कलर्सच्या अधिकृत इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. यामध्ये पहायला मिळतंय की महेश सरांनी स्पर्धकांना कोण हिरो आणि कोण झिरो असल्याचं सांगायला सांगितलं होतं. मात्र या टास्कमध्ये निखिल राजेशिर्केनं घरातील सगळ्याच स्पर्धकांना हिरो असल्याचं म्हटलं. यावरुन महेश सर चिडले आणि त्यांनी निखिलला सुनावलं.
महेश मांजरेकरांनी निखिलला म्हटलं, तुला यातील सगळेच स्पर्धक कसे हिरो वाटू शकतात. हे मुर्खपणाचं लक्षण आहे. सगळेच चांगले असतील तर चांगल्या शब्दाला अर्थ राहत नाही. त्यामुळे यावरुन घरात अजून काय राडे होणार, या टास्कचा घरातील स्पर्धकांवर काय परिणाम होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
दरम्यान, पहिल्या चावडीत स्पर्धकांचे घरे चेहरे समोर येणार. आठवडाभर झालेल्या, केलेल्या गोष्टीविषयी महेश मांजरेकर स्पर्धकांची शाळा घेणार आहे. त्यामुळे मांजरेकरांची चावडी पहायला सगळेच नेहमीच उत्सुक असतात. मात्र स्पर्धकांच्या मनात भीती असते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Source link
MajhiNews Marathi News, Latest Marathi News, Marathi News Paper, Maharashtra Breaking News | मराठी ताज्या बातम्या