डायबिटीज व कॅन्सरचा धोका 100% वाढवतात हे 5 पदार्थ, हेल्दी समजून खाण्याची अजिबात करू नका चूक – डॉक्टरांचा सल्ला

तुम्हीही दुकानात फक्त लेबल पाहून वस्तू खरेदी करता का? तसे असल्यास, तुम्ही फसवले जाऊ शकता. बाजारात अशा असंख्य अनहेल्दी गोष्टी आहेत ज्या आरोग्यदायी असल्याचा दावा केला जातो आणि त्या तुम्हाला सर्रास विकल्या जात आहेत. हेच प्रमुख कारण आहे की तुम्ही हेल्दी सगळं खाऊनही सतत आजारांना बळी पडता. पुरस्कार विजेत्या न्यूट्रिशनिस्ट आणि वैद्यकीय तज्ज्ञ डॉ. विशाखा शिवदासानी यांनी अलीकडेच अशाच काही पदार्थांबद्दल सांगितले आहे. त्या म्हणतात की जेव्हाही तुम्ही ट्रेंडिंग हेल्दी फूड खरेदी करायला जाल तेव्हा त्याचे लेबल नीट वाचा.

जर तुम्ही त्यातील 3 किंवा अधिक घटक ओळखु शकत नसाल तर शक्यता आहे की तो पदार्थ प्रोसेस अर्थात केमिकलयुक्त प्रकिया केलेला असावा. एक गोष्ट लक्षात ठेवा की निरोगी आहे असे केवळ लेबल लावल्याने ते निरोगी होत नाही. अशा स्थितीत अनेकवेळा गाफील राहिल्याने तुम्ही अशा गोष्टी आहारात खाता, ज्यामुळे Diabetes, Cancer यांसारख्या गंभीर आणि घातक आजारांचा धोका वाढतो. (फोटो सौजन्य :- iStock)

ब्रेकफास्ट सिरल्स

ब्रेकफास्ट सिरल्स

बहुतेक स्टोअरमधून विकत घेतलेल्या ब्रेकफास्ट सिरल्सवर केमिकल प्रक्रिया केली जाते व ते प्रोसेस्ड असतात. यासोबतच यामध्ये साखरेचे प्रमाणही जास्त असते, जे हार्मोनल असंतुलनासोबतच डायबिटीजचा धोका वाढवण्याचे काम करते. अशा परिस्थितीत, जर तुम्ही हा नाश्ता स्वतःला किंवा तुमच्या मुलांना आरोग्यदायी मानून देत असाल, तर त्याचे सेवन ताबडतोब बंद करणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते.

हेही वाचा :  घरातील जुना- वापरात नसलेला फीचर फोन फेकुन देण्यापूर्वी जाणून घ्या त्याचे 'हे' बेनिफिट्स

(वाचा :- Diabetes Symptoms : हे 6 अवयव ओरडून सांगतात तुम्हाला झालाय डायबिटीज, लक्ष न दिल्यास Blood Sugar चा होईल स्फोट)

ज्यूस

ज्यूस

ज्यूस आरोग्यासाठी चांगला आहे, हे तुम्ही सर्वांनी कधी ना कधी ऐकलेच असेल. परंतु एक गोष्ट लक्षात घ्या की केवळ भाज्यांचाच रस चांगला असतो. फळांचा ज्यूस चांगला समजत असाल तर थांबा. फळांचा रस काढल्याने सेल्युलोजचा थर तुटतो आणि साखर बाहेर पडते. कारण हा ज्यूस शरीराद्वारे वेगाने शोषला जाते, त्यामुळे रक्तातील साखर आणि इन्सुलिनमध्ये वाढ होण्याची शक्यता असते.

(वाचा :- लघवीत जळजळ झाल्यास समजून जा तुम्ही केली आहे ही मोठी चूक, किडनी, पोट, आतड्यांत जमा झालाय विषारी पदार्थांचा साठा)​

पॅकेज्ड दूध

पॅकेज्ड दूध

दूध हा आरोग्यदायी दुग्धजन्य पदार्थ आहे. पण जर तुम्ही दुकानातून पॅकेज्ड दूध घेत असाल तर ते आरोग्यदायी असण्याची शक्यता कमी असते. कारण व्यावसायिकरित्या उपलब्ध असलेल्या दुधामध्ये उच्च प्रमाणात इस्ट्रोजेन आणि अँटिबायोटिक्स असू शकतात, ज्यामुळे हार्मोनल अडथळा निर्माण होतो. याव्यतिरिक्त, त्यावर प्रक्रिया केली जाते, ज्यामुळे त्यात पोषक तत्वांचा अभाव असतो आणि ताज्या दुधापेक्षा जास्त लेक्टोज सामग्री असते. यामुळे, ते पचणे कठीण होऊ शकते आणि इतर समस्यांसह आतड्यांसंबंधी समस्या, सूज येणे आणि पुरळ होऊ शकते.

हेही वाचा :  'त्यांच्या' धाडसाला सलाम ! 20 फूट खोल पाणी आणि 70 फूट अंतर तलावातून पोहत सुरळीत केला वीजपुरवठा

(वाचा :- शास्त्रज्ञांचा अजब दावा – अंड्याचा हा एक भाग आहे अत्यंत विषारी, या 5 प्रकारच्या लोकांनी चुकूनही खाऊ नयेत Eggs)​

लो फॅट फूड्स

लो फॅट फूड्स

एक्सपर्ट्स म्हणतात की लो फॅटचा अर्थ नेहमीच जास्त कार्ब असतो. कमी चरबीयुक्त पदार्थांमध्ये नेहमीच खराब चरबी, रॅन्सिड आणि ट्रान्स फॅट्स असतात, जे नेहमी टाळले पाहिजेत. चांगल्या दर्जाचे नैसर्गिक चरबीयुक्त पदार्थ तुमच्या आरोग्यासाठी आणि हार्मोन्स संतुलित ठेवण्यासाठी उत्तम आहेत. ‘लो फॅट’ असलेल्या कोणत्याही गोष्टीपासून दूर राहणेच उत्तम!

(वाचा :- Fact Check: हे ड्रिंक प्यायल्याने एका झटक्यात बाहेर पडतो मुतखडा व पित्ताशयाचा खडा, काय आहे या दाव्यामागील सत्य)​

Untitled design – 2023-01-25T083547.604

untitled-design-2023-01-25t083547-604

प्रोसेस्ड अर्थात प्रक्रिया केलेले मांस नायट्रेट्स आणि नाईट्राइट्स युक्त असतात, जे कर्करोगाच्या निर्मितीसाठी ओळखले जातात. अलीकडेच, ट्रेंडमधील मॉक मांस किंवा बनावट मांस यावर खूप प्रक्रिया केली जाते असे आढळून आले. हे सगळं मांसाची चव वाढविण्यासाठी केले जाते. या करता अनेक रसायनांचा वापर केला जातो. ही रसायने आरोग्यासाठी खूप वाईट आहेत.
(वाचा :- Metabolism कमी झालं तर बाहेरच नाही तर आतील भागांवरही जमू लागते चरबी, हे 5 पदार्थ झटक्यात वाढवतात मेटाबॉलिक रेट)​
टीप : हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी असून यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. अधिक जास्त माहितीसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य ते बदल करा.

हेही वाचा :  महागड्या डाएट प्लान आणि जिमला करा बाय बाय, CDC ने सांगितलेले ‘हे’ 4 उपाय करा, झटक्यात कमी होईल वजन!

हेल्दी समजून खाण्याची चूक अजिबात करू नका



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

मुंबईत मराठी-गुजराती वाद पेटला! आदित्य ठाकरे आक्रमक; मराठी उमेदवाराला प्रचार न करु दिल्याचा आरोप

Loksabha Election 2024 : नोकरीसाठी मराठी माणूस नको ही एका एचआरची पोस्ट व्हायरल झालेली असतानाच …

‘बाळासाहेब असते तर उबाठाला धू धू धुतलं असतं’ सीएम शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना असं का म्हटलं?

Shinde vs Thackeray : ‘काँग्रेस नेते विजय वड्डेटीवार यांनी मुंबई 26/11 हल्ल्यातील (Mumbai 26/11) शहिद …