Bird Flu Outbreak: बर्ड फ्लू ची कारणे, लक्षणे आणि उपाय

What Is Bird Flu: बर्ड फ्लू म्हणजे नेमके काय आणि बर्ड फ्लू होण्याची कारणे कोणती याची उत्तरे आपल्याला प्रत्येकाला माहीत असायला हवीत. बर्ड फ्लू हा एक प्रसिद्ध आजार असून एव्हियन इन्फ्लुएंझा व्हायरस H5N1 मुळे होतो. यामुळेच याला Avian Influenza Virus असंही म्हणतात. हा आजार पक्ष्यांना अधिक होतो मात्र माणसांमध्ये संक्रमित होतो.

बर्ड फ्लू इन्फेक्शन हे चिकन, मोर, टर्की, मोर अशा पक्ष्यांमुळे अधिक पसरतो. काही जणांना या आजाराबाबत कळूनही येत नाही आणि मृत्यूचा धोकाही संभवतो. आतापर्यंत H5N1 आणि H7N9 यांना बर्ड फ्लू चे प्रकार मानले जाते होते मात्र आता या यादीत H5N8 चा देखील समावेश झालेला दिसून येत आहे. डोळे, कान, तोंडाद्वारे व्हायरसचे संक्रमपण होऊन हा आजार होतो. अधिक माहिती जाणून घ्या. (फोटो सौजन्य: iStock)

काय आहे बर्ड फ्लू ची लक्षणे

काय आहे बर्ड फ्लू ची लक्षणे

Symptoms Of Bird Flu In Marathi: बर्ड फ्लू ची लक्षणे सामान्य तापासारखीच दिसून येतात मात्र श्वास घेण्यात समस्या दिसते आणि प्रत्येक वेळी उलटी होण्यासारखे वाटत राहाते. काही सामान्य लक्षणे जाणून घ्या –

  • ताप आणि नेहमी कफ राहणे
  • नाक वाहणे
  • डोके दुखत राहणे
  • घशात सूज असणे
  • पोटात जंत होणे
  • सतत मळमळ होत राहणे आणि उलटीसारखे वाटणे
  • श्वासाचा त्रास, श्वास घ्यायला न जमणे, निमोनियासारखे वाटणे
  • डोळ्यांना त्रास
हेही वाचा :  मराठा आंदोलनावर लाठीचार्ज: राज ठाकरे संतापून म्हणाले, 'सरकार बनवणं, ते पाडून दुसरं बनवण्याची खुमखुमी...'

(वाचा – पोट आणि कमरेवरील हट्टी चरबी करेल कमी जास्वंदीचा चहा, काय सांगतात डाएटिशियन)

बर्ड फ्लू ची कारणे आणि धोका

बर्ड फ्लू ची कारणे आणि धोका

Bird Flu Causes And Risk Factors: सगळ्यात जास्त धोका हा माणसांना तेव्हा असतो जेव्हा अशी व्यक्ती संक्रमित पक्षांच्या संपर्कात येते. एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे हा आजार संक्रमित होतो. काय आहेत धोके –

  • पक्षांचा मळ असणाऱ्या पाण्याने आंघोळ केल्यास माणसाला बर्ड फ्लू होऊ शकतो
  • संक्रमित पक्षी असणाऱ्या ठिकाणी माणसांनी श्वास घेणे
  • पोल्ट्री फार्ममध्ये काम करणाऱ्या व्यक्तींना अधिक धोका
  • कच्चे अथवा अर्धकच्चे चिकन खाणे

(वाचा – बद्धकोष्ठता आणि पोटाची चरबी जाळण्यासाठी रामबाण उपाय, आयुर्वेदानुसार किचनमधील हा मसाला ठरेल खास)

बर्ड फ्लू कसा टाळावा

बर्ड फ्लू कसा टाळावा

Prevention Of Bird Flu: बर्ड फ्लू टाळता येऊ शकतो मात्र त्यासाठी तुम्हाला काही काळजी घेण्याची आवश्यकता आहे.

  • संक्रमित पक्षी अथवा मेलेल्या पक्षांपासून दूर राहा
  • नॉनव्हेज खाणे टाळा
  • नॉनव्हेज खरेदी करताना स्वच्छता पाळा
  • आपले हात सतत धुवा. सॅनिटायझरचा वापर करावा
  • संक्रमण असणाऱ्या जागेत न जाण्याचा प्रयत्न करा. कोणत्याही कारणाने जावे लागल्यास मास्क घाला
  • तुम्हाला तापासारखे वाटत असेल तर Influenza लसीकरण करून घ्या
हेही वाचा :  चेहऱ्याच्या लटकत्या त्वचेवर लावा हे तेल, ठरेल वरदान आणि येईल अधिक चमकदारपणा

(वाचा – उन्हाळा सुरु झालाय ट्राय करा ताक आणि मसालेदार मठ्ठा, आरोग्यासाठी ठरेल वरदान )

बर्ड फ्लू चे उपाय

बर्ड फ्लू चे उपाय

Bird Flu Treatment: बर्ड फ्लू चे उपाय हे अँटीव्हायरल ड्रग ओशेल्टामिव्हर आणि रेलेएन्झाने करण्यात येतात. हा व्हायरस कमी करण्यासाठी पूर्ण आरामाची गरज आहे. हेल्दी डाएटचा समावेश करून घ्यावा आणि जास्तीत जास्त लिक्विड डाएटचा वापर करावा. लसीकरण आवश्यक आहे. तसंच दुसऱ्या व्यक्तीच्या संपर्कात येणे टाळावे.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी असून यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. अधिक जास्त माहितीसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य ते बदल करा.

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Loksabha : बारामतीच्या सभेत बोलताना रोहित पवारांना अश्रू अनावर, अजितदादांनी केली नक्कल, म्हणाले ‘आमच्या पठ्ठ्यानं…’

Rohit Pawar burst into tears : येत्या सात मे रोजी होणाऱ्या तिसऱ्या टप्प्यातील लोकसभेच्या (Loksabha Election) …

‘मुंबईत गिरगावमध्ये नोकरीची संधी पण मराठी उमेदवार नको’; महिला HR ची संतापजनक पोस्ट

HR LinkedIn Post Related to Marathi People : सध्या सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरल होत …