Athiya Shetty बनली 2023 ची युनिक नवरी, लुकमधील या 4 हटके गोष्टींची झाली तुफान चर्चा, KL Rahul च्या नवरीचा जलवा

sunil shetty ची मुलगी Athiya Shetty आणि टीम इंडियाचा विकेटकीपर बॅट्समन KL Rahul अखेर लग्नाच्या बेडीत अडकले. अनेक महिने मीडिया व पत्रकारांपासून लपाछपी खेळल्यानंतर या जोडप्याने 23 जानेवारी 2023 रोजी आपले कुटुंबिय आणि जवळच्या मित्रांच्या उपस्थितीत सात वचनं घेत एकमेकांना आयुष्यभरासाठी आपले जीवनसाथी म्हणून स्विकारले. अथिया शेट्टी आणि केएल राहुल यांनी सुनील शेट्टीच्या खंडाळा फार्महाऊसवर खाजगी पद्धतीने लग्न केले. पण नंतर व्हायरल झालेल्या प्रत्येक फोटोमध्ये या जोडप्याच्या चेह-यावरील आनंद अगदी स्पष्ट दिसत होता.

यावेळी, नव्या जोडप्यामधील क्युट केमिस्ट्रीने सगळ्यांचेच लक्ष वेधले. एक गोष्ट आवर्जून सांगावीशी वाटते की केएल राहुलची पत्नी अथियाचे ब्राइडल लूक 2023 चे बेस्ट लुक्स म्हणून आताच घोषित झाले आहेत. नवीन विवाहित सेलिब्रेटींच्या यादीत लुक्सच्या बाबतीत ती नेहमीच टॉपवर राहील. असे का विचारताय? चला तर जाणून घेऊया एवढे काय स्पेशल होते अथियाच्या ब्रायडल लूकमध्ये ज्याने तिला 2023 मधील सर्वात क्युट व आकर्षक नवरी बनवले! (फोटो सौजन्य – योगेन शाह/ @athiyashettyइंस्टाग्राम)

म्युटेड पिंक शेडचा लेहंगा

म्युटेड पिंक शेडचा लेहंगा

सर्वप्रथम अथिया शेट्टीच्या ब्रायडल लेहेंगाबद्दल जाणून घेऊया. तिने आपल्या आयुष्यातील खास क्षणी आकर्षक व युनिक दिसण्यासाठी भारताच्या प्रसिद्ध फॅशन डिझायनर अनामिका खन्ना यांची निवड केली होती, त्यांनी सुद्धा तिच्यासाठी असा एक परफेक्ट आउटफिट तयार केला होता जो पाहता क्षणी कोणालाही प्रेमात पाडेल! यावेळी, अथियाने डस्टी रोज टोन असणारा भरजरी लेहेंगा परिधान केला होता, ज्यावर हाताने अत्यंत सुंदर पारंपारिक एम्ब्रॉइडरी केली होती.

हेही वाचा :  केएल राहुल अन् अथिया शेट्टी अखेर लग्नबंधनात अडकले!

(वाचा :- अर्जुन कपूरची प्रेयसी मलायका व बहिण अंशुलात ग्लॅमरची जुगलबंदी, मलायकाला मागे सारत अंशुलानेच लावली इंटरनेटवर आग)​

लेहंग्याबद्दल बोलावे तेवढे कमी

लेहंग्याबद्दल बोलावे तेवढे कमी

अथियाच्या ओव्हरऑल आउटफिटमध्ये हेवी घेर अॅड केला गेला होता. त्यामुळे यावर केलेले नक्षीदार काम अगदी खुलून दिसत होते. संपूर्ण लेहेंग्यावर रेशीम धाग्यांनी चिकनकारीचे काम केलेले दिसत होते. ज्याला आणखीच उठावदार व सुंदर बनवण्याचे काम त्यावरील कटदाना आणि मुकेश वर्क करत होते. एकंदर हा लेहंगा खूप जास्त युनिक होता आणि अथिया त्यात राजकुमारी भासत होती. असे वाटत होते की या आऊटफिटमध्ये केवळ अथियाच सुंदर दिसू शकते. अन्य कोणाला त्यात आपण इमॅजिन करू शकत नाही. हल्ली पेस्टल रंगांची क्रेझ वाढताना दिसत असल्याने पुढील काही दिवसांत जनसामान्यांतही हा ट्रेंड पाहायला मिळू शकतो.

(वाचा :- कोरियन मुलींसारखी ग्लॉसी स्किन व त्यावर चमचमतं ब्लश, नोरा फतेहीचा हा चार्मिंग लुक बघून म्हणाल, ‘जपानी गुडियॉं’)​

फुल स्लीव्हस ब्लाऊज केला परिधान

फुल स्लीव्हस ब्लाऊज केला परिधान

अथियाने नाजूक एम्ब्रॉयडरी असलेल्या या लेहेंगासोबत फुल स्लीव्हज असलेला ब्लाऊज घातला होता, ज्यामुळे तिचा संपूर्ण लुक चांगलाच उठून दिसत होता. ब्लाऊजवर सुुद्धा स्कर्ट पोर्शनसारखी कशीदाकारी एम्बॉइडरी केली होती, ज्यात दिलेली प्लंजिंग नेकलाईन तिचे सौंदर्य दुप्पटीने वाढवत होते. ब्लाऊजमध्ये फूल स्लीव्हसज होत्या ज्यामुळे तिच्या लूक अजूनच भारी दिसत होता. जिथे शॉर्ट स्लिव्हज, स्लीव्हलेस, बॅकलेस अशा डिझाईनची फॅशन आहे तिथे अथियाने चौकटीबाहेर जात काहीतरी हटके ट्राय केलं. त्यामुळे अथियाने स्वतःसाठी ज्या प्रकारचा ब्लाऊज डिझाईन केला होता, तो 2023 मध्ये खूप हिट ठरणार यात शंकाच नाही.

हेही वाचा :  भारतीय क्रिकेटर KL Rahul ची होणारी बायको पाहिली का? फिटिंग ड्रेसमधील ग्लॅमरने पाजलं बॉलीवूडच्या अप्सरांना पाणी

(वाचा :- KL Rahul Athiya Shetty: अखेर सुनिल शेट्टीची लेक बनली नवरीबाई, लग्नाआधीच लाल भरजरी लेहंगा घालून केलं मंत्रमुग्ध)​

घुंगट आणि ज्वेलरी

घुंगट आणि ज्वेलरी

अथियाने तिचा वधू लूक पूर्णपणे मोनोटोन ठेवला होता, त्याच्यासोबत असलेल्या घुंगटने तर तिला देसी राजकुमारीचा टच दिला होता. त्याचवेळी हा लूक पूर्ण करण्यासाठी तिने पोल्की आणि मोत्यांनी बनवलेला स्टेटमेंट चोकर घातला होता, ज्यामध्ये कानातले आणि मांगटिका अर्थात बिंदियाचा समावेश होता. आता ते दिवस गेले जेव्हा नववधू जाडजुड दागिने घालत असत. आजच्या नववधूंना कमीतकमी दागिने आवडतात, अथियाच्या लूकमध्येही तेच दिसून आले. इतकेच नाही तर सप्तपदीनंतर अथियाच्या गळ्यात एक अतिशय सुंदर मंगळसूत्रही दिसले, ज्यामध्ये मध्यभागी एक मोठा डायमंड होता. त्याचवेळी, तिच्या अनामिकामध्ये हिऱ्याची अंगठी दिसत होती, जी खूपच गोंडस व लक्षवेधी होती.

(वाचा :- साऊथच्या ‘या’ अभिनेत्रीने लग्नातही जपली संस्कृती व परंपरा, 150 वर्ष जुन्या हवेलीमध्ये रचला राजेशाही विवाहसोहळा)​

बांगड्यांनी सुद्धा वेधले लक्ष

बांगड्यांनी सुद्धा वेधले लक्ष

अथियाने आपल्या ब्रायडल अपीलला नेक्स्ट लेव्हल घेऊन जाण्यासाठी जास्त बांगड्या परिधान केल्या नव्हत्या. ब्लाऊजला फुल हॅंड देण्यात आल्याने तिने दोन्ही हातात एक एक मोठा डायमंडचा कडा घातला होता, ज्याच्या जोडीला असलेले कलीरे देखील खूपच हलके होते. अभिनेत्रीचा गुलाबी रंगाचा लेहेंगा पहिल्याच नजरेत खूपच गोड आणि आकर्षक दिसत होता असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही. वधू बनणाऱ्या मुलींनी तिच्या लग्नाच्या या लूक मधून प्रेरणा घेतली तर नक्कीच त्या आपल्या आयुष्यातील हा खास क्षण अविस्मरणीय बनवू शकतात.

हेही वाचा :  Maharastra Politics : कोकणात 'ह्याका गाड, त्याका गाड'... तो काय गाडणार? ठाकरेंवर राणेंचा 'प्रहार'

(वाचा :- नीता अंबानींपेक्षाही सुंदर आहे त्यांची विहीणबाई, राधिकाच्या मेहंदीत रॉयल अंदाज दाखवत केली थेट अंबानींशी बरोबरी)​

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

ठाणे पालिकेतील सफाई कर्मचारी महिलेचा मुलगा बनला अधिकारी, UPSC साठी ‘अशी’ केली तयारी

UPSC Success Story: आपल्या मुलाने चांगल शिक्षण घेऊन मोठा अधिकारी व्हावं असं प्रत्येक आईला वाटत …

चंद्र एकाच जागी स्थिरावणार; तब्बल इतक्या वर्षांनी आकाशात दिसणार भारावणारं दृश्य

Lunar Standstill : चंद्र… इथं पृथ्वीवर प्रेमाच्या आणाभाकांपासून खगोलीय घटनांपर्यंत महत्वाच्या भूमिकांमध्ये आणि रुपांमध्ये हा …