ताज्या

तुम्ही दिवसभरात किती वेळा स्मार्टफोन वापरता? आकडा इतका मोठा की, म्हणाल ही सवय मोडायलाच हवी

Tech News : दैनंदिन जीवनात स्मार्टफोनचा (Smartphone) वापर आता इतका सर्रास झाला आहे, की हल्ली अन्न, वस्त्र आणि निवारा यासोबतच मोबाईल (Mobile) हीसुद्धा अनेकांचीच मूलभूत गरज झाली आहे असं म्हणायला हरकत नाही. अनेकदा रस्त्यानं चालताना, एखाद्या ठिकाणी प्रवास करताना किंवा मग अगदी काहीही न करता घरात बसलेलं असतानाही बरीच मंडळी शांत बसलेली दिसत नाही. साधारण वयोवृद्ध पिढी वगळली तर, उरलेल्या …

Read More »

पेट्रोल-डिझेलच्या किंमतींत बदल, मुंबईसह तुमच्या शहरातील आजचे दर पाहा

Today Petrol Diesel Price on 14 February 2024 : गेल्या काही दिवसांपासून कच्चा तेलाच्या किंमतीत घसरण होत आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात बऱ्याच काळापासून कोणतीही कपाच झालेली नाही. या इंधनांच्या किमती इंडियन ऑइल कॉर्पोरेश, भार पेट्रोलियम कॉर्पोरेशन आणि हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन ठरवतात. कच्चा तेल स्वस्त होऊन किमती कमी करुन या कंपन्यांनी सर्वसामान्यांना दिलासा दिला आहे. तर दुसरीकडे आज महाराष्ट्रात पेट्रोल …

Read More »

शरद पवार गट काँग्रेसमध्ये विलीन होणार? पुण्यातल्या बैठकीत मोठा निर्णय होण्याची शक्यता

Maharashtra Politics : शिवसेना, राष्ट्रवादीच्या फुटीनंतर आता राज्यात आणखी एक मोठी घडामोड होण्याची शक्यता आहे. निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह अजित पवार गटाला बहाल केल्यानंतर शरद पवार मोठं पाऊल उलण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी पक्ष काँगेसमध्ये विलीन होऊ शकते अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे. मात्र शरद पवार गटाकडून याविषयी कोणताही दुजोरा दिलेला नाही. पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी …

Read More »

Mumbai Crime : उल्हासनगर गोळीबार प्रकरणी आमदार गणपत गायकवाड यांना न्यायालयीन कोठडी; वकिलांनी केला खुलासा!

Mumbai Crime News : भाजप आमदार गणपत गायकवाड (MLA Ganpat Gaikwad) यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलीये. पोलीस कोठडी संपत असल्याने त्यांना आज सकाळी उल्हासनगरच्या चोपडा न्यायालयात हजर करण्यात आलं होतं. महेश गायकवाड यांच्यावर पोलीस स्टेशनमध्ये गोळीबार केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. न्यायालय परिसरात जमावबंदीचे आदेश देण्यात आले होते. यापूर्वी न्यायालय परिसरात घोषणाबाजी करणाऱ्या भाजपच्या 30 पेक्षा जास्त कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यात …

Read More »

मनोज जरांगेंच्या नाकातून रक्तस्त्राव सुरु, उपचार करणाऱ्या डॉक्टरांना हकलवून दिलं

नितेश महाजन, झी मीडिया, जालना : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील तिसऱ्यांदा उपोषणाला बसले आहेत. आज उपोषणाचा पाचवा दिवस असून मनोज जरांगे पाटील यांची तब्येत खालावत चालली आहे. उपोषणामुळे प्रकृती खालवल्याने मनोज जरांगे पाटील यांच्या नाकातून रक्तस्राव होत असल्याची माहिती समोर आली आहे. महत्त्वाची बाब म्हणजे मनोज जरांगे पाटील वारंवार वैद्यकीय उपचारास नकार देत असल्याने सरकारसमोर देखील मोठं आव्हान …

Read More »

‘आम्हाला वाट द्या अन्यथा….’; दिल्लीच्या दिशेनं कूच करणाऱ्या शेतकरी नेत्यांनी सरकारला स्पष्टच सांगितलं

Farmers Protest Latest News  : पंजाबमधून हजारोंच्या संख्येनं शेतकरी त्यांच्या काही मागण्यांसह दिल्लीच्या (Delhi) दिशेनं निघाले असून, त्यांनी आपल्या कृतीतून सरकारविषयी असणारी नाराजी स्पष्ट शब्दांत मांडली आहे. शेतकरी आंदोलनाच्या दुसऱ्याच दिवशी एकंदर चित्र पाहता शेतकरी नेता सरवन सिंह पंधेर यांनी काही गोष्टी अधिक स्पष्टपणे सांगितल्या आहेत.  ‘शेतकऱ्यांना त्यांचा मुद्दा मांडण्याची संधी द्यावी. आम्हाला स्थानिकांचाही पाठिंबा आहे, त्यामुळं हे आंदोलन असंच …

Read More »

Maharastra Politics : अशोक चव्हाणांनी ‘हात’ झटकला, नांदेडचा गड काँग्रेस राखणार का?

Ashok Chavan joined BJP : अजूनही वेळ गेलेली नाही, अशोक चव्हाण यांनी त्यांच्या निर्णयाचा फेरविचार करावा, असं आवाहन नाना पटोले यांनी गांधी भवन येथे काँग्रेसच्या बैठकीनंतर केलं. अशोक चव्हाण यांच्या जाण्याने काँग्रेसला मोठा सेटबॅक बसलाय, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. ‘काँग्रेस पक्षाने अशोक चव्हाण यांना नेहमीच मोठी संधी दिली. अशोक चव्हाण यांना काँग्रेस पक्षात नेतृत्व करण्याची नेहमीच संधी मिळाली …

Read More »

Sundar Pichai यांच्या दिवसाची सुरूवात कशी होते? सकाळी उठल्या उठल्या करतात हे काम!

Google CEO Sundar Pichai : एखादा विद्यार्थी जेव्हा इंजिनियरिंगला अॅडमिशन घेतो, तेव्हा त्याचं स्वप्न असतं, की आपणही गुगल किंवा मायक्रोसॉफ्स सारख्या कंपनीत काम करावं. भारतात तसं पहायला गेलं तर टॅलेन्टची काहीच कमी नाही. मोठमोठ्या मल्टीनॅशनल कंपनीमध्ये देखील आता भारतीय लोक दिसून येतात. जगातील सर्वात मोठी टेक कंपनी असलेल्या गुगलमध्ये देखील भारतीय चेहरा सर्वांसाठी आकर्षणाचा केंद्र ठरतोय. होय, गुगलचे सीईओ सुंदर …

Read More »

नागपूर, नाशिकनंतर कोल्हापुरातही वनरक्षक पदाच्या भरती प्रक्रियेत मोठा गोंधळ; परिक्षा उत्तीर्ण होऊनही नोकरी मिळणे कठिण

Kolhapur News :  वनरक्षक पदाच्या भरती प्रक्रियेतील सावळा गोंधळ संपता संपत नाहीय. राज्यात 1256 वनरक्षकांची भरती प्रक्रिया पूर्ण करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असून संबंधित प्रक्रिया वेगात पूर्ण करायचे निर्देश वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी नुकतेच दिले आहेत. मात्र प्रक्रियेत मोठा गोंधळ निर्माण झाला असून नागपूर आणि नाशिकनंतर कोल्हापुरात देखील गोंधळ पाहायला मिळत आहे. कागदपत्र तपासणी संदर्भातल्या दोन वेगवेगळ्या तारखा उमेदवारांना …

Read More »

Maharasta Politics : ‘दिल्लीपती बादशहाला मातीत…’, रोहित पवारांचा अशोक चव्हाणांना टोला, स्पष्टच विचारलं ‘आपण कोण?’

Maharasta Politics : ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी ‘हात’ झटकले अन् भाजपमध्ये प्रवेश केला आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अशोक चव्हाण यांना घेतलेल्या निर्णयामुळे काँग्रेस (Maharastra Congress) आणि महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला आहे. त्यामुळे आता महाराष्ट्रात काँग्रेसला देखील गळती लागल्याचं पहायला मिळतंय. अशातच आता महाविकास आघाडीतील अस्वस्थता वाढली असून बैठकांचा धडाका सुरू झाला आहे. …

Read More »

पुण्यातील खराडी परिसरात घोंगावणारं ‘ते’ वादळ डासांचं नाही! धक्कादायक माहिती आली समोर…

Pune Mosquito Tornado: दोन दिवसांपासून सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होतोय. यात मोठ्या प्रमाणांवर डासांचा वावर पाहायला मिळतोय. जणू डासांनी या इमारतींवर हल्ला केल्यालाच भास होतोय. हा व्हिडिओ पुण्यातील केशवनगर मुंढवा खराडी नदीपात्रातील असल्याचे सांगण्यात येतेय. मात्र, आता हे डास नसल्याचे समोर आले आहे.  पुण्याच्या खराडी परिसरात डासांचं वादळ घोंगावत असल्याचा व्हिडीओ गेले दोन दिवस सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. …

Read More »

शाहरुखमुळे नौदल अधिकाऱ्यांची सुटका; MEA सपशेल अपयशी, स्वामींच्या दाव्यावर अभिनेत्याचं स्पष्टीकरण, म्हणाला…

कतारच्या जेलमध्ये अडकलेल्या 8 माजी भारतीय नौदल अधिकाऱ्यांची अखेर सुटका करण्यात आली आहे. कतारच्या कोर्टाने हेरगिरी प्रकरणी या अधिकाऱ्यांना मृत्यदंडाची शिक्षा सुनावली होती. नंतर त्याचं जन्मठेपेत रुपांत करण्यात आलं होतं. दरम्यान कतारने सुटका केल्यानंतर 7 अधिकारी मायदेशी परतले असून पंतप्रधान नरेंद्र मोदींचे (PM Narendra Modi) आभार मानले आहेत. नरेंद्र मोदींच्या मध्यस्थीशिवाय आमची सुटका शक्य नव्हती अशी भावना या अधिकाऱ्यांनी व्यक्त …

Read More »

बदलापूर ते पनवेल फक्त 15 मिनिटात; माथेरानच्या पर्वतरांगातून जाणार बोगदा

JNPT HIGHWAY BADLAPUR TUNNEL : बदलापूर ते पनवेल अंतर अवघ्या 15 मिनीटात पार करता येणार आहे. जेएनपीटी वडोदरा महामार्गातील बोगद्याचे काम प्रगतीपथावर आहे.   माथेरानच्या पर्वतरांगामधून जाणाऱ्या या बोगद्याचे काम  2025 ला पूर्ण होणार आहे. यामुळे बदलापूर आणि पनवेलकराचा प्रवास सुपरफास्ट होणार आहे.   बदलापूर शहरातून जाणाऱ्या जेएनपीटी वडोदरा या महामार्गात येणाऱ्या बोगद्याचे काम 25 टक्के पूर्ण झाले आहे. माथेरानच्या पर्वतरांगातून जाणाऱ्या …

Read More »

अवकाळी, गारपिटीचा तडाखा, शेतकऱ्याने शोधला शेतीचा नवा पर्याय, वर्षभराची मेहनत फळली

चेतन कोळस, येवला, झी मीडिया Farming In Maharashtra: हवामान बदलाचा परिणाम शेतीवरही होत आहे. अवकाळी पाऊस आणि गारपिटी यामुळं शेतकरी हवालदिल झाला आहे. या वर्षात हिवाळ्यात पाऊस झाल्यामुळं काढणीला आलेले पिक वाया गेले आहे. हाता-तोंडाशी आलेला घास अवकाळीने हिरावल्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी दाटले आहे. अवकाळीमुळं शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान होत आहे. त्यामुळंच तरुण शेतकरी आता मॉर्डन शेतीकडे वळले आहेत. निफाड …

Read More »

‘….तर ही वेळ आली नसती,’ अशोक चव्हाणांनी पक्ष सोडल्यानंतर काँग्रेस नेत्याचा गौप्यस्फोट, ‘एका नेत्यामुळे…’

काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देऊन अखेर भाजपात (BJP) प्रवेश केला आहे. यानंतर काँग्रेसच्या अनेक नेत्यांकडून प्रतिक्रिया दिली जात असून, नाना पटोले (Nana Patole) यांनी तर निर्लज्जपणाची देखील काहीतरी एक सीमा असते असं म्हणत भाजपावर निशाणा साधला आहे. यादरम्यान काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी मात्र पक्षाला आरसा दाखवला आहे. अशोक चव्हाणांना सांभाळण्याची जबाबदारी …

Read More »

न्याय मिळेना! तरुणाने पोलीस चौकीसमोरच स्वत:ला पेटवले, पुण्यात धक्कादाय प्रकार

Pune Crime: पोलीस चौकीसमोरच तरुमाने स्वत:ला पेटवून घेत आत्महत्येचा प्रयत्न करण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली. न्याय मिळत नसल्याने तरुणाने हे पाऊल उचलल्याचे सांगण्यात येत आहे. याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.  रोहिदास अशोक जाधव असे आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या तरुणाचे नाव असून तो 28 वर्षांचा आहे. रोहिदास हा वाघोलीच्य डोमखेल रोडवरी रा. सिद्धी अपार्टमेंटमध्ये राहतो. काही कारणामुळे …

Read More »

अरे देवा! 20 फेब्रुवारीपासून Ola Uber ची सेवा बंद, नेमकं कारण काय?

Ola Uber News: प्रवास करत असताना रेल्वे, बस, खासगी वाहन, टॅक्सी आणि App च्या माध्यमातून पुरवली जाणारी कॅब सुविधा या साधनांची मोठी मदत होते. वेळेनुसार प्रत्येकजम प्रवास करण्याचं माध्यम निवडून त्या माध्यमानं अपेक्षित ठिकाणी पोहोचतो. यामध्ये मागच्या काही वर्षांमध्ये Ola Uber ची लोकप्रियता आणि त्याहून त्यांचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे.  सुरुवातीच्या दिवसांमध्ये अनेकांना Luxury वाटणारी ही App Based कॅब …

Read More »

‘मला फरक नाही पडत, तुम्ही हवं ते करा,’ विनाहेल्मेट पकडलं म्हणून तरुणाने पोलीस कॉन्स्टेबलचं बोट चावलं

आपण वाहन चालवताना किंवा रस्त्यावरुन चालताना अनेक चालक सर्रासपणे वाहतुकीच्या नियमांचं उल्लंघन करताना दिसतात. अशाप्रकारे ते फक्त आपलाच नाही तर इतरांचाही जीव धोक्यात घालत असतात. दरम्यान आपण नियमांचं उल्लंघन केलेलं असतानाही हे चालक पोलिसांनी पकडल्यानंतर त्यांच्याशी हुज्जत घालत असतात. अशावेळी अनेकदा त्यांच्याकडून पोलिसांना अपशब्द वापरत, मारहाणही केली जाते. पण असं करत आपण कायद्याच्या कचाट्यात अडकून आपल्या नावे गुन्हा दाखल होऊ …

Read More »

लेकीसाठी बाप मैदानात उतरणार! शरद पवार बारामतीत ठोकणार तळ

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यानंतर राज्यसभा निवडणुकीच्या निमित्ताने पहिल्यांदाच दोन्ही गट आमने-सामने येणार आहेत. या निवडणुकीच्या माध्यमातून दोन्ही गटांकडून शक्तीप्रदर्शन करण्याचा प्रयत्न असेल. दरम्यान सुप्रिया सुळे यांच्यासाठी शरद पवार बारामती विधानसभा मतदारसंघाच्या मैदानात उतरणार असल्याची माहिती आहे. शरद पवार बारामती लोकसभा मैदानात तळ ठोकणार आहेत.  शरद पवार बारामती लोकसभेसाठी मैदानात उतरले आहेत. शरद पवार सलग चार दिवस विधानसभा मतदारसंघात बैठका …

Read More »

अशोक चव्हाणांच्या बंडानंतर काँग्रेसचे डॅमेज कंट्रोल सुरू; सर्व आमदारांना नाना पटोलेंचा फोन, म्हणाले…

Congress Alert Over Ashok Chavan Resign: माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी पक्षसदस्यत्वाचा आणि आमदारकीचा राजीनामा दिला. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे सोमवारी आपला राजीनामा सुपूर्द केला. अशोक चव्हाण आज भाजपमध्ये (BJP) पक्ष प्रवेश करणार आहेत. अशोक चव्हाण यांच्या बंडानंतर काँग्रेस नेते अलर्टवर आले आहेत. काँग्रेसच्या गोटात मोठ्या हालचाली सुरू आहेत. (Ashok Chavan Join BJP) अशोक …

Read More »