हे वाचा-BBM 4: नेटकऱ्यांना पटला नाही अपूर्वा नेमळेकरचा अॅटिट्यूड, म्हणाले- कोणीतरी हिचा माईक बंद करा
बिग बॉस च्या घरात पुढच्या १०० दिवसांमध्ये काय काय पहायला मिळणार याची झलक पहिल्याच आठवड्यात दिसली. आठवडा संपता संपता बिग बॉसची पहिली चावडी भरली आणि यामध्ये अपूर्वासह प्रसादची महेश मांजरेकर यांनी चांगलीच शाळा घेतली. आता मांजरेकर यांचा मोर्चा वळलाय तो सदस्य निखिल राजेशिर्के याच्याकडे. निखिलवर त्यांनी नुकताच मुर्खपणाचा शिक्का मारलाय.
बिग बॉस मराठी शोमधील १६ स्पर्धकांच्या वागण्याचा समाचार घेण्याची सूत्र महेश मांजरेकर यांच्या हातात आहेत. त्यामुळे आठवडाभर या घरात जे काही सुरू असतं त्यात कोण बरोबर, कोण चूक याचा हिशोब मांडण्याचं काम करण्यासाठी मांजरेकर चावडीवर येतात. आठवडाभरातील स्पर्धकांचा दिनक्रम पाहण्याइतकच रंजक असतो तो या शोमधला हा भाग. त्यामुळे आता पुढच्या टप्प्यात कोणता स्पर्धक सापडणार हे पाहण्याची उत्सुकता चाहत्यांमध्ये असते.
हे वाचा-BBM 4 episode 2 live: धडक-बेधडक टास्कमध्ये उडाला गोंधळ
बिग बॉसने स्पर्धक निखिल राजेशिर्के याच्यावर एक जबाबदारी सोपवली होती. त्याआधी घरातील टीम ए आणि टीम बी यांच्यात डान्सची स्पर्धा झाली तेव्हा त्यामध्ये सरस कोण हे ठरवण्याचं संचालकपद बिग बॉसने निखिल आणि किरण माने यांना दिलं होतं. त्यानंतर सगळ्या स्पर्धकांमध्ये कोण हिरो आहे हे सांगण्याचं कामही निखिलकडे सोपवलं. पण जेव्हा निखिलने सगळयाच स्पर्धकांचे फोटो हिरोच्या कॉलममध्ये लावले तेव्हा मात्र मांजरेकर यांचा पारा चढला. त्यावरूनच निखिलची शाळा घेतली.
मांजरेकर निखिलला म्हणाले, तुला काय सगळेच हिरो वाटतात का. असे सगळेच कसे चांगले असू शकतात. पारदर्शकपणे परीक्षण करण्याची ही पध्दत नाही. तू म्हणजे मूर्खपणाचा कळस आहेस. आता यावर निखिलचा चेहरा पाहण्यासारखा झाला होता. बिग बॉसच्या चावडीवर निखिल आणि मांजरेकर यांच्यातील हा खेळ आजच्या रविवारच्या भागात दिसणार आहे.
Source link
MajhiNews Marathi News, Latest Marathi News, Marathi News Paper, Maharashtra Breaking News | मराठी ताज्या बातम्या