

हेही वाचा :  MC Stan :'Bigg Boss 16'चा विजेता एमसी स्टॅन कोण आहे?

स्वरा तिच्या अभिनयानं नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकते. विरे दी वेडींग, गुजारिश, तन्नू वेड्स मनू, रांझणा, तनू वेड्स मनू रिटर्न्स, प्रेम रतन धन पायो, नील बट्टे सन्नाटा या चित्रपटांमधून स्वराच्या अभिनयाला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली.

महत्वाच्या इतर बातम्या: 

Swara Bhasker: स्वरा भास्कर अडकली विवाह बंधनात; फहाद अहमदसोबत बांधली लग्नगाठ



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

सुष्मितानं मानले डॉक्टरांचे आभार; पोस्ट शेअर करत म्हणाली, ’95 टक्के ब्लॉकेज होते…’

Sushmita Sen: बॉलिवूडमधील (Bollywood) प्रसिद्ध अभिनेत्री सुष्मिता सेन (Sushmita Sen) गेल्या काही दिवसांपासून तिच्या वैयक्तिक …

थोडक्यात बचावला ए. आर. रहमान यांचा मुलगा अमीन

A. R. Ameen: प्रसिद्ध संगीतकार  ए. आर. रहमान (A. R. Rahman) यांच्या गाण्यांना प्रेक्षकांची पसंती …