Adani Wilmar Share Listing: अदानी विल्मर शेअर मार्केटमध्ये झाली लिस्ट; कंपनीच्या शेअर्समध्ये झपाट्याने वाढ

देशातील सर्वात मोठ्या एफएमजीसी कंपन्यांपैकी एक, अदानी विल्मरचा आयपीओ २७ ते ३१ जानेवारी दरम्यान आला होता. त्याला १७.३७ पट अधिक बोली लागल्या.

Adani Wilmar Share Listing: अडाणी ग्रुपची एफएमजीसी (फास्ट-मूव्हिंग कन्झ्युमर गुड्स) कंपनी अदानी विल्मर आज, मंगळवारी शेअर मार्केटमध्ये लिस्ट झाली. एनएसईमध्ये या कंपनीचा आयपीओ आपल्या जारी केलेल्या किमतीच्या १२ रुपये वर लिस्ट झाला आहे. देशातील सर्वात मोठ्या एफएमजीसी कंपन्यांपैकी एक, अदानी विल्मरचा आयपीओ २७ ते ३१ जानेवारी दरम्यान आला होता. त्याला १७.३७ पट अधिक बोली लागल्या.

आयपीओला सर्व प्रकारच्या गुंतवणूकदारांकडून चांगल्या प्रतिक्रिया मिळाल्या. तथापि, त्याचवेळी बाजारातील अस्थिरतेमुळे यावर थोडाफार परिणाम झाला. आयपीओसाठी सर्वाधिक बोली गैर-संस्थात्मक गुंतवणूकदार (NII) श्रेणीतून आली, ज्यांनी त्यांच्या वाटप केलेल्या कोट्यापेक्षा ५६.३० पट अधिक बोली लावली. दुसऱ्या क्रमांकावर शेअरहोल्डर कोटा होता, ज्याला ३३.३३ पट अधिक सबस्क्रिप्शन मिळाले.

करोना काळात अथक मेहनत करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी ‘या’ कंपनीची खास भेट; केली मोठी घोषणा

लिस्टिंगनंतर अदानी विल्मरच्या शेअर्समध्ये वाढ होताना दिसत आहे. लिस्टिंगच्या अर्ध्या तासानंतर, शेअर्स २० रुपयांनी वाढताना दिसले. हा स्टॉक रु.२५० च्या आसपास ट्रेड करत आहे. कंपनी आयपीओकडून प्राप्त झालेल्या रकमेपैकी १,९०० कोटी रुपये भांडवली खर्चासाठी वापरण्यात येणार आहेत. तर, कंपनीवरील कर्ज कमी करण्यासाठी सुमारे १,०५८.९ कोटी रुपये वापरले जातील आणि उर्वरित ४५० कोटी रुपये धोरणात्मक अधिग्रहण आणि इतर गुंतवणूक संधींवर खर्च केले जातील.

हेही वाचा :  सहकारी बँकिंगचे भिजत घोंगडे

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.



Source link

About Admin

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

“मराठी कलाकार स्वत: सेटवर हिंदीत बोलतात”, अजय-अतुलच्या जोडीतील अतुलने केली तक्रार

मराठी राजभाषा दिनाच्या निमित्तानं दिलेल्या मुलाखतती अतुलने ही तक्रार केली आहे. दिग्दर्शक नागराज मंजुळे आणि …

Russia – Ukraine War : ठाणे जिल्ह्यातील ३१ विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकले

हे सर्व विद्यार्थी वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी युक्रेनमध्ये गेलेले आहेत. ठाणे जिल्ह्यातील विविध शहरांमधील ३१ विद्यार्थी …