लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये शोषण होतंय, वेळीच पडा बाहेर पाहू नका अंत!

एकमेकांच्या प्रेमात असणं, एकमेकांना जपणं हे नात्यात अत्यंत महत्त्वाचे आहे. कोणत्याही वयात प्रेमात असणं हे फिलिंगच महत्त्वाचे ठरते. पण सध्या लिव्ह इन रिलेशनशिपचे प्रमाणही वाढले आहे. श्रद्धा – आफताब प्रकरण असो अथवा आता अभिनेत्री फ्लोरा सैनीचा लिव्ह इनमधला अनुभव असो यामुळे लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये मुलींचे शोषण होण्याचे प्रमाण वाढले आहे का असा प्रश्न निर्माण झाला आहे. पण यातून बाहेर पडणं मुलींना सहज शक्य होत नाही. अनेकदा समोरच्या व्यक्तीवर असणारे प्रेम अथवा आपण ज्याच्यावर प्रेम करतोय ती व्यक्ती कधीतरी सुधारेल आणि आपलं नातं सुधारेल या विश्वासावर मुली सहन करत राहतात. तर दुसरी गोष्ट आपल्या कुटुंबाशी केलेली प्रतारणा आणि पुन्हा आपल्याला आपले आई-वडील घरात जागा देतील की नाही या विचारानेही अनेकदा मुली परत जात नाहीत आणि मग त्याचा त्रास होऊन यातून बाहेर पडण्याचा मार्ग कुठेतरी खुंटतो. पण वेळीच अशा नात्यातून बाहेर पडायला हवे. त्रास देणाऱ्यापेक्षा सहन करणारा अधिक चुकीचा ठरतो, म्हणून यातून बाहेर पडण्यासाठी नक्की काय करावे हे महत्त्वाचे आहे.

मनाची करावी तयारी

सर्वात महत्त्वाचं म्हणजे या नात्यातून आपल्याला अत्यंत त्रास होत आहे आणि यातून बाहेर पडायचं आहे यासाठी आपली मानसिक तयारी करणं अत्यंत गरजेचे आहे. आपला, आपल्या प्रेमाचा आदर होत नसेल आणि समोरची व्यक्ती शिवीगाळ करत असेल अथवा मारहाण करत असेल तर वेळीच आपण यातून बाहेर पडण्यासाठी मनाची तयारी करायला घ्यावी. ब्लॅकमेलिंग अथवा इतर गोष्टींची काळजी न करता आपला जीव महत्त्वाचा आहे हे समजून घ्यायला हवे. मानसिक तयारी करून वेळीच बाहेर पडण्यासाठी तयार व्हावे

हेही वाचा :  हे 5 कुकिंग ऑइल्स जाळून टाकतात पोट, मांड्या व कंबरेची चरबी

जवळच्या मित्रमैत्रिणीला घ्या विश्वासात

आपण ज्या व्यक्तीबरोबर राहात आहोत त्याबाबत आपल्या जवळच्या मित्रमैत्रिणीला संपूर्ण माहिती द्यावी. तुम्हाला होत असणारा त्रास बोलून दाखवणे गरजेचे आहे. मित्रमैत्रिणीला विश्वासात घेतल्यामुळे तुम्हाला यातून बाहेर पडण्यासाठी आधारही मिळतो आणि त्यांचा या नात्याच्या बाबतीत नक्की काय दृष्टीकोन आहे हे जाणून घेऊन आपण कुठे चुकतोय हेदेखील कळते. पण कळल्यानंतर वेळेवर बाहेर पडण्यासाठी पाऊल उचलावे आणि ही पावलं उचलण्यासाठी विश्वासात घेतलेल्या मित्रमैत्रिणींची मदतही घेणे सोपे होते.

(वाचा – माझी कहाणी : नात्यात काहीच उरलं नाही पण समाजासाठी मी या माणसासोबत राहते, या नात्यात श्वास कोंडतोय मी काय करू?)

बाहेर पडल्यावर कुठे जायचे पर्याय आधीच शोधावा

शिवीगाळ अथवा मारहाण करत असणारा आपला जोडीदार बाहेर गेल्यानंतर त्या वेळातच त्याला अंदाज येणार नाही अशा पद्धतीने आपण कुठे जायचे हा पर्याय मित्रमैत्रिणींच्या सहाय्याने आधीच शोधून ठेवावा. स्वतःच्या फोनवरून सर्च न करता बाहेर जाऊन सायबरवरून अथवा मैत्रिणींच्या कम्प्युटरवरून सर्च करा. समोरच्या व्यक्तीला कोणताही अंदाज येणार नाही याची संपूर्ण खात्री करूनच पावले सावधानपणे उचलावीत. कारण तुम्ही त्यांना सोडून जाणार आहात हे कळल्यानंतर ते बिथरून टोकाचे पाऊल उचलण्याचीही शक्यता असते. अशा परिस्थितीत जास्तीत जास्त शांत राहून हे काम करावे. तसंच या दृष्टीने निर्णय घेतल्यानंतर पैशाची जमवाजमवदेखील सुरू करावी. तसंच तुमची तुमच्या जोडीदारासह फायनान्शियल गुंतवणूक (RD, Shares, FD) असेल तर त्यातून कसा मार्ग काढायचा याचाही अंदाज तुम्ही फायनान्शियल एक्सपर्टकडून आधीच घेऊन ठेवा. जेणेकरून नंतर त्रास होणार नाही.

हेही वाचा :  Pune Rain News : पुणे शहरात मुसळधार पाऊस, पुढील 5 दिवसांसाठी अलर्ट जारी; 'या' भागांना झोडपलं!

(वाचा – सासू-सुनेची जोडी जिममध्ये करते पॉवरलिफ्टिंग , या गोष्टी करुन तुम्हीही तुमच्या नात्यात आणा गोडवा)

पोलिसात तक्रार करून ठेवा

घर सोडण्यापूर्वी पोलिसांमध्ये सदर व्यक्तीबाबत तक्रार करून ठेवा. यासाठी लागणारे सर्व पुरावे (मेडिकल रिपोर्ट्स, इतर कागदपत्रे) आधीच जमा करा. जोडीदाराला संशय येणार नाही याची काळजी घ्या. पोलीस कोणतीही कार्यवाही करतील त्याआधी घर सोडा. त्यामुळे तुम्हाला याचा अधिक त्रास सहन करावा लागणार नाही. जोडीदार घरात नसतानाच घर सोडा आणि पोलिसात तक्रार करून नव्या पत्त्यावर तुम्ही निघून जा. घर सोडल्यावर त्वरीत जोडीदाराचा नंबर ब्लॉक करा आणि तुम्ही कुठे आहात याचा थांगपत्ता लागणार नाही याची काळजी घ्या.

(वाचा – Anxiety Disorders : नात्यातील नैराश्य घालवण्यासाठी 5-5-5 चा नियम करेल मदत, फक्त हे सोप काम करा)

बाहेर पडण्यासाठी मानसिक तज्ज्ञांची मदत घ्या

या नात्यातून बाहेर शारीरिकरित्या बाहेर पडल्यानंतर मनावर झालेले आघात कमी करण्यासाठी मानसिक तज्ज्ञांची मदत घेणे अत्यंत गरजेचे आहे. यामुळे मनावर खोलवर परिणाम झालेला असतो आणि त्यातून बाहेर पडण्यासाठी आपल्याला मित्रमैत्रिणी, कुटुंब आणि त्याशिवाय तज्ज्ञांचीही गरज भासते. त्यामुळे योग्य सल्ला घेऊन आणि आपल्या आजूबाजूला आपली माणसं आहेत की नाही याचा पूर्ण विचार करून स्वतःहून मानसोपचारतज्ज्ञांकडे जावे.

हेही वाचा :  लग्नाआधी मुलं Google वर नेमकं काय सर्च करतात ?

शारीरिक जखमा बऱ्या होतात पण लिव्ह इन रिलेशिनशिपमध्ये अशा शोषणामुळे मानसिक आघात अधिक होतो. त्यामुळे स्वतःच्या आनंदाला महत्त्व देऊन वेळीच आपण चुकीच्या नात्यात आहोत हे समजून वेगळं होणं उत्तम!

(फोटो क्रेडिट: Pexels)

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

पुरुषांच्या तुलनेत महिला डॉक्टरांनी उपचार केल्यानंतर मृत्यू दरात घट; अभ्यासातून मोठा खुलासा

महिला आजकाल कोणत्याही क्षेत्रात मागे राहिलेल्या नाहीत. मग ते राजकारण असो, खेळ असो किंवा डॉक्टर …

दुसऱ्या टप्प्याचा प्रचार थांबला, राज्यातील 8 मतदारसंघात ‘या’ नेत्यांची प्रतिष्ठा पणाला

Loksabha 2024 : लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात 26 एप्रिलला होणाऱ्या मतदानात आठ मतदारसंघातल्या उमेदवारांचं भवितव्य …