अंकिता लोखंडेचा Video पाहून भडकले नेटकरी, म्हणाले- ‘निदान देवाचा तरी आदर कर…’

मुंबई: ‘पवित्र रिश्ता’ कार्यक्रमामुळे अभिनेत्री अंकिता लोखंडे (Ankita Lokhande) घराघरात पोहोचली आहे. त्यानंतर ओटीटी प्लॅटफॉम्स, डान्स शो, चित्रपट या माध्यमातून ती प्रेक्षकांच्या भेटीला येत राहिली. याशिवाय अंकिता सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांशी संपर्कात असते. त्यांच्याशी संवाद साधत असते. इतकंच नाही तर तिच्या आयुष्यातील प्रत्येक गोष्ट ती सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रेक्षकांबरोबर शेअर करत असते. आता देखील अंकितानं तिचा आणि विकी जैन याचा पूजाअर्चा करतानाचा व्हिडिओ तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.परंतु हा व्हिडिओ शेअर केल्यानंतर अनेक नेटकऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत तिला ट्रोल केलं आहे.

हे वाचा-ब्रह्मास्त्र पाहताना तुमच्याही नजरेतून सुटली असेल ही गोष्ट, दीपिका आहे रणबीरची आई?

काय आहे व्हिडिओमध्ये

अंकितानं जो व्हिडिओ शेअर केला आहे, त्यात ती आणि विकी जैन परंपरेनुसार पूजापाठ करताना दिसत आहेत. अंकिता लाल रंगाची पारंपरिक साडी नेसली आहे तर विकी जैन यानंही धोतर आणि उपरणं असा पारंपारिक पोशाख केला आहे. पूजा करताना अंकिता टिचक्या वाजवत नृत्य करताना दिसत आहे, तर कधी कॅमेऱ्याकडे बघत पोझ देताना दिसत आहे. अनेकांना पूजापाठ करताना अंकितानं हे असं काही करणं अनेकांना आवडलं नाही.

हे वाचा-आलिया-रणबीरच्या ‘ब्रह्मास्त्र’ला प्रेक्षकांची पसंती! पहिल्याच दिवशी कमावले इतके कोटी

अंकितानं शेअर केलेल्या या व्हिडिओवर अनेकांनी कमेंट करत त्यांची नाराजी व्यक्त केली आहे. एका युजरनं लिहिलं की, ‘पूजा करतानाही तू डान्स करते आहेस?’ तर अन्य एकानं लिहिलं की, ‘ किमान देवाचा तरी आदर करं, तिथंही तुझी एक एक नाटकं सुरू आहेत.’ आणखी एका युजरने लिहिलं, ‘सगळं काही रेकॉर्ड करणं गरजेचं आहे का?’ तर आणखी एकानं लिहिलं आहे की, ‘पूजा पाठ करतानाही ही अभिनय करते आहे…’

अंकिताचा हा अंदाज ज्यांना आवडला नाही, त्यांनी नाराजी व्यक्त करत तिच्यावर टीका केली आहे. तर ज्यांना अंकिताचा हा व्हिडिओ आवडला आहे, त्यांनी तिचं कौतुक केलं आहे.अनेकांना अंकिता आणि विकीचा हा सोज्वळ, धार्मिक अंदाज आवडला आहे. हा व्हिडिओ शेअर करताना अंकितानं लिहिलं आहे की, ‘देवा आशीर्वाद द्या.’

Source link

About Admin

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.
@majhinews1

Check Also

टास्क, राडा अन् भांडणांची तारीख ठरली! वाचा कधीपासून सुरू होतंय बिग बॉस मराठी ४

मुंबई: बिग बॉस मराठीच्या चाहत्यांची प्रतीक्षा अखेर संपली आहे. बिग बॉस मराठीच्या चौथ्या सीझनची तारीख …

अखेर प्रतिक्षा संपली! या तारखेला सुरु होणार Bigg Boss Marathi चा चौथा सीझन

मुंबई, 10 सप्टेंबर: लोकप्रिय आणि तितकाच विवादित शो म्हणजे ‘बिग बॉस’. या शोची लोक आतुरतेनं वाट पाहत …