Most Searched South Films : जाणून घ्या 2022 मध्ये सर्वाधिक सर्च केलेले Top 10 Movies

Most Searched South Films : सिनेसृष्टीसाठी 2022 हे वर्ष खूपच खास ठरलं आहे. या वर्षात अनेक बिग बजेट सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीला आले. या सिनेमांनी बॉक्स ऑफिसवर चांगलाच धमाका केला. पण यावर्षी बॉलिवूड आणि प्रादेशिक सिनेमांपेक्षा दाक्षिणात्य सिनेमांचा (South Movies) बोलबाला पाहायला मिळाला. गूगलने (Google) नुकतीच यावर्षात सर्वाधिक सर्च होणाऱ्या सिनेमांची आकडेवारी जाहीर केली आहे. जाणून घ्या टॉप 10 (Top 10) सिनेमे कोणते आहेत…

जगभरात दाक्षिणात्य सिनेमांनी चांगलीच हवा केली आहे. 2022 मध्ये काही सिनेमे सिनेमागृहात प्रदर्शित झाले तर काही ओटीटी प्लॅटफॉर्मवर. काही सिनेमाचं कथानक उत्तम असून, त्या सिनेमांत तगडी स्टारकास्ट असूनही हे सिनेमे हे सिनेमे प्रेक्षकांच्या पसंतीस उतरण्यात कमी पडले. तर दुसरीकडे निर्मात्यांनी आपल्या सिनेमांचं जोरदार प्रमोशन करुनही प्रेक्षकांची पाऊले सिनेमागृहाकडे वळालीच नाहीत. 

गूगने जाहीर केलेल्या सर्वाधिक सर्च केलेल्या ‘टॉप 10’ सिनेमांच्या यादीत सहा सिनेमे हे दाक्षिणात्य आहेत. या यादीत ‘केजीएफ: चॅप्टर 2’ (KGF : Chapter 2) हा अॅक्शनपट दुसऱ्या स्थानावर आहे. तर एसएस राजामौलींचा (SS Rajamouli) ‘आरआरआर’ (RRR) हा सिनेमा चौथ्या क्रमांकावर आहे. तर ऋषभ शेट्टीचा (Rishab Shetty) ‘कांतारा’ (Kantara) हा सिनेमा या शर्यतीत पाचव्या स्थानावर आहे. 

हेही वाचा :  सचिन तेंडुलकरनंतर आता सोनू सूद डीप फेकच्या जाळ्यात, शेअर केला व्हिडिओ

रश्मिका मंदान्ना (Rashmika Mandanna) आणि अल्लू अर्जुनचा (Allu Arjun) बहुचर्चित ‘पुष्पा: द राइज’ (Pushpa : The Rise) हा सिनेमा 2020 मधील सर्वाधिक सर्च केला जाणारा सहावा सिनेमा ठरला आहे. तर सातव्या स्थानावर कमल हासनचा (Kamal Haasan) ‘विक्रम’ (Vikram) हा सिनेमा आहे. 

News Reels

2022 मध्ये सर्वाधिक सर्च केलेले दहा सिनेमे (Top 10 Movies) : 

1. ब्रम्हास्त्र : पार्ट वन (Brahmastra : Part One)
2. केजीएफ : चॅप्टर 2 (KGF : Chapter 2)
3. द कश्मीर फाइल्स (The Kashmir Files)
4. आरआरआर (RRR)
5. कांतारा (Kantara)
6. पुष्पा: द राइज (Pushpa : The Rise)
7. विक्रम (Vikram)
8. लाल सिंह चड्ढा (Laal Singh Chaddha)
9. दृश्यम 2 (Drishyam 2)
10. थोर: लव्ह अॅन्ड थंडर (Thor : Love And Thunder)

‘आरआरआर’ची (RRR) आंतरराष्ट्रीय घोडदौड!

‘आरआरआर’ (RRR) या सिनेमाने भारतीय बॉक्स ऑफिसवर चांगलंच कलेक्शन केलं होतं. हा सिनेमा सातासमुद्रपलीकडेदेखील खूप गाजला. हा सिनेमा जगभरातील सिनेप्रेक्षकांच्या पसंतीस उतरला. हॉलिवूड क्रिटिक्स असोसिएशनतर्फे या सिनेमाला दोन मानाच्या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. 

संबंधित बातम्या

Youtube Top 10 Music Videos : 2022 मध्ये ‘पुष्पा’ ची हवा; युट्यूबकडून टॉप-10 म्युझिक व्हिडीओची यादी जाहीर

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

सुष्मितानं मानले डॉक्टरांचे आभार; पोस्ट शेअर करत म्हणाली, ’95 टक्के ब्लॉकेज होते…’

Sushmita Sen: बॉलिवूडमधील (Bollywood) प्रसिद्ध अभिनेत्री सुष्मिता सेन (Sushmita Sen) गेल्या काही दिवसांपासून तिच्या वैयक्तिक …

थोडक्यात बचावला ए. आर. रहमान यांचा मुलगा अमीन

A. R. Ameen: प्रसिद्ध संगीतकार  ए. आर. रहमान (A. R. Rahman) यांच्या गाण्यांना प्रेक्षकांची पसंती …