बाळासाहेबांचे शिवसैनिक ते उद्धव ठाकरेंचे विरोधक; रामदास कदम कितवी शिकले? ऐकून तुम्हालाही वाटेल आश्चर्य

Ramdas kadam Education Details: माजी पर्यावरण मंत्री आणि शिंदे गटाचे नेते रामदास कदम हे सध्या आपल्या भाषणामुळे चर्चेत आहेत. शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांच्या शिवसंवाद यात्रेनंतर रामदास कदम यांनी सभेत सर्वांचे लक्ष वेधले. त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंसह आदित्य ठाकरे आणि शिवसेनेतील इतर नेत्यांवर टीकास्त्र सोडले. यावेळी रामदास कदमांनी शिवसेना नेते भास्कर जाधव यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडले. दरम्यान रामदास कदम यांच्या शिक्षणाविषयी जाणून घेऊया

रामदास कदम यांनी निवडणूक आयोगाला दिलेल्या माहितीनुसार त्यांचे शिक्षण दहावीपर्यंत झाले आहे. मुंबई बोर्डाअंतर्गत १९७१ मध्ये त्यांनी दहावी पूर्ण केली. मायनेता वेबसाइटवरील माहितीनुसार रामदास कदम यांचे शालेय शिक्षण यशवंतराव चव्हाण हायस्कूलमधून पूर्ण झाले आहे. शिक्षण कमी असले तरीही शिवसेनेचे कांदिवलीतील गटप्रमुख, उपशाखाप्रमुख, शाखाप्रमुख आणि खेडचे आमदार ते राज्याचे पर्यावरणमंत्री पद अशी त्यांची राजकीय कारकिर्द उंचावत गेली.
आपल्या रोखठोक वक्तृत्वाने त्यांनी शिवसेनेच्या अनेक सभा गाजविल्या आहेत.

आर्थिक परिस्थितीमुळे अर्धवट सोडले होते कॉलेज, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे शिक्षण किती? जाणून घ्या
Chandrakant Patil Education: उच्च आणि तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकात पाटील यांचे शिक्षण किती? जाणून घ्या
पर्यावरण मंत्री असताना रामदास कदम यांनी प्लास्टिक बंदीचा महत्वाचा निर्णय घेतला होता. ज्याचे राज्यभरातून कौतुक झाले. कोकणातील शिवसेनेची धडाडती तोफ अशी रामदास कदम यांची ओळख आहे. दरम्यान ते सध्या शिंदे गटात असून आदित्य ठाकरे, अनिल परब, भास्कर जाधव यांच्यावरील टिकेमुळे ते सध्या चर्चेत आहेत.

रामदास कदम हे रत्नागिरीमधील खेड मतदारसंघातून निवडून आले आहेत. रामदास कदम हे १९९० साली खेड मतदारसंघात पहिल्यांदा विजयी झाले. त्यानंतर १९९५, १९९९ आणि २००४ अशी विधानसभा निवडणुकीत त्यांनी विजयाची हॅट्रीक केली. रामदास कदम यांना १९९५ साली साली शिवसेना-भाजप युती सरकारमध्ये अन्न आणि नागरी पुरवठा मंत्रीपद मिळाले होते.

२०१९ सालची दापोली विधानसभा निवडणुक रामदास कदम यांचे पुत्र योगेश कदम यांनी लढविली. राष्ट्रवादीच्या संजय कदम यांचा पराभव करुन ते आमदार झाले.

Ajit Pawar Education: भल्याभल्या राजकारण्यांची ‘शाळा’ घेणारे अजित पवार कितवी शिकले माहितेय का?

Source link

About Admin

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.
@majhinews1

Check Also

Teachers Salary: पालिका शिक्षकांसाठी आनंदाची बातमी, वेतनकोंडीतून होणार सुटका

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोडविभागातील महापालिका शिक्षक आणि महापालिका, नगर परिषद, नगरपालिका शाळांतील सेवानिवृत्त शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी …

दप्तराचे ओझे विद्यार्थ्यांच्या वजनापेक्षा अधिक, शाळेने आणली टर्म बुक संकल्पना

म. टा. वृत्तसेवा, कल्याणविद्यार्थ्यांचे दप्तराचे ओझे त्यांच्या वजनापेक्षा अधिक वाढले असून हे ओझे कमी करण्याची …