लटकणारी पोटाची चरबी लपवायला घालायचा जॅकेट, या 2 उपायांनी 18 किलो वेटलॉस

कोविड-19 (covid19) महामारीच्या सुरुवातीच्या दिवसांमध्ये भीतीचे असे वातावरण पसरले होते की सर्व कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना घरून काम करण्यास सांगितले होते. त्यानंतर लोक त्यांच्या आरोग्याबाबत अधिकच बेफिकीर झाले. घरातून बाहेर पडण्यास बंदी असल्यामुळे लोक इतके आळशी झाले होते की स्वयंपाक आणि खाण्याशिवाय दुसरे काहीच उरले नाही. त्यामुळे अनेक लोक लठ्ठ झाले. पुण्यात राहणारे दीपक राय यांचीही अशीच कहाणी आहे. त्याचे वय ३३ वर्षे आहे. दीपक एका आयटी कंपनीत काम करतो.

घरातून काम करताना खाण्याच्या वाईट सवयींमुळे त्याचे वजन झपाट्याने वाढले. यादरम्यान दीपक इतका आळशी झाला होता की त्याला बेडवरून उठणेही कठीण झाले होते. हे करत असताना, एके दिवशी जेव्हा दीपकने स्वतःचे वजन केले तेव्हा ते 88.8 किलोग्रॅम होते जे जुन्या वजनापेक्षा खूप जास्त होते. त्याचे पोट लटकू लागले होते, जे लपवण्यासाठी दीपकला त्याच्या जॅकेटचा आधार घ्यावा लागत होता. आरोग्याशी संबंधित अनेक समस्यांनीही डोके वर काढायला सुरुवात केली, त्यानंतर दीपकने वजन कमी करण्याचा निर्णय घेतला.

नाव – दीपक राय
व्यवसाय – आयटी प्रोफेशनल
वय – 33
शहर – पुणे
सर्वाधिक वाढलेले वजन – 88.8 किलो
कमी केलेले वजन – 18.3 किलो
वजन कमी करण्यासाठी लागलेला वेळ – 6 महिने

हेही वाचा :  मुंबईकरांनो स्वेटर, शाली काढण्याची वेळ आली? थंडीसंदर्भात हवामान खात्याची मोठी अपडेट

टर्निंग पॉइंट

दीपक सांगतो की, जेव्हा मी माझे वजन केले तेव्हा माझे वाढलेले वजन पाहून मला आश्चर्य वाटले. माझे वजन 88.8 किलो वाढले आहे या गोष्टीवर माझ्या मित्रालाही विश्वास बसत नव्हता. यासाठी त्याने मला वजन कमी करण्याचा सल्ला दिला. मी माझ्या मित्राचा सल्ला घेतला जो प्रमाणित फिटनेस प्रशिक्षक आहे. त्याने बॉडी चेकअप करायला सांगितले, त्याचा रिपोर्ट भयावह होता. त्यानंतर वजन कमी करण्यासाठी एक प्लान बनवला आणि त्याचे पालन करण्यास सुरुवात केली.

(वाचा :- या एका चुकीमुळे गेला प्रसिद्ध अभिनेता सिद्धार्थचा जीव, थकवा व कमजोरीसोबत कधीच जाऊ नये GYM ला, काय आहे ती चूक..?)

वेटलॉसचा प्लान

2 उकडलेली अंडी, 3 इडल्या, पोहे, दूध, कॉर्न फ्लेक्स किंवा भाजीसोबत 2 चपात्या

  • दुपारचे जेवण –

250 ग्रॅम भात, 1 लहान वाटी डाळ, सलॅड, व्हे प्रोटिन (1 स्कूप) आणि भाज्या

  • रात्रीचे जेवण –

डाळ आणि भाजीसोबत 250 ग्रॅम भात, भाज्यांसोबत 2 चपात्या, सलॅड, प्रोटिन (1 स्कूप)

  • प्री-वर्कआउट मील –

1 केळ, 1 सफरचंद

पिझ्झा, मोमोज, चाट, पाणीपुरी सर्व काही, पण प्रमाणातच

(वाचा :- या एका चुकीमुळे गेला प्रसिद्ध अभिनेता सिद्धार्थचा जीव, थकवा व कमजोरीसोबत कधीच जाऊ नये GYM ला, काय आहे ती चूक..?)

वर्कआउट रिझाइम्स

दीपक सांगतो की, वजन कमी करण्यासाठी त्याने दररोज 10,000 पावले चालायला सुरुवात केली. तो सांगतो की मी कम्युनिटी पार्कमध्ये रोज ६ फेऱ्या मारायचो, ज्याची एकूण लांबी ९०० मीटर होती. सुरुवातीला मला खूप थकवा जाणवायचा पण हळूहळू मला माझ्या वर्कआउट्सची आणि डाएटची सवय झाली. चालण्याव्यतिरिक्त मी बर्पीज, पुशअप्स, जंपिंग जॅक, जागेवर धावणे आणि जॉगिंग केले.

हेही वाचा :  UPI Payment वर द्यावा लागणार १.१ टक्का चार्ज, चुकूनही या पद्धतीने करू नका पेमेंट

(वाचा :- हे 3 पदार्थ खाणं आजच थांबवा नाहीतर लठ्ठपणा व येईल हार्ट अटॅकची वेळ, Weight Loss साठी आयुर्वेदिक डॉक्टरच्या टिप्स)

फिटनेस सीक्रेट

आईने शिजवलेले जेवण आणि रोज ८ किमी चालणे हे माझ्या फिटनेसचे रहस्य असल्याचे दीपक सांगतो. स्वतःला प्रेरित ठेवण्यासाठी मी दररोज माझा हेल्थ रिपोर्ट तपासत असे जो की लठ्ठपणामुळे खूप वाईट आला होता.

(वाचा :- Toxic Gut: आतड्यांत घाण व विषारी पदार्थ साचल्यास शरीर देतं हे 5 भयंकर संकेत, हे 5 नैसर्गिक उपाय करतात आतडी साफ)

ओव्हरवेटमुळे कोणत्या समस्या आल्या

या प्रश्नाचे उत्तर देताना दीपक सांगतो की, वजन वाढल्यामुळे मला माझे आवडते कपडे घालता आले नाहीत. वाढलेल्या वजनामुळे माझे पोट लटकायला लागले. त्यामुळे जॅकेट घालणे ही माझी मजबुरी होती. तसेच माझे कोलेस्टेरॉल, थायरॉईड, लिव्हर या सर्वांची स्थिती खराब झाली होती. याव्यतिरिक्त माझ्या शरीरात बी जीवनसत्त्वे आणि आयर्नची कमतरता झाली होती.

(वाचा :- पोट साफ होण्यासाठी, वेटलॉस, इम्युनिटी, केसगळती, ग्लोइंग स्किनसाठी खा फक्त हे 1 फळ, ही आहे खाण्याची योग्य पद्धत)

वेटलॉसमधून काय शिकवण मिळाली

दीपकच्या मित्राने त्याला वजन कमी करण्याच्या प्रवासात खूप मदत केली. म्हणूनच त्याचा असा विश्वास आहे की जेव्हा तुम्ही संकटात असाल तेव्हा मदत मागायला लाज वाटून घेऊ नये. मी माझ्या मित्रांची मदत घेतली आणि आज माझ्या जिद्द, आत्मसंयम आणि कठोर परिश्रमाने मी एक फिट व्यक्ती बनलो आहे असे दीपक सांगतो.

हेही वाचा :  डायबिटीज व कॅन्सरचा धोका 100% वाढवतात हे 5 पदार्थ, हेल्दी समजून खाण्याची अजिबात करू नका चूक - डॉक्टरांचा सल्ला

(वाचा :- दूध पिऊन व कॅल्शियम पदार्थ खाऊन होणार नाही हाडं मजबूत, जीवनभर हाडे लोखंडासारखी टणक ठेण्यासाठी हवं हे 1 व्हिटॅमिन)

टीप : लेखकासाठी जे काही उपयोगी आले ते आपल्यासाठी सुद्धा येईलच असे मुळीच आवश्यक नाही. त्यामुळे या लेखात नमूद केलेल्या डाएट-वर्कआउटचे आंधळेपणाने पालन करणे टाळा आणि तुमच्या शरीरासाठी कोणते चांगले उपाय आहेत ते शोधा.

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Raj Thackeray : ‘नारायण राणे मुख्यमंत्री झाले अन्…’, राज ठाकरेंनी भरसभेत घेतली फिरकी; सांगितला ‘तो’ किस्सा!

Raj Thackeray Kankavli Sabha : एकेकाळचे दोन शिवसैनिक आज तब्बल 20 वर्षांनी एकाच मंचावर दिसले. …

Maharastra Politics : कोकणात ‘ह्याका गाड, त्याका गाड’… तो काय गाडणार? ठाकरेंवर राणेंचा ‘प्रहार’

Uddhav Thackeray vs Narayan Rane : कोकणात लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं उद्धव ठाकरे विरुद्ध नारायण राणे …