चेहऱ्याच्या लटकत्या त्वचेवर लावा हे तेल, ठरेल वरदान आणि येईल अधिक चमकदारपणा

​कोणत्या तेलाने करावी मालिश​

​कोणत्या तेलाने करावी मालिश​

Which Oil Should Use For Face Massage: तुमची त्वचा जर कोरडी आणि निस्तेज असेल तर नारळाचे तेल हे त्वचेसाठी उत्तम आणि फायदेशीर ठरते. त्वचेमध्ये मऊ आणि मुलायमपणा राखून ठेवण्यास आणि अधिक कसावट आणण्यासाठी याचा फायदा करून घेता येतो. याशिवाय चेहऱ्यावर डाग पिगमेंटेशन गायब करण्यासाठीही याचा उपयोग होतो.

​कसे वापरावे?​

​कसे वापरावे?​

How To Use Coconut Oil For Massage: तुम्ही नियमित आंघोळीच्या आधी नुसत्या नारळाच्या तेलाने चेहऱ्याचा मसाज करू शकता. तसंच नारळाच्या तेलात चिमूटभर हळदपावडर घाला आणि त्याची पेस्ट चेहऱ्याला लाऊन हलक्या हाताने मसाज करू शकता. त्वचा टाईट राखण्यासाठी आणि त्वचेला अधिक चमकमिळवून देण्यासाठी याचा उपयोग करून घेता येतो. नारळाच्या तेलात नैसर्गिक घटक असल्यामुळे त्वचेला चांगले पोषण मिळते.

​नारळाच्या तेलाने कधी मालिश करावे?​

​नारळाच्या तेलाने कधी मालिश करावे?​

तुम्ही रोज रात्री झोपण्यापूर्वी नारळाच्या तेलाने मालिश करू शकता. यामुळे त्वचा सकाळी चमकदारआणि तजेलदार दिसेल. घरातील आजी आजोबा बऱ्याचदा याचा वापर त्वचेवर करताना दिसून येतील. अगदी अर्धा चमचा तेल घेऊनही तुम्ही हलक्या हाताने केलेली मालिश चेहऱ्याच्या त्वचेसाठी परिणामकारक ठरू शकते.

हेही वाचा :  'फडणवीसांनी मोदी-शहांना पत्र लिहून, पटेलांना भेटणे देशहिताचे नसून भाजपच्या...'; ठाकरे गटाचा सल्ला

​कोणी वापर करू नये?​

​कोणी वापर करू नये?​

पण तुमची त्वचा तेलकट अर्थात Oily Skin असेल तर मात्र नारळाच्या तेलाचा वापर करू नये. याचा विपरीत परिणाम होण्याची शक्यता असते. तसंच ज्या व्यक्तींना नारळाच्या तेलाची अलर्जी असेल त्यांनीही याचा वापर चेहऱ्यावर करू नये.

​नारळाच्या तेलात असणारे पोषक तत्व ​

​नारळाच्या तेलात असणारे पोषक तत्व ​

Nutrients In Coconut Oil: नारळाच्या तेलामध्ये सॅच्युरेटेड फॅट जास्त प्रमाणात असतात. याशिवाय अँटीबॅक्टेरियल, अँटीऑक्सिडंट्स, विटामिन ई, विटामिन के सारखे गुण आढळतात, जे त्वचेसाठी अत्यंत फायदेशीर ठरतात. नारळाच्या तेलाचे दुष्परिणाम होत नाहीत. मात्र तरीही तुम्ही एकदा डर्मेटॉलॉजिस्टचा सल्ला घेऊन याचा वापर केल्यास अधिक चांगले ठरते.

अशाच अधिक लाइफस्टाइल, हेल्थ, फॅशन, ब्युटी, होम डेकोर, रिलेशनशिप, हॅक्स यावरील अधिक माहितीसाठी क्लिक करा maharashtratimes.com

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Loksabha Election : काहींची नावं गायब, तर काहींचा अपंग म्हणून उल्लेख; मतदार यादीतील घोळ संपता संपेना

Loksabha Election 2024 Voting List : सध्या संपूर्ण देशभरात लोकसभा निवडणुकांची धामधुम सुरु आहे. लोकसभेच्या …

गर्भपातानंतर अर्भकाचे तुकडे फेकायचे शेतात..राज्यभरातून यायच्या महिला..’; ‘असा’ चालायचा गोरखधंदा

विशाल करोळे, झी 24 तास, संभाजी नगर:  गेल्या आठवड्यात छत्रपती संभाजी नगरमध्ये उच्चभृ वसाहतीत अवैध …