हे वाचा-प्रसिद्ध अभिनेत्याला पितृशोक, वयाच्या ९२ व्या वर्षी फिल्ममेकरने घेतला अखेरचा श्वास
अलीच्या मुलांची केली जायची मस्करी
या कार्यक्रमात अली असगरचा आणि त्याच्या मुलाचा, मुलीचा व्हिडिओ दाखवण्यात आला. या व्हिडिओमध्ये अलीची मुलगी सांगताना दिसत आहे की, तिचे वडील विनोदी अभिनेते असल्यानं शाळेत तिला चिडवले जाते. अलीच्या ‘दादी’, ‘बसंती’ या द कपिल शर्मा शोमधील भूमिका विशेष लोकप्रिय झाल्या आहेत. त्यावरुनच त्यांना शाळेत चिडवले जायचे. अलीची मुलगी पुढे सांगते की खरं तर तिला चिडवणाऱ्या लोकांना हे माहिती नाही की ते स्वतःचीच टिंगल करत आहेत. कारण तिचे वडील दुसऱ्यांच्या चेहऱ्यावर हसू आणण्याचे काम करत आहेत, हे सर्वांनाच जमत नाही. आपल्या लेकीचं हे बोलणं ऐकून अली असगर रडू लागतो.
१९८७ पासून टीव्हीवर करतोय काम
यानंतर कार्यक्रमाची परीक्षक माधुरी दीक्षित देखील अलीचं कौतुक करताना दिसत आहे. अली हा १९८७ पासून एक दोन तीन चार या मालिकेतून अभिनयाच्या क्षेत्रात पदार्पण केलं. त्यानंतर त्यानं इतिहास, कहानी घर घर की, कुटुंब, कॉमेडी सर्कस, एफआयआर, जिनी और जुजू, कानपूर वाले खुराना और अकबर का बल बीरबल यांसारख्या लोकप्रिय टीव्ही मालिकांमध्ये काम त्यानं काम केलं आहे.
हे वाचा-प्रिया-उमेशचा रोमँटिक किस; एकेकाळी बोल्ड सीन करतानाही गोंधळलेली अभिनेत्री
सिनेमातही केलंय काम
अली असगरनं सिनेमातही काम केलं आहे. त्यानं बॉलिवूडमध्ये १९९१ शिकारी सिनेमातून पदार्पण केलं. त्यानंतर त्यानं जान तेरे नाम, चमत्कार, खलनायक,जोरू का गुलाम, जोश, हम किसी से कम नहीं, ऐतबार शादी नंबर १, पार्टनर, संडे, जुडवा २,पागलपंती, अमावस यांसारख्या सिनेमात काम केलं. तो लवकरच कपिल शर्मा कार्यक्रमात अली असगर परतेल अशी त्याच्या चाहत्यांना अपेक्षा आहे.
Source link
MajhiNews Marathi News, Latest Marathi News, Marathi News Paper, Maharashtra Breaking News | मराठी ताज्या बातम्या