क्रीडा

महाराष्ट्रात रंगणार आयपीएलचे सर्व सामने, प्रेक्षकांना मैदानात प्रवेश मिळण्याची शक्यता

IPL 2022: आयपीएलच्या पंधराव्या हंगामाला लवकरच सुरूवात होणार आहे. आयपीएलचे सर्व सामने मुंबईत वानखेडे (Wankhede Stadium), डीवाय पाटील (DY Patil) आणि ब्रेबॉर्न या तीन स्टेडिअमवर खेळले जाणार आहेत. कोरोनामुळं आयपीएलचे मागील दोन्ही हंगाम प्रेक्षकांविना खेळवण्यात आले होते. मात्र, यंदाचा हंगाम प्रेक्षकांना मैदानात प्रवेश मिळण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रात कोविडची स्थिती पूर्णपणे नियंत्रणात येईल, जेणेकरुन प्रेक्षकांना आयपीएलचे सामने पहण्यासाठी स्टेडियमवर परवानगी देता …

Read More »

IND vs SL : रोहित शर्माने नाणेफेक जिंकली, प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय

IND vs SL, 2nd T20 : रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. भारतीय संघात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. पहिल्या सामन्यातील विजयी संघ कायम ठेवण्यात आला आहे. श्रीलंका संघात दोन बदल करण्यात आले आहेत. धर्मशाला येथे शनिवारी सकाळी पाऊस पडला होता, त्यामुळे नाणेफेकीचा कौल सर्वात महत्वाचा होता. रोहित शर्माने नाणेफेक जिंकत विजयाच्या दिशेने पाऊल उचलले आहे.  …

Read More »

श्रीलंकाविरुद्ध दुसऱ्या टी-20 सामन्यात रोहित शर्मा रचणार इतिहास; मॉर्गन, विलियमसनला टाकणार मागे

<p><strong>IND Vs SL:</strong> भारत आणि श्रीलंका यांच्यात तीन सामन्याची टी-20 मालिका खेळली जात आहे. या मालिकेतील पहिल्यासामन्यात भारतानं श्रीलंकेला 62 धावांनी पराभूत करून मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतलीय. या मालिकेतील दुसरा सामना आज धर्मशाला येथील हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशन स्डेडिअमवर खेळला जाणार आहे. या सामन्यात भारताचा कर्णधार रोहित शर्मा याच्याकडं इतिहास रचण्याची संधी आहे.&nbsp;</p> <p>रोहित शर्माला उत्तम कर्णधार म्हणून ओळखले …

Read More »

IND vs SL : भारत विरुद्ध श्रीलंका दुसऱ्या टी20 सामन्यातील प्रत्येक अपडेट्स एका क्लिकवर

IND vs SL, 2nd T20 Live Streaming : वेस्ट इंडिजला क्लीन स्वीप दिल्यानंतर श्रीलंकेचा व्हाईट वॉश करण्यास टीम इंडिया सज्ज झाली आहे.  धर्मशाला मैदानावर भारताचा दुसरा टी20 सामना होणार आहे. पहिला सामना जिंकत टीम इंडियाने मालिकेत आघाडी घेतली आहे. तीन सामन्याच्या मालिकेत भारतीय संघाने 1-0 च्या फरकाने आघाडी घेतली आहे. भारतीय संघ दुसरा सामना जिंकून मालिका खिशात घालण्याच्या इराद्याने मैदानात …

Read More »

भारत- श्रीलंका यांच्यातील अखेरच्या कसोटी सामन्यात प्रेक्षकांना परवानगी

IND Vs SL: तीन सामन्याची टी-20 मालिकेनंतर भारत आणि श्रीलंका यांच्यात दोन सामन्याची कसोटी मालिका खेळली जाणार आहे. भारत- श्रीलंका यांच्यातील कसोटी मालिकेला येत्या 4 मार्चपासून सुरुवात होणार आहे. या मालिकेतील दुसरा आणि अखेरचा सामना पिंक बॉलनं खेळला जाणार आहे. बंगळुरू येथे खेळला जाणाऱ्या या डे-नाईट सामन्यात प्रेक्षकांना परवानगी देण्यात आलीय. बेंगळुरू येथील एम चिन्नास्वामी स्टेडियमच्या एकूण क्षमतेच्या 50% प्रेक्षक …

Read More »

भारत- श्रीलंका आज पुन्हा आमने-सामने; दुसरा टी-20 सामना कधी, कुठे आणि कसा पाहणार?

IND vs SL, 2nd T20 Live Streaming: श्रीलंकेविरुद्धच्या T20 मालिकेतील पहिल्याच सामन्यात (India vs Sri Lanka) भारतानं दणदणीत विजय मिळवला. लखनौमध्ये खेळल्या गेलेल्या पहिल्या सामन्यात भारतानं 62 धावांनी श्रीलंकेला पराभूत केलं. या विजयासह भारतानं मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतलीय. धर्मशालाच्या हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशन मैदानावर भारत आणि श्रीलंका यांच्यातील दुसरा टी-20 सामना खेळला जाणार आहे. दोन्ही संघातील लाईव्ह सामना कधी, …

Read More »

भारत- श्रीलंका यांच्यातील दुसरा टी-20 सामना पावसामुळं रद्द होण्याची शक्यता

IND vs SL: भारत- श्रीलंका यांच्यात आज (26 फेब्रुवारी) दुसरा टी-20 सामना खेळला जाणार आहे. धर्मशाला (Dharamshala) येथील हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर (Himachal Pradesh Cricket Association Stadium) आजचा सामना रंगणार आहे. आजच्या सामन्यात विजय मिळवून भारतीय संघ मालिकेवर कब्जा करण्यासाठी सज्ज झालाय. तर, तीन सामन्याच्या टी-20 मालिकेत आपलं आव्हान टिकवून ठेवण्यासाठी श्रीलंकेचा संघ मैदानात उतरणार आहे. मात्र, या सामन्यापूर्वी …

Read More »

IND vs SL : दुखापतीमुळे ऋतुराज गायकवाड संघाबाहेर, ‘या’ खेळाडूला मिळाली संधी

IND vs SL, 1st T20 : टीम इंडिया एकापाठोपाठ एक विजय संपादन करत आहे. वेस्ट इंडिजला 3-0 च्या फरकाने धूळ चारल्यानंतर श्रीलंकाविरोधातील पहिल्या सामन्यात विजय मिळवला. एकीकडे संघ दमदार कामगिरी करत असताना खेळाडू दुखापतग्रस्त होत आहेत. आता सलामी फलंदाज ऋतुराज गायकवाड दुखापतग्रस्त झाल्याचे वृत्त आहे. मिळालेल्या वृत्तानुसार, ऋतुराज गायकवाडच्या जागी सलामी फलंदाज मयांक अग्रवाल याला संधी देण्यात आला आहे. मयांकला …

Read More »

F1 Race : फॉर्मुला 1 ही रशियाविरुद्ध आक्रमक, यंदाची रशियन ग्रँड प्रिक्स स्पर्धा रद्द

Russian Grand Prix Cancelled: रशियाचे अध्यक्ष पुतीन यांनी गुरुवारी सकाळच्या सुमारास (भारतीय वेळेनुसार) युक्रेनवर आक्रमणाचे आदेश दिले. आता या युद्धाला दोन दिवस झाले असून अजूनतरी हे युद्ध थांबण्याचं नाव घेत नसून या युद्धाचे पडसाद विविध क्षेत्रांवर उमटत आहेत. आधी फुटबॉल स्पर्धा चॅम्पियन्स लीगच्या अंतिम सामन्याचं ठिकाण या युद्धामुळे रशियातून बदलून फ्रान्स करण्यात आल्यानंतर आता प्रसिद्ध रेसिंग स्पर्धा फॉर्मुला 1 (Formula 1) …

Read More »

IND vs SL : … तर भारताचे टी-20 मधील अव्वल स्थान जाणार

Team India T20I Ranking : नुकत्याच झालेल्या टी 20 मालिकेत भारतीय संघाने वेस्ट इंडिजला क्लीन स्वीप केले होते. वेस्ट इंडिजचा 3-0 च्या फराकाने पराभव केल्यानंतर भारतीय संघ आंतरराष्ट्रीय टी20 क्रमवारीत पहिल्या स्थानावर पोहचला. जवळपास चार ते पाच वर्षानंतर भारतीय संघ टी 20 क्रमवारीमध्ये पहिल्या स्थानावर पोहचला आहे. पण पहिल्या स्थानावर कायम राहणे भारतीय संघासाठी आव्हानात्मक आहे. भारतीय संघाला टी20 मध्ये …

Read More »

रशिया-युक्रेनमधील वादाचा फटका फुटबॉलला, चॅम्पियन्स लीग फुटबॉल स्पर्धेत महत्त्वाचा बदल

Russia Ukraine War : रशियाने युक्रेनवर हल्ला केला असून आज युद्धाचा दुसरा दिवस आहे. या युद्धाचे पडसाद जगभरात उमटत आहे. विविध देशांच्या अर्थव्यवस्थेला याचा फटका बसत असताना आता क्रिडा क्षेत्रालाही याचा फटका बसला आहे. प्रसिद्ध फुटबॉल स्पर्धा चॅम्पियन्स लीगच्या अंतिम सामन्याचं ठिकाण या युद्धामुळे बदलण्यात आलं आहे. आधी या स्पर्धेचा अंतिम सामना रशियातील प्रसिद्ध फुटबॉल स्टेडियम सेंट पीटर्सबर्ग येथे होणार …

Read More »

IPL चे 70 सामने मुंबई-पुण्यात, MI-CSK वेगवेगळ्या ग्रुपमध्ये, पाहा कोणता संघ कोणत्या ग्रुपमध्ये?

IPL 2022: इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2022 चं बिगुल वाजले आहे. 26 मार्च रोजी आयपीएलचा पहिला सामना खेळला जाणार आहे. तर 29 मे रोजी अंतिम सामना होणार आहे. गुरुवारी झालेल्या आयपीएल गव्हर्निंग काउन्सिलच्या बैठकीत याचा निर्णय घेण्यात आला आहे.  आयपीएलचा 15 वा हंगाम भारतामध्ये कोरोना नियमांचे पालन करुन होणार आहे. लीग स्पर्धेत 70 सामने होणार आहेत. हे सर्व सामने मुंबई …

Read More »

IPL 2022 Update : चेन्नईबरोबर दोन, आरसीबीबरोबर एक, पाहा मुंबईचे सामने कुणाबरोबर किती?

IPL 2022 Update : इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2022 चं बिगुल वाजले आहे. 26 मार्च रोजी आयपीएलचा पहिला सामना खेळला जाणार आहे. तर 29 मे रोजी अंतिम सामना होणार आहे. दोन संघ वाढल्यामुळे यंदापासून आयपीएलमध्ये दहा संघामध्ये रणसंग्राम होणार आहे. यावेळी स्पर्धा दोन टप्प्यात खेळवण्यात येणार आहे. दहा संघांना दोन ग्रुपमध्ये विभागण्यात येणार आहे. प्रत्येक संघाचे 14 सामने होणार आहेत. …

Read More »

राहुल द्रविड आणि सौरव गांगुलींविरोधात बोलल्याने रिद्धिमान साहा अडचणीत? बीसीसीआय करणार चौकशी

Wriddhiman Saha : भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड (Rahul Dravid) आणि बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली (Sourav Ganguly) यांच्या विरोधात बोलल्याने विकेटकीपर रिद्धिमान साहाच्या  (Wriddhiman Saha) अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. या वक्तव्याबाबात बीसीसीआय साहाकडे स्पष्टीकरण मागण्याची शक्यता आहे. केंद्रीय करारातील खेळाडू असल्याने त्याने नियमांचे उल्लंघन केले आहे, असे बीसीसीआयचे मत आहे.   श्रीलंकेविसोबत होणाऱ्या कसोटी मालिकेतून वगळण्यात आल्यानंतर प्रशिक्षक …

Read More »

ऑलिम्पिकवीर मीराबाई चानूने सिंगापूरमध्ये जिंकले सुवर्णपदक, राष्ट्रकुल स्पर्धेसाठी ठरली पात्र 

Mirabai Chanu : ऑलिम्पिक पदक विजेती आणि भारताची स्टार वेटलिफ्टर मीराबाई चानू (Mirabai Chanu) हिने शुक्रवारी सिंगापूर वेटलिफ्टिंग इंटरनॅशनल स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले आहे. या यशामुळे ती राष्ट्रकुल स्पर्धेसाठी पात्र ठरली आहे. मीराबाई आता कॉमनवेल्थ गेम्समध्ये 55 किलो वजनी गटात वेटलिफ्टिंग करताना दिसणार आहे. चानू प्रथमच 55 किलो वजनी गटाच्या स्पर्धेत सहभागी झाली आहे. या स्पर्धेत तिने 191 किलो (86 किलो …

Read More »

IPL 2022: RCB चे कर्णधारपद सोडण्यावर विराट कोहलीने सोडले मौन, म्हणाला…

IPL 2022 : भारतीय क्रिकेट संघाचे कर्णधार पद सोडल्यानंतर विराट कोहलीने (Virat Kohli) नुकतेच आयपीएलमधील रॉयल चॅलंजर्स बंगळुरू संघाच्या कर्णधारपदाचाही राजीनामा दिला आहे. कोहलीच्या या निर्यानंतर त्याचे चाहते कोहलीने हा निर्णय का घेतला हे जाणून घेण्यासाठी बेचैन आहेत. विराट कोहलीनेच आता याबाबत खुलासा केला आहे. त्याने रॉयल चॅलंजर्स बंगळुरूच्या कर्णधार पदाचा राजीनामा का दिला? याबाबत त्याने खुलासा केला आहे.  ‘द …

Read More »

Ravindra Jadeja : सामन्यात विकेट घेताच जाडेजाचं पुष्पा स्टाईल सेलिब्रेशन, फोटो झाला व्हायरल

Ravindra Jadeja Pushpa Celebration : भारत आणि श्रीलंका (IND vs SL) यांच्यातील पहिल्या टी20 सामन्यात भारताने 62 धावांनी श्रीलंकेला मात दिली. या सामन्यांपूर्वी झालेल्या वेस्ट इंडिजविरुद्धच्या सामन्यांच्या तुलनेत संघात काही महत्तपूर्ण बदल झाले. यातील एक म्हणजे स्टार अष्टपैलू खेळाडू रवींद्र जाडेजा संघात परतला. दरम्यान संघात परतलेल्या रवींद्रला आज खास कामगिरी करण्याची संधी मिळाली नाही. पण एकमेव विकेट घेतल्यानंतर त्याने केलेलं …

Read More »

रोहित शर्माचा टी-20 मध्ये नवा विक्रम, कोहलीसह गुप्टीलला मागे टाकत पटकावलं पहिलं स्थान

Rohit Sharma : भारत आणि श्रीलंका यांच्यात पहिला टी-20 सामना काल पार पाडला. या सामन्यात भारताने श्रीलंकेवर 62 धावांनी विजय मिळवला. या सामन्यात भारतीय कर्णधार रोहित शर्माच्या नावावर एक विक्रम झाला आहे. कालच्या टी 20 सामन्यात रोहित शर्माने 44 धावांची खेळी केली. या खेळीमुळे टी 20 सामन्यात रोहित शर्माच्या नावावर 3 हजार 307 धावा झाल्या आहेत. आत्तापर्यंत टी 20 क्रिकेटमध्ये …

Read More »

टी-20 सामन्यात सुरक्षेसाठी प्रथमच होणार ड्रोन तंत्रज्ञानाचा वापर

IND vs SL T-20 : काही दिवसांपूर्वी भारताने वेस्ट इंडीज (IND vs WI) संघाला आधी एकदिवसीय आणि नंतर टी20 मालिकेत व्हाईट वॉश दिला. त्यानंतर आता भारत आणि श्रीलंका (IND vs SL) यांच्यातील पहिल्या टी-20 सामन्यात भारताने श्रीलंकेवर (Sri Lanka Team) 62 धावांनी विजय मिळवला आहे. त्यानंतर आता दुसरा टी -20 सामना 26 फेब्रुवारीला धर्मशाला याठिकाणी होणार आहे. यामध्ये प्रथमच सामन्यांवर …

Read More »

IND vs SL, 1st T20: पहिल्या टी20 सामन्यात भारताचा मोठा विजय, 62 धावांनी जिंकला सामना

IND vs SL, Innings Highlight: भारत आणि श्रीलंका (IND vs SL) यांच्यातील पहिल्या टी20 सामन्यात भारताने (Team India) श्रीलंकेवर (Sri Lanka Team) 62 धावांनी विजय मिळवला आहे. सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करत 199 धावा केल्या. ज्यानंतर श्रीलंकेला 20 षटकांत 137 धावांवर रोखत 62 धावांनी सामना जिंकला.   भारत आणि श्रीलंका यांच्यातील या सामन्यात श्रीलंका संघाने नाणेफेक जिंकत गोलंदाजी निवडली. ज्यामुळे फलंदाजीला भारताला …

Read More »