दूध पिणा-यांचे वजन व चरबी कधीच होत नाही कमी? हेल्थ कोचने केला यामागील सायंटिफिक खुलासा

जेव्हा जेव्हा वजन कमी करण्यासाठी आपण कोणाकडे सल्ला मागतो तेव्हा हेच सांगितले जाते की डाएटकडे लक्ष द्या किंवा त्यात बदल करा आणि योग्य आहार घ्या. आणि हा सल्ला योग्य सुद्धा आहे. कारण आहारामुळेच आपले वजन वाढलेले असते आणि आहारामुळेच ते कमी होऊ शकते. आहर ही ती पहिली पायरी आहे, जी चढल्याशिवाय वजन कमी होऊच शकत नाही. जे लोक आपल्या आहारावर नियंत्रण ठेवतात, त्यांचे Weight Loss खूप लवकर कमी होते.

अशावेळी मनात अनेक प्रश्न येतात की वेटलॉस डाएट फॉलो करताना कोणते पदार्थ खावेत आणि कोणते पदार्थ खाऊ नयेत? त्यापैकी एक पदार्थ म्हणजे दूध होय. तुम्ही देखील वेटलॉस करत असाल तर तुमच्याही मनात हा प्रश्न आला असेलच की दूध प्यावे की नाही? आज याच प्रश्नाचे उत्तर तुम्हाला आम्ही देणार आहोत. ‘ईट युअर केक, लूज युअर वेट’ चे लेखक आणि हॉलिस्टिक हेल्थ कोच Azhar Ali Sayed यांनी याबाबत मार्गदर्शन केले आहे. (फोटो सौजन्य :- iStock)

दुग्धजन्य पदार्थ फायदेशीर आहेत

दुग्धजन्य पदार्थ फायदेशीर आहेत

डेअरी प्रोडक्ट अर्थात ज्यांना आपण मराठीत दुग्धजन्य पदार्थ असतो म्हणतो ते खरे तर शरीरासाठी फायदेशीर असतात. लहानपणापासूनच आपण दूध, पनीर, दही आणि इतर दुग्धजन्य पदार्थांचे सेवन करत आलेले असतो. कारण वडीलधारी मंडळी सुद्धा आपल्याला त्याचे फायदे सांगत असतात. या दुग्धजन्य पदार्थांमध्ये प्रोटिन, कार्ब्स, कॅल्शियम, फॉस्फरस, पोटॅशियम, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन बी12, व्हिटॅमिन डी, रिबोफ्लेविन आणि नियासिन फॅट्ससह असतात. या सर्व गोष्टी आपल्या आरोग्यासाठी आवश्यक आहेत.

हेही वाचा :  औरंगजेबाचा उल्लेख करत तरुणाने बनवला रिल, धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी गुन्हा दाखल... Video

(वाचा :- छातीत जडपणा, धाप लागणं, ऑक्सिजनची कमतरता जाणवते? फुफ्फुसातील घाण काढून श्वास स्वच्छ करतात हे 5) आयुर्वेदिक उपाय​

वेटलॉस आणि दुधाशी निगडीत काही प्रश्न

वेटलॉस आणि दुधाशी निगडीत काही प्रश्न

वेटलॉस करताना दुधाशी निगडीत अनेक प्रश्न अनेकांच्या मनात येतात. जसे की –

  1. वजन कमी करण्यासाठी दूध सोडावे का?
  2. वजन कमी करण्याचा प्रक्रियेत असताना किती प्रमाणात दूध पिणे योग्य आहे?
  3. फॅट फ्री, लो फॅट की फुल फॅट दूध प्यावे?
  4. वजन कमी करण्यासाठी गायीचे दूध चांगले आहे का?
  5. दूध प्यायल्याने वजन वाढते का?

(वाचा :- Papaya Water : कॅन्सरच्या पेशी मुळापासून सुकवून टाकतं पपईचं पाणी, पोटातून खेचून घेतं सर्व घाण, या पद्धतीने खा)​

सर्व प्रश्नांचे उत्तर मात्र एकच

सर्व प्रश्नांचे उत्तर मात्र एकच

अझहर अली सय्यद म्हणतात की, वजन कमी करण्याची संपूर्ण प्रक्रिया एनर्जी बॅलेन्सवर अवलंबून असते. तुम्ही एखादा पदार्थ आहारातून वगळणे किंवा खाणे यावर वजन कमी करण्याची प्रक्रिया अवलंबून नसते. जर तुम्हाला वजन कमी करायचे असेल तर कॅलरीजचे सेवन कमी करा. कारण, जेव्हा तुम्ही अॅक्टिव्हिटी दरम्यान बर्न केलेल्या कॅलरीजपेक्षा जास्त खातात तेव्हा तुमचे वजन वाढते. पण यापेक्षा कमी कॅलरी असलेले अन्न घेतल्यास वजन सहज कमी होऊ लागते.

हेही वाचा :  ५३ वर्षांच्या वयात सलमानची अभिनेत्री भाग्यश्रीची परफेक्ट फिगर, हा असतो खास डाएट

(वाचा :- Weight Loss Rainbow Diet : झपाट्याने वितळेल पोट व कंबरेची चरबी, कॅन्सरचा धोका कायमचा टळेल, सुरू करा रेनबो डाएट)​

दूध सोडण्याची गरज नाही

दूध सोडण्याची गरज नाही

जोपर्यंत तुम्ही कमी कॅलरी असलेले अन्नपदार्थ खात आहात तोपर्यंत दुग्धजन्य पदार्थांचेकिंवा दुधाचे सेवन केल्याने वजन वाढत नाही. म्हणजेच तुम्ही दूध देखील बिनधास्त पिऊ शकता. पण खरी समस्या तेव्हा येते जेव्हा तुम्ही जास्त कॅलरीअसलेले अन्नपदार्थ खायला सुरुवात करता. म्हणूनच वेटलॉस करतंही तुम्ही दूध, चीज, दही आरामात खाऊ शकता. फक्त अट एकच की कमी कॅलरी असलेले अन्नपदार्थ खायला हवेत. पण हो, कॅफिनयुक्त पेये जसे की विविध प्रकारची कॉफी आणि दुधाने बनवलेला चहा घेणे टाळावे.
(वाचा :- Diabetes Yoga : या उपायात ठासून भरलंय डायबिटीजचा मुळापासून नाश करणारं इन्सुलिन, कधीच वाढणार नाही रक्तातील) साखर​

हे पर्याय सुद्धा आहेत

हे पर्याय सुद्धा आहेत

दूध पिऊनही तुम्ही कॅलरीज कमी करू शकता. यासाठी तुम्ही फॅट फ्री किंवा लो फॅट दूध पिऊ शकता. त्याचबरोबर गाई-म्हशीच्या दुधाऐवजी सोया दुधाचे सेवन करता येते. मात्र असा बदल करण्याआधी एकदा आपल्या न्युट्रीशनिस्टशी चर्चा करून घ्या. ते तुमच्या शारीरिक स्थितीनुसार तुम्हाला याबाबत योग्य मार्गदर्शन करू शकतील.
(वाचा :- Snoring Home Remedy: आयुर्वेदातील हे 3 उपाय साफ करतात नाकातील घाण व बॅक्टेरिया, घोरण्याची समस्याही होते छुमंतर)​
डिस्क्लेमर: हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी असून यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. अधिक जास्त माहितीसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य ते बदल करा.

हेही वाचा :  Flax Seeds For Diabetes : साखर कंट्रोल करण्यासाठी अळशी गुणकारी, इन्सुलिन घ्यावच लागणार नाही

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

महाराष्ट्रातले उद्योगधंदे गुजरातला कसे गेले? राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंना सवाल

Raj Thackeray Kankavli Slams Uddhav Over His Comment On Gujrat: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी …

Raj Thackeray : ‘नारायण राणे मुख्यमंत्री झाले अन्…’, राज ठाकरेंनी भरसभेत घेतली फिरकी; सांगितला ‘तो’ किस्सा!

Raj Thackeray Kankavli Sabha : एकेकाळचे दोन शिवसैनिक आज तब्बल 20 वर्षांनी एकाच मंचावर दिसले. …