विघ्नेशनं त्याचे आणि नयनताराचे बाळांसोबतचे अनेक फोटो शेअर करत पालक झाल्याचा आनंद व्यक्त केलाय. विघ्नेशनं हे फोटो शेअर केल्यानंतर दोघांवर शुभेच्छांचा वर्षाव केला जातोय. सरोगसीद्वारे नयनतारा आणि विघ्नेश यांनी त्यांच्या बाळांना जन्म दिला आहे.
लग्नानंतर घेतला ब्रेक
नयनतारा आणि विग्नेश यांची खूप वर्षापासूनची मैत्री होती, त्यातूनच त्याचं प्रेम जुळलं. बरीच वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर या दोघांनी लग्नाचा निर्णय घेतला. ९ जून रोजी पारंपरिक पद्धतीनं दोघांचं लग्नं झालं. लग्नाचे फोटो आणि व्हिडिओ प्रचंड शेअर झाले. त्यानंतर ही जोडी तिरूपती बालाजीच्या दर्शनालाही जाऊन आली. आता त्यांच्या हनिमून डेस्टिनेशनची चर्चा सोशल मीडियावर रंगली असतानाच यापुढे मी एक गोष्ट करणार नाही असं म्हणत नयनतारानं तिचा निर्णय जाहीर केला आणि चाहत्यांच्या मनात हजार प्रश्न उभे राहिले होते.
लग्नानंतर नयनतारानं कामातून ब्रेक घेतल्याचं म्हटलं जात होतं. त्याचं कारण आता समोर आलं आहे. एका मुलाखतीत नयनतारानं तिचा निर्णय सांगितला. ती म्हणाली की, गेली अनेक वर्षे जरी आम्ही रिलेशनशीपमध्ये असलो तरी कामात व्यग्र होतो. पण आम्हा दोघांना एकमेकांसाठी वेळ काढायचा आहे. त्यासाठी पुढचे काही दिवस मी नवा सिनेमा स्वीकारणार नाही. विग्नेशनंही त्याच्या कामातून ब्रेक घेतला आहे. तर दुसरा मोठा निर्णय म्हणजे यापुढं नयनतारा तिच्या कोणत्याही सिनेमात नायकासोबत रोमँटिक सीन देणार नाही. किसिंग सीन आणि इंटिमेट सीनला नयनताराने फुली मारली आहे. विग्नेशची बायको या नात्यानं मी असे सीन करणार नसल्याचं तिनं सांगितलं होतं.
Source link
MajhiNews Marathi News, Latest Marathi News, Marathi News Paper, Maharashtra Breaking News | मराठी ताज्या बातम्या