अगदी असंच काहीस बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन हिने केलं आहे. करोडो लोकांच्या हृदयाचा ठोका चुकवणारी अभिनेत्री मोठ्या स्क्रीनपासून खूप काही लांब राहिली. कारण ऐश्वर्याने आपली पहिली प्राथमिकता ही आराध्या असल्याचं सांगितलं. ऐश्वर्या असं करताना पालकांना आपण जगातील बेस्ट आई कशी होऊ शकते? याच्या टिप्स देखील दिल्या. (फोटो सौजन्य – टाइम्स ऑफ इंडिया)
आराध्याला देते मोकळा वेळ
ऐश्वर्या राय बच्चनला एका मुलाखतीत विचारण्यात आले होते की, एक आई म्हणून तिला तिची मुलगी आराध्याला कोणते आयुष्य द्यायचे आहे? तर इथे ऐश्वर्याने स्पष्टपणे सांगितले होते की, ती आपल्या मुलीला कधीही हुकूम देत नाही किंवा सल्ला देत नाही. तिला फक्त आपल्या मुलीला आनंदी बघायचे आहे. तसेच ऐश्वर्या आराध्याला कोणताही सल्ला देत नाही. तिच्या जीवनाचे निर्णय ती स्वतः घेऊ शकते. मात्र या सगळ्यापेक्षा ऐश्वर्याला आराध्या ही निरोगी आणि आनंदी हवी आहे.
ऐश्वर्या आराध्याला देते ही खास गोष्ट
ऐश्वर्या राय कायमच आराध्याला क्वालिटी टाईम देते. आपल्या बालपणातील अनेक गोष्टींशी ऐश्वर्या आराध्याला जोडते. तसेच आध्यात्मिक गोष्टींमध्ये देखील आराध्याला सहभागी करून घेते. ज्यामुळे आराध्याला या सगळ्याची गोडी लागेल. त्यामुळे ऐश्वर्या आणि आराध्याचं नातं तर फुलत आहे. सोबतच आराध्या कुटुंबासोबत वेळ घालवते.
अभिषेकपेक्षाही आराध्याची काळजी अधिक
ऐश्वर्या राय बच्चनचा नवरा म्हणजेच अभिनेता अभिषेक बच्चनने देखील मान्य केलं आहे की, ऐश्वर्या खूप चांगली आई आहे. ऐश्वर्या आराध्याची खूप चांगली घेते, त्यामुळे मी घराबाहेर जाऊ शकतो, असं देखील अभिषेकला वाटतं. ऐश्वर्यासाठी आराध्या पहिली प्राथमिकता असल्याचा अभिषेकला देखील आनंद आहे.
ऐश्वर्याला व्हायचंय जगातील बेस्ट आई
ऐश्वर्या राय बच्चन म्हणाली, “मी आराध्यावर राज्य करण्यासाठी किंवा तिचं आयुष्य ठरवण्यासाठी नाही. मला तिच्या आईसोबतच तिची बेस्ट फ्रेंड देखील व्हायचंय. मला फक्त तिला आनंदी बघायचे आहे, तिला एक सुरक्षित व्यक्ती बनताना पाहायचे आहे. अशी व्यक्ती जी स्वतःमध्ये आनंद शोधते. तुम्ही कायम तुमच्या मुलामध्ये देवाचं रुप पाहता. हे क्षण जपून ठेवायला हवेत.
आराध्यासाठी करते ही खास गोष्ट
मुलांसाठी त्यांची शाळा हेच विश्व असतं. अशावेळी जर तुमची आई तुम्हाला रोज शाळेत सोडायला आणि आणायला आली तर त्याचा आनंद वेगळाच असतो. असंच काहीसं ऐश्वर्या आराध्यासाठी न चुकता करते. ती स्वतः तिला शाळेत सोडायला आणि आणायला जाते. आराध्याला ऐश्वर्या स्वतःचा खूप वेळ देते. जो वेळ देणे मुलांना अपेक्षित असतं.
Source link
MajhiNews Marathi News, Latest Marathi News, Marathi News Paper, Maharashtra Breaking News | मराठी ताज्या बातम्या