उर्मिला मातोंडकरचं ८ वर्षांनी मराठी सिनेमात कमबॅक,श्रेयस तळपदेबरोबर रंगणार जुगलबंदी!
एका मुलाखतीदरम्यान अली असगरला विचारण्यात आले की, तो कपिल शर्मा शोमध्ये दिसणार का? यावर अली म्हणाला, ‘मी प्रामाणिकपणे सांगेन की पुढे काय होईल हे आम्हाला माहीत नाही. त्यामुळे अंदाज बांधता येत नाहीत. हे सर्व परिस्थितीवर अवलंबून असते.’ शोमधून बाहेर पडल्यावर अली म्हणाला, ‘दुर्दैवाने काय झाले की शो सोडल्यानंतर मी कपिलशी बोललो नाही आणि आमची भेटही झाली नाही. आम्ही एकमेकांच्या संपर्कात नाही.’
शो सोडण्यामागचं कारण विचारले असता अली म्हणाला, ‘शोमधील माझ्या पात्रात काही त्रुटी होत्या. त्याशिवाय, दुसरं काही नाही. मी ते का करत नाही आणि करणार नाही याचं फार मोठं कारण नाही. ज्या दिवशी मला काहीतरी चांगलं येईल, आम्ही पुन्हा एकत्र काम करू. आता हे सारंकाही वेळच सांगेल.’
एक क्षणही न दवडता मी आजोबांना घरी येण्याची विनंती केली अन्
अली असगर सध्या ‘झलक दिखला जा १०’ मध्ये दिसत आहे. हा शो अनेक वर्षांनी छोट्या पडद्यावर परतला असून अलीने यात स्पर्धक म्हणून भाग घेतला आहे. शोच्या पहिल्याच दिवशी तो स्टेजवर ‘दादी’च्याच गेटअपमध्ये आला. अली त्याच्या विनोदामुळे चर्चेत असतो आणि शोमध्येही खूप धमाल मस्ती करत असतो.
Source link
MajhiNews Marathi News, Latest Marathi News, Marathi News Paper, Maharashtra Breaking News | मराठी ताज्या बातम्या