प्रेगन्सीच्या पहिल्या महिन्यापासूनच आलिया कामात व्यग्र आहे. हॉलिवूडपटाचं शूट सुरू असतानाच आलियाने गोड बातमी दिली. त्यानंतर डार्लिंग सिनेमाचं प्रमोशन, ब्रह्मास्त्र सिनेमाचं प्रमोशन यासाठी आलिया सतत दौऱ्यावरच आहे. प्रेग्नन्सीचा आनंद आणि कामाचा उरक यामुळे आलियाचं कौतुकही होतंय. सध्या कपूर आणि भट्ट कुटुंब आलियाच्या डोहाळेजेवणाच्या सोहळ्याची तयारी करत आहेत.
हे वाचा-प्रिया बारावीत असताना पडलेली उमेशच्या प्रेमात; लव्ह स्टोरीमध्ये ९ आणि १८ तारखा खास
गरोदरपणातील डोहाळे हा खूप लाड पुरवून घेण्याचा अनुभव असतो. सध्या आलियाही तिचे डोहाळे पुरवून घेत आहे. आलियाला काय खावंसं वाटत असेल याची उत्सुकता तिच्या चाहत्यांना वाटत नसती तरच नवल. आता आलियानेच तिला कोणता पदार्थ खावासा वाटतोय हे सांगितलं आहे. बरं इतकं करून ती शांत बसलेली नाही, तर तिच्या आवडीचा पदार्थ मुंबईत सगळ्यात जास्त चांगला कुठे मिळतो यासाठी तिने इन्स्टास्टोरी शेअर करत चाहत्यांची मदत घेतली आहे. होय, आलियाला पिझ्झा खाण्याची खूप इच्छा झाली आहे. मुळातच आलिया पिझ्झा लव्हर आहे, त्यात सातव्या महिन्यात तिला पिझ्झ्याचे डोहाळे लागले आहेत. आलियाची ही स्टोरीपोस्ट सध्या चांगलीच व्हायरल होत आहे.
हे वाचा-सुपरस्टारवर क्रश, दिग्दर्शकासोबत अफेअर ते जावेद यांच्याशी लग्न! शबाना यांची रंजक लव्ह लाइफ
आलिया आणि रणबीर यांचा ब्रह्मास्त्र सिनेमा तुफान हिट होतोय. प्रमोशन आणि स्क्रिनिंग भेटी दौरे करून सध्या आलिया मुंबईत आली आहे. आता कुठे तिला जरा निवांत वेळ मिळाला आहे. त्यात लवकरच तिचं डोहाळेजेवण होणार आहे. पण सातव्या महिन्यातील डोहाळे म्हणजे काही विचारू नका. आलिया भट्टला कधी एकदा पिझ्झा खाऊ असं झाल्यानेच तिने ही पोस्ट शेअर केली. तिच्या या पोस्टवर मुंबईतील बेस्ट पिझ्झा शॉपची नावं कमेंट म्हणून आली. आलियाला लागलेले पिझ्झा खाण्याचे डोहाळे हा विषय सध्या तरी सोशलमीडियावरील चवीचा विषय बनला आहे.
Source link
MajhiNews Marathi News, Latest Marathi News, Marathi News Paper, Maharashtra Breaking News | मराठी ताज्या बातम्या