केके यांच्या निधनाने चाहत्यांपासून अगदी बॉलिवूडमधील प्रत्येक कलाकाराला मोठा धक्का बसला आहे. एका गायकाने लाइव्ह परफॉर्म करताना मृत्यूला कवटाळणं ही बाब अतिशय धक्कादायक आहे. केके यांनी लाइव्ह परफॉर्म करताना मृत्यूच्या काही वेळा पूर्वी ‘हम रहे या ना रहें कल, कल याद आएंगे ये पल…’ हे गाणं गायलं होतं. यानंतर असं काही होईल याचा कुणी विचारही केला नव्हता. हृदयविकाराचा झटका येण्यामागे काय कारण असू शकतात याबाबत झेन रुग्णालयातील हृदयरोग तज्ञ सल्लागार डॉ. नारायण गडकर यांनी माहिती दिली. (फोटो सौजन्य – ANI, KK Live Now इंस्टाग्राम)
नेमकं कॉन्सर्टमध्ये काय घडलं?
केके यांनी कोलकाताच्या विवेकानंद कॉलेजमध्ये जवळपास दोन तास परफॉर्म केलं. या कार्यक्रमादरम्यान केके यांना प्रचंड घाम येत होता. लाइव्ह परफॉर्मन्स दरम्यान असं होऊ शकतं. मात्र कार्यक्रमानंतर केके यांना अस्वस्थ वाटू लागलं. त्यांना तात्काळ हॉटेलमध्ये नेलं.
कार्यक्रमानंतर केके हॉटेलमध्ये पोहोचले तेव्हा त्यांची तब्बेत बिघडली. त्यांना उल्टी झाल्यामुळे ते बेशुद्ध झाले. त्यांनतर त्यांना लगेच मेडिकल रिसर्च इंस्टीट्यूट नेण्यात आलं. तेथे त्यांना मृत घोषित करण्यात आलं.
(वाचा – World No Tobacco Day : ‘या’ 4 जीवघेण्या आजारांचे मुळ आहे तंबाखू, दुस-या नंबरच्या आजाराने मरतात रोज लाखो लोक..!))
केके यांचा हा परफॉर्मन्स ठरला अखेरचा
हृदयविकाराच्या झटक्यामागे ही असू शकतात कारण?
तुलनेने तरुण आणि तंदुरुस्त असलेल्यांनाही हृदयविकाराचा झटका येऊ शकतो. तणाव, धूम्रपान, खराब पोषण, लठ्ठपणा, उच्च रक्तदाब, कौटुंबिक इतिहास, शारीरिक निष्क्रियता, अपुरी झोप, उच्च कोलेस्ट्रॉल किंवा मधुमेह यासारख्या काही कारणांमुळे हृदयविकाराचा धोका असतो.
वयाच्या ३० व्या वर्षांपासून प्रत्येकाने डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार नियमित हृदय तपासणीसाठी जाणे ही काळाची गरज आहे. तसेच, संतुलित आहार घेण्याचा प्रयत्न करा, तणावमुक्त राहा, दररोज व्यायाम करा आणि इष्टतम वजन राखा, अशी माहिती झेन रुग्णालयातील हृदयरोग तज्ञ सल्लागार डॉ. नारायण गडकर यांनी दिली.
(वाचा – world tobacco day 2022 : धुम्रपानाच्या सवयीमुळे आरोग्यावर होतात ‘हे’ ५ गंभीर परिणाम,वेळीच सावध व्हा !)
केके यांचा शेवटचा परफॉर्मन्स
हृदयविकाराची काय कारण असू शकतात
हृदयविकाराचा झटका काही मिनिटांत तुमचा जीव घेऊ शकतो, म्हणून ही स्थिती कशामुळे उद्भवते आणि येऊ घातलेला हृदयविकाराचा झटका कसा शोधू शकतो हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे. हृदयविकाराचा झटका ही एक गंभीर आरोग्य स्थिती आहे. जी हृदयाला रक्त आणि ऑक्सिजन पाठवणारी धमनी अवरोधित केल्यावर उद्भवते.
याची अनेक कारणे असू शकतात, त्यापैकी काही अशी आहेत – हृदयाच्या धमन्यांमध्ये प्लेक्स तयार होणे, कोलेस्टेरॉल जमा होणे आणि फॅटी पेशी. तर, जेव्हा प्लेक फुटतो तेव्हा रक्ताच्या गुठळ्या तयार होतात. रक्ताच्या या गुठळ्यामुळे रक्तवाहिन्या ब्लॉक होतात आणि हृदयविकाराचा झटका येऊ शकतो.
(वाचा – Face weight loss : संपूर्ण चेह-यावरची चरबी मेणासारखी वितळेल, बसल्या बसल्या करा ‘या’ 5 साध्यासोप्या फेस एक्सरसाइज..!))
हार्ट अटॅकची लक्षणे
हृदयविकाराचा झटका याला मायोकार्डियल इन्फेक्शन देखील म्हणतात. जेव्हा हृदयाच्या स्नायूच्या भागाला पुरेसे रक्त मिळत नाही. हृदयविकाराच्या काही चेतावणी लक्षणे आहेत ती पाहूया.
- छातीत दुखणे किंवा अस्वस्थता.
- अशक्त, हलके डोके आणि बेहोश वाटणे.
- जबडा, मान किंवा पाठीत वेदना किंवा अस्वस्थता.
- श्वास घेण्यात अडचण.
- दोन्ही हात आणि खांद्यावर अस्वस्थता.
(वाचा – तुम्हालाही फ्रोजन शोल्डरचा त्रास आहे का ?, मग हे व्यायामाचे प्रकार देतील आराम))
Source link
MajhiNews Marathi News, Latest Marathi News, Marathi News Paper, Maharashtra Breaking News | मराठी ताज्या बातम्या