रोज रात्री नाभीमध्ये घाला तेल, नाभीत तेल घालण्याचे आरोग्यदायी फायदे

Health Tips: भारतामध्ये प्राचीन काळापासून शरीराच्या काही भागांना मालिश करण्यता येते. हात, पाय आणि नाभी अर्थात बेंबीच्या ठिकाणी तेलाने मालिश केल्यास अनेक फायदे मिळतात. पारंपरिकतेनुसार सांगण्यात आल्याप्रमाणे नाभीमध्ये तेल घालणे हे nervous system अधिक योग्य आणि संतुलित करण्यास मदत करते.

इतकंच नाही तर Belly Button मध्ये तेलाने मालिश केल्यास बाहेरून आणि शरीराच्या आतून दोन्ही फायदे मिळतात. तसंच नाभीच्या ठिकाणी मळही जमा होत नाही. नाभीमध्ये तेल घालण्याचे नक्की काय फायदे आहेत हे डॉ. विवेक जोशी यांच्या व्हिडिओतील माहिती घेऊन आम्ही तुम्हाला सांगत आहोत. (फोटो सौजन्य – Freepik.com)

डॉक्टरांनी सांगितले नाभीत तेल घालण्याचे फायदे

पोटातील दुखणे होते कमी

पोटातील दुखणे होते कमी

Benefits of Putting Oil In Navel: आयुर्वेदात सांगितल्याप्रमाणे नाभीमध्ये तेल लाऊन मालिश केल्याने पोटातील दुखणे कमी होते. मोहरीच्या तेलामध्ये आल्याचा रस अथवा आल्याचा किस मिक्स करून बेंबीमध्ये या तेलाचे ३-४ थेंब घालावे. यामुळे पोटात होणारी मळमळ, उलटी अथवा ब्लोटिंगसारख्या समस्या दूर होण्यास मदत मिळते.

हेही वाचा :  काळे अक्रोड आहे आरोग्याचा खजिना, ‘हे’ आहेत सर्वात उत्तम फायदे

मळ होतो साफ

मळ होतो साफ

बरेचदा आंघोळ करताना बेंबीचा भाग हा दुर्लक्षित होतो. मात्र तुम्ही यामध्ये रात्री तेल घातल्यास स्वच्छ करणे लक्षात राहाते. नाभीत साचलेला मळ काढून टाकण्यासाठी याची मदत मिळते. तसंच तेलामुळे नाभी स्वच्छ राहाते.

(वाचा – ​पोट आणि कमरेवरील हट्टी चरबी करेल कमी जास्वंदीचा चहा, काय सांगतात डाएटिशियन )

शरीरीचे संतुलन राखण्यास मदत

शरीरीचे संतुलन राखण्यास मदत

योगा आणि आयुर्वेदानुसार, शरीराचे चक्र हे नाभीपासूनच सुरू होते. त्यामुळे शरीराचे संतुलन राखण्यासाठी नाभीमध्ये तेल घालून मालिश करण्यात येते. नाभीत तेल घातल्याने त्वचेचे आरोग्यही संतुलित राहाते. यामुळे त्वचेला अधिक चमक येते असंही सांगण्यात येते. तसंच डोकं शांत ठेवण्यासाठीही याचटा उपयोग होतो आणि सांधेदुखीपासून सुटका मिळते.

(वाचा – बद्धकोष्ठता आणि पोटाची चरबी जाळण्यासाठी रामबाण उपाय, आयुर्वेदानुसार किचनमधील हा मसाला ठरेल खास)

चेहऱ्यावर चमक येण्यासाठी नारळ वा बदामाचे तेल

चेहऱ्यावर चमक येण्यासाठी नारळ वा बदामाचे तेल

Coconut Oil Or Almond Oil: चेहऱ्यावर चमक यायला हवी असेल तर नारळ अथवा बदामाचे तेल तुम्ही नाभीमध्ये घालू शकता. यामुळे त्वचा अधिक चमक येते आणि लवकरच कोरडी त्वचाही मऊ आणि मुलायम होते. रोज रात्री ३ थेंब नारळाचे अथवा बदामाचे तेल नाभीमध्ये घातल्यास तुम्हाला फायदा मिळेल.

हेही वाचा :  वजन कमी करण्यासाठी चुकीच्या डाएटचे फॅड टाळा, अन्यथा होईल विपरीत परिणाम

(वाचा – उन्हाळा सुरु झालाय ट्राय करा ताक आणि मसालेदार मठ्ठा, आरोग्यासाठी ठरेल वरदान )

वजन कमी करण्यासाठी ऑलिव्ह ऑईल

वजन कमी करण्यासाठी ऑलिव्ह ऑईल

Olive Oil For Weight Loss: पोटातील दुखणे कमी करण्यासाठी अथवा वजन कमी करण्यासाठी आणि कंबरदुखीपासून आराम मिळण्यासाठी ऑलिव्ह ऑईलचा वापर करावा. रोज रात्री ३ थेंब ऑलिव्ह ऑईलचे नाभीमध्ये घातल्यास, याचा फायदा मिळतो.

केसांच्या वाढीसाठी मोहरीचे तेल

केसांच्या वाढीसाठी मोहरीचे तेल

Mustard Oil For Hair Growth: नाभीत मोहरीचे तेल घातल्याने अनेक गोष्टींपासून सुटका मिळते. फाटलेल्या ओठांसाठी, डोळ्यांच्या चांगल्या दृष्टीसाठी आणि केसांची वाढ होण्यासाठी अथवा डोकेदुखीपासून सुटका मिळविण्यासाठी तुम्ही २-३ थेंब मोहरीच्या तेलाचा वापर रोज रात्री करावा.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी असून यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. अधिक जास्त माहितीसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य ते बदल करा.

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

मैत्रिणींसोबत ट्रिपला गेली, हॉटेलमध्ये झालं असं काही की घरी येताच महिलेने नवऱ्याला दिला घटस्फोट

Trending News In Marathi: पती-पत्नी यांच्यात अनेक कारणांवरुन वाद होत असतात. कधी कधी याच वादातून …

पहिल्या तीन महिन्यातच मोडला कणा; ‘या’ कंपनीकडून 6000 कर्मचाऱ्यांना नारळ देण्याची तयारी, नावांची यादीही तयार

Layoff News : फेब्रुवारी, मार्च आणि एप्रिल या महिन्यांदरम्यान अनेक कंपन्यांमध्ये लगबग पाहायला मिळते ती …