‘कांतारा’च्या 100 दिवसांचे सेलिब्रेशन करत ऋषभ शेट्टीने सिनेमाच्या प्रीक्वेलची केली घोषणा

Rishabh Shetty Announced Kantara Prequel : ‘कांतारा’ (Kantara) हा सिनेमा गेल्या काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीला आला असून अल्पावधीतच हा सिनेमा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. नुकतेच या सिनेमाने सिनेमागृहात 100 दिवस पूर्ण केले आहेत. आता सिनेमागृहात 100 दिवस पूर्ण होताच या सिनेमाचा दिग्दर्शक ऋषभ शेट्टीने (Rishabh Shetty) या सिनेमाच्या प्रीक्वलची घोषणा केली आहे. 

‘कांतारा’चे सिनेमागृहात 100 दिवस पूर्ण!

‘कांतारा’ हा सिनेमा प्रदर्शित होऊन 100 दिवस पूर्ण झाले असले तरी चाहत्यांमध्ये या सिनेमाची क्रेझ कायम आहे. गेल्या काही दिवसांपासून ‘कांतारा’चा दुसरा भाग (Kantara 2) येणार असल्याची चर्चा होत होती. पहिल्या भागाला मिळालेल्या यशानंतर प्रेक्षक या सिनेमाच्या सीक्वलची प्रतीक्षा करत होते. अखेर या सिनेमाच्या सीक्वलची घोषणा न करता प्रीक्वलची घोषणा करण्यात आली आहे.

ऋषभ शेट्टीने केली ‘कांतारा’च्या प्रीक्वलची घोषणा!

‘कांतारा’ या बहुचर्चित सिनेमाचं लेखक, दिग्दर्शन ऋषभ शेट्टीने केलं आहे. तसेच या सिनेमात त्याच्या अभिनयाची जादूदेखील पाहायला मिळाली आहे. आता या सिनेमाच्या प्रीक्वलची घोषणा करत ऋषभ शेट्टी म्हणाला,”कांतारा’ या सिनेमावर प्रेम केल्याबद्दल सर्वच प्रेक्षकांचे खूप खूप आभार. तुम्ही सिनेमाला पसंती दर्शवल्यामुळे या सिनेमाने सिनेमागृहात 100 दिवसांचा टप्पा पार केला आहे”. 


ऋषभ शेट्टी पुढे म्हणाला,”कांतारा’ सिनेमात जे होतं तो कथानकाचा दुसरा भाग आहे. पुढील वर्षात या सिनेमाचा दुसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘कांतारा’च्या शूटिंगदरम्यानच या सिनेमाच्या प्रीक्वलबद्दल मी विचार करत होतो. सध्या या सिनेमाच्या कथानकावर काम सुरू आहे. लवकरच सिनेमासंदर्भात अधिक माहिती देईल”. 

हेही वाचा :  The Kashmir Files : 'द कश्मीर फाइल्स'चा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ, तीन राज्यांत करमुक्त

कांताराचे निर्माते विजय किरागंदुर म्हणाले,”कांतारा’ या सिनेमाचा जॉनर थोडा वेगळा असल्याने हा सिनेमा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. या सिनेमाच्या कथानकापासून शूटिंगपर्यंत सर्व गोष्टींवर या सिनेमाच्या टीमने मेहनत घेतली आहे. त्यामुळेच हा सिनेमा यशस्वी झाला. आता या सिनेमाच्या प्रीक्वलच्या तयारीला सुरुवात करत असून लवकरच हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज होईल”. 

प्रेक्षक अजूनही ‘कांतारा’बद्दल उत्साही असतानाच या सिनेमाच्या सिक्वेलच्या अफवांमुळे प्रेक्षकांची उत्कंठा आणखी वाढली आहे. सिनेमाला मिळालेल्या उदंड यशानंतर, प्रेक्षक याच्या सिक्वेलच्या घोषणेची वाट पाहत असतानाच, निर्मात्यांनी आता अखेर सिनेमाच्या प्रीक्वेलची घोषणा केली आहे.

संबंधित बातम्या

Rishab Shetty Kantara:  कांताराची सेंच्युरी; थिएटरमध्ये पूर्ण केले 100 दिवस, निर्मात्यांची खास पोस्ट



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

सुष्मितानं मानले डॉक्टरांचे आभार; पोस्ट शेअर करत म्हणाली, ’95 टक्के ब्लॉकेज होते…’

Sushmita Sen: बॉलिवूडमधील (Bollywood) प्रसिद्ध अभिनेत्री सुष्मिता सेन (Sushmita Sen) गेल्या काही दिवसांपासून तिच्या वैयक्तिक …

थोडक्यात बचावला ए. आर. रहमान यांचा मुलगा अमीन

A. R. Ameen: प्रसिद्ध संगीतकार  ए. आर. रहमान (A. R. Rahman) यांच्या गाण्यांना प्रेक्षकांची पसंती …