विराट कोहली, मलायका अरोरासारख्या सुपरफिट लोकांच्या दीर्घायुषाचे रहस्य आहे हे खास पाणी

युनिसेफच्या एका रिपोर्टनुसार, भारतातील निम्म्याहूनही कमी लोकांना पिण्याचे पाणी शुद्ध मिळते. म्हणजेच आपल्या देशातील बहुतांश लोक अजूनही घाण व अस्वच्छच पाणी पीत आहेत. पण आता हा मुद्दा केवळ स्वच्छ आणि घाण पाण्याचा राहिलेला नाही. तर आता पाण्याचे दोन भाग झाले आहेत ते म्हणजे श्रीमंतांचे पाणी आणि गरीबांचे पाणी. भारतीय क्रिकेटर विराट कोहली (Virat Kohli), मिस युनिव्हर्स उर्वशी रौतेला (Urvashi Rautela), अभिनेत्री मलायका अरोरा (Malaika Arora) यांसारख्या सेलिब्रिटींसह अनेक श्रीमंत लोक काळे (What Is Black Water) पाणी पितात.

500 मिली काळ्या पाण्याची ऑनलाइन किंमत 100 रुपये इतकी कमी आहे. त्याच्या रंगानंतर आता हे पाणी इतके महाग का आहे, हा प्रश्न तुमच्याआमच्यापैकी अनेकांना सतावत असतो. तर काळे पाणी इतके खास व महाग का आहे? चला तर जाणून घेऊया सर्व प्रश्नांची उत्तरे थेट तज्ज्ञांकडूनच.

काळ्या पाण्याच्या फायद्यांबाबत एक्सपर्ट्स काय म्हणतात?

शालीमार बाग स्थित मॅक्स सुपर स्पेशॅलिटी हॉस्पिटलमध्ये क्लिनिकल न्यूट्रिशन अँड डायटेटिक्सच्या हेड आणि डायटीशियन गीता बुर्योक सांगतात की, काळे पाणी हे केवळ सामान्य लोकांच्या घरी पिण्याचे पाणी म्हणून पोहोचणा-या साध्या पाण्यापेक्षा रंगानेच नाही तर गुणधर्मांमध्ये देखील वेगळे आहे. जिम किंवा व्यायाम केल्यानंतर किंवा जास्त घाम आल्यावर या पाण्याचे सेवन केल्याने शरीरातील गेलेले पाणी किंवा कमतरता लगेच भरून निघते व डिहायड्रेटेड शरीराला ताबडतोब हायड्रेटेड करता येते. शरीराला आवश्यक असणा-या ज्या पोषक तत्वांची पूर्तता सामान्य पाणी करते ते पोषक तत्व काळ्या पाण्यात जास्त असतात. पण काळे पाणी किती आरोग्यदायी आहे, हे तुमच्या शरीराच्या गरजांवर बऱ्याच अंशी अवलंबून असते.

हेही वाचा :  अरबाज खानमुळेच 19 वर्षांचा संसार संपवावा लागल्याची मलायका अरोराला खंत, समस्त पुरूष जातीला दिला एक प्रेमळ सल्ला

(वाचा :- वाढत्या प्रदूषणाने फुफ्फुसाचे भंयकर आजार, फुफ्फुसे निकामी होऊ नये म्हणून घरबसल्या शरीरातून अशी काढा घाणेरडी हवा)

काळ्या पाण्याची खासियत काय आहे?

क्षारीय पाणी (Alkaline water) किंवा काळे पाणी शरीराला सामान्य पाण्यापेक्षा जास्त काळ हायड्रेटेड ठेवते. त्याची ph पातळी सामान्य पाण्यापेक्षा जास्त असते, जी 8 ते 8.5 इतकी आहे. काळे पाणी हे एक उत्तम डिटॉक्स ड्रिंक मानले जाते जे शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकण्यास मदत करते. याशिवाय काळ्या पाण्याच्या सेवनाने अॅसिडिटीचा त्रास होत नाही. तसेच काळे पाणी चयापचय (Metabolism) आणि रोगप्रतिकारक शक्ती (Immunity Power) वाढवण्याचे काम करते.

(वाचा :- रॉकेट स्पीडने पसरतोय RSV Virus, डोळे, नाक, तोंडातून घुसून दाखवतो ही 11 भयंकर लक्षणं, मुलं व वृद्धांसाठी जीवघेणा))

नॉर्मल पाणी शरीरावर काय परिणाम करतं?

तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, पिण्याचे पाणी मग ते सामान्य असो किंवा मग काळे, पाण्याचा आपल्या आरोग्यावर मोठ्या प्रमाणात परिणाम होत असतो. 80 ते 90% सामान्य लोक सामान्य पाणी पीत आहेत आणि काळे पाणी नाही, मग ती शहरी लोकसंख्या असो वा ग्रामीण. पाणी पिणे आपल्या आरोग्यासाठी प्रामुख्याने आवश्यक आहे, कारण ते आपल्या शरीराला अनेक आरोग्यदायी फायदे प्रदान करते. पीएच पातळी जास्त असल्यामुळे काळ्या पाण्याचे आरोग्यावर काही अतिरिक्त जास्तीचे फायदे असल्याचे म्हटले जाते. पण त्याचा अतिवापर केल्याने उलट दुष्परिणामही दिसून येतात.

हेही वाचा :  INDIA Alliance : 'आता भाजप संघावरही बंदी आणेल, कारण...' उद्धव ठाकरेंचा घणाघात

(वाचा :- भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राने Olympics Gold Medal जिंकल्यावर केली 1 मोठी चूक, हाताबाहेर गेलेलं वजन असं केलं कमी)

काळ्या पाण्यातून मिळणारे लाभ नॉर्मल पाण्यातून कसे मिळवावेत?

या प्रश्नाचे उत्तर देताना आहारतज्ज्ञ गीता सांगतात की, सामान्य पाण्याचे फायदे मिळवण्यासाठी सर्वप्रथम दिवसभर योग्य प्रमाणात पाणी पिणे आवश्यक आहे. प्रत्येकाने दिवसातून किमान 8 ते 10 ग्लास पाणी प्यावे. पण असेही म्हटले जाते की दिवसभर आपले शरीर हायड्रेटेड ठेवण्यासाठी सुमारे 12 ते 15 ग्लास पाणी पिण्याचा देखील सल्ला दिला जातो. जेव्हा शरीरात पुरेसे किंवा योग्य प्रमाणात पाणी उपलब्ध होते, तेव्हा त्याचा फायदा शरीराला स्वतःच होऊ लागतो, मग ते पाणी काळे असो किंवा मग सामान्य पाणी असो, त्याचा फायदा होणारच.

(वाचा :- Diabetes Symptoms On Hand : हातांत ही 12 लक्षणे दिसली तर समजून जा झालाय डायबिटीज, ब्लड शुगर वाढताच दिसतात या खुणा)

नॉर्मल पाणी पिण्याआधी करा हे काम

नळातून येणारे पाणी थेट पिऊ नये. पिण्यापूर्वी ते चांगले उकळवा. उकळलेले पाणी त्यात असलेले विषारी पदार्थ मारून टाकते, ज्यामुळे बद्धकोष्ठता दूर करणे, विषारी पदार्थांपासून मुक्त होणे, शरीरातील ब्लड सर्क्युलेशन सुधारणे यासारखे अनेक आरोग्यदायी फायदे मिळतात. याशिवाय, चांगल्या डिटॉक्सिफिकेशनसाठी, चांगल्या पचनासाठी, तुम्ही सकाळी कोमट पाण्यात लिंबाचा रस किंवा सब्जा सिड्स, चिया सीड्स मिसळून पिऊ शकता.

हेही वाचा :  मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी! पश्चिम रेल्वेवरील 6 लोकलच्या वेळेत बदल, वाचा बदललेले वेळापत्रक

(वाचा :- किचनमधील या गोष्टी ठरतात किडनी, ह्रदय, मेंदू खराब होण्यास जबाबदार, घरचं जेवण खाऊनही पडत असाल सतत आजारी तर सावधान)

एल्कलाइन किंवा ब्लॅक वॉटरचे साइड इफेक्ट्स

Webmd नुसार, जोपर्यंत तुम्हाला कोणताही किडनीचा आजार होत नाही, तोपर्यंत अल्कधर्मी किंवा काळ्या पाण्यामुळे कोणतेही गंभीर आरोग्याचे धोके होत नाहीत. या पाण्याची pH पातळी जास्त असल्यामुळे तुमची त्वचा कोरडी पडू शकते आणि खाज सुटू शकते किंवा पोट खराब होऊ शकते. अशा स्थितीत या पाण्याचे दीर्घकाळ सेवन करणे तुमच्यासाठी हानिकारक ठरू शकते. कृपया ते सेवन करण्यापूर्वी तज्ञांचा किंवा डॉक्टरांचा सल्ला घ्या.

(वाचा :- Diabetes व Cholesterol या भयंकर आजारांचा दुश्मन आहे ही भाजी, डॉक्टर म्हणतात नुसतं पान चावल्याने दूर होतात 15 आजार)

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

‘मोदींच्या मनमानीविरुद्ध..’, ‘सत्तेतले नक्षलवादी’ म्हणत ठाकरे गटाची शिंदे-फडणवीस, मोदी-शाहांवर टीका

Urban Naxal Issue: शहरी नक्षलवादाच्या मुद्द्यावरुन ठाकरे गटाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर कठोर शब्दांमध्ये टीकास्र सोडलं …

Maharashtra Weather News : पुढील 24 तासांत पाऊस हुलकावणी देणार की दिलासा? हवामान विभागानं स्पष्टच सांगितलं

Maharashtra Weather News : मान्सूननं (Monsoon) देशात हजेरी लावल्यानंतर दक्षिणेकडील राज्य आणि महाराष्ट्राचा काही भाग …