Bhagyashree Rasal | महाराष्ट्र टाइम्स.कॉम | Updated: Oct 9, 2022, 10:47 PM
Bhagyashree Mote Engagement photos: मराठी सिनेसृष्टीतील अभिनेत्री भाग्यश्री मोटे सोशल मीडियावर बरीच अॅक्टिव्ह असते. सोशल मीडियाच्या माध्यमातून ती स्वतःचे फोटो आपल्या फॅन्ससह शेअर करत असते.
भाग्यश्री मोटे सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असते. तिचे हॉट फोटो नेहमीच व्हायरल होताना दिसतात. बोल्ड आणि हॉट फोटोंमुळं तिला अनेकदा ट्रोल केलं जातं. पण ती याकडं दुर्लक्ष करते.
भाग्यश्रीच्या खासगी आयुष्याची अनेकदा चर्चा झाली. पण तिनं तिच्या खासगी आयुष्याबद्दल कधीच काही लपवलं नाही. काही महिन्यांपू्र्वी तिनं तिचं रिलेशनशीप स्टेटसही शेअर केलं होतं. हृतिक रोशनचा मेकअप आर्टिस्ट विजय पलांडे विजय पलांडेसोबत ती रिलेशनशीपमध्ये होती. आता दोघांचा साखरपुडा पार पडलाय. तिच्या चाहत्यांसाठी हे मोठंच सरप्राइझ आहे.
कोण आहे भाग्यश्री मोटे?
भाग्यश्री देवश्री गणेश मालिकेत काम करत होती. त्यात तिनं देवी पार्वतीचा भूमिका साकारली होती. तिच्याबरोबर पंकज विष्णूही होता. तिनं मराठी सिनेमांतही काम केलंय. २०११ मध्ये शोधू कुठे या मराठी सिनेमातून तिनं सिनेसृष्टीत पदार्पण केलं. भाग्यश्रीनं तेलगू सिनेमातही भूमिका केली आहे.
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
Source link
MajhiNews Marathi News, Latest Marathi News, Marathi News Paper, Maharashtra Breaking News | मराठी ताज्या बातम्या