पुरुषांनो, ‘या’ 1 हार्मोनच्या कमतरतेमुळे लठ्ठपणा, संभोगातील नावड, बाबा न बनणं, वेळेआधी म्हातारपण या समस्यांना पडाल बळी, झोपण्याआधी खा हे 7 पदार्थ!

टेस्टोस्टेरॉन (Testosterone) हा एक पुरुषांमधील सेक्स हार्मोन आहे. हा हार्मोन प्रजनन क्षमता (Fertility), लैंगिक कार्य (Sexual function), हाडांचे आरोग्य आणि स्नायूंसाठी मोठी भूमिका बजावतात. असे मानले जाते की वयाबरोबर टेस्टोस्टेरॉनची पातळी कमी होते. काही आजार, अनहेल्दी जीवनशैली आणि अनहेल्दी आहार यांमुळेही ते कमी होऊ शकते. साहजिकच, टेस्टोस्टेरॉन हार्मोनच्या कमतरतेमुळे पुरुषांमधील लैंगिक आवड कमी होऊ शकते, प्रजनन क्षमतेवर परिणाम होऊ शकतो, शरीरातील चरबी वाढू शकते, झोपेचे विकार होऊ शकतात आणि पुरुषाला अकाली वृद्धत्व अशी चिन्हे दिसू शकतात. काही वैद्यकीय उपचारांमुळे टेस्टोस्टेरॉनची पातळी वाढू शकते पण ते निरोगी आहार आणि जीवनशैलीद्वारे देखील वाढवता येतात. आम्ही तुम्हाला अशाच काही गोष्टींबद्दल सांगणार आहोत, ज्यांच्या नियमित सेवनाने तुम्ही टेस्टोस्टेरॉनची पातळी अगदी सहज वाढवू शकता. मुख्य म्हणजे अनेक रिसर्च देखील या गोष्टीस सपोर्ट करतात. (फोटो साभार: TOI)

आले

आले टेस्टोस्टेरॉनची पातळी वाढवण्यास आणि पुरुषांची प्रजनन क्षमता सुधारण्यास मदत करू शकते. आल्याचा वापर शतकानुशतके औषधे बनवण्यासाठी देखील केला जात आहे. एका अभ्यासात असे दिसून आले आहे की आल्याचे मुळ पुरुषांमधील प्रजनन क्षमता सुधारू शकते. 3 महिने आल्याची सप्लिमेंट घेतलेल्यांमध्ये टेस्टोस्टेरॉनची पातळी 17.7 टक्क्यांनी वाढली होती.

(वाचा :- Cancer diet: योग्य पद्धतीने खा ‘हे’ 6 अँटी-कॅन्सर पदार्थ, पहिल्याच स्टेजमध्ये टळेल कॅन्सरसारख्या जीवघेण्या आजाराचा धोका!)

हेही वाचा :  सुपरकारच्या किंमती एवढा रेडा; उदयनराजेंनी केले रेड्यासोबत फोटो सेशन

डाळींब

रात्री झोपण्यापूर्वी एक वाटी डाळिंब खाल्ल्याने फायदा होऊ शकतो. डाळिंब प्रजनन क्षमता आणि लैंगिक कार्य सुधारण्यासाठी ओळखले जाते. त्यातील अँटिऑक्सिडंट गुणधर्म हृदयाला निरोगी ठेवण्यास आणि तणाव कमी करण्यास मदत करतात. 2012 च्या एका अभ्यासाचे परिणाम सिद्ध करतात की डाळिंब पुरुष आणि स्त्रियांमधील टेस्टोस्टेरॉनची पातळी वाढवू शकते.

(वाचा :- Covid19 4th wave : बापरे, रिसर्चमध्ये मोठा खळबळजनक दावा – जूनमध्ये येणार करोनाची चौथी लाट, यावेळी ‘ही’ 10 लक्षणं माजवणार कहर!)

फोर्टिफाइड मिल्क

हे दूध सामान्य दुधापेक्षा थोडे वेगळे असते. त्यात व्हिटॅमिन डी वेगळे जोडले जाते. 2011 च्या अभ्यासानुसार, व्हिटॅमिन डी पुरुषांमधील टेस्टोस्टेरॉनची पातळी वाढवू शकते. तथापि, व्हिटॅमिन डी मिळविण्यासाठी आपल्याला सूर्यप्रकाशात जावे लागते. याशिवाय तुम्ही सोया मिल्क आणि दुग्धजन्य पदार्थांचे सेवन करून देखील व्हिटॅमिन डी मिळवू शकता.

(वाचा :- Weight Loss : वयाच्या 22 व्या वर्षी या मुलाचे वजन तब्बल 137 किलोवर पोहचले, काहीच दिवसांत ‘ही’ ट्रिक वापरून घटवलं 63 किलो वजन..!)

कच्चा कांदा

जेवणासोबत सॅलडच्या स्वरूपात कच्चा कांदा भरपूर प्रमाणात खावा. हृदय निरोगी ठेवण्यापासून कंबर स्लिम-ट्रिम करण्यापर्यंत कांद्याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. कांद्यामध्ये अनेक पोषक तत्व आणि अँटिऑक्सिडंट्स आढळतात. 2012 च्या अभ्यासात, संशोधकांना असे आढळून आले की चार आठवडे कांद्याचे सेवन केल्याने एकूण टेस्टोस्टेरॉनच्या पातळीत लक्षणीय सुधारणा होते.

(वाचा :- महागड्या डाएट प्लान आणि जिमला करा बाय बाय, CDC ने सांगितलेले ‘हे’ 4 उपाय करा, झटक्यात कमी होईल वजन!)

हेही वाचा :  'आता दगडींच्या बदल्यात हा निलेश राणे....' गुहागरच्या सभेत भास्कर जाधवांना खुले आव्हान

डार्क चॉकलेट

तुम्हाला कदाचित माहित असेल की डार्क चॉकलेटमध्ये अँटीऑक्सिडंटचे प्रमाण जास्त असते. ते हृदयाच्या आरोग्यासाठी देखील खूप फायदेशीर आहे. परंतु त्याचवेळी ते तुम्हाला बेडवर देखील चांगली पॉवर दाखवण्यास मदत करू शकते. यामध्ये असलेले फ्लेव्हनॉल्स रक्तप्रवाह वाढविण्यात मदत करतात, ज्यामुळे पुरुषांना इरेक्टाइल डिसफंक्शन किंवा ईडीपासून मुक्त होण्यास मदत होते. यासाठी किमान 60 टक्के कोकोसह बनवलेले डार्क चॉकलेट खावे.

(वाचा :- Weight loss hacks : भात शिजवताना टोपात एक चमचा ‘ही’ एक गोष्ट घाला, आपोआप गळून पडेल संपूर्ण शरीरावरची चरबी..!)

फळे

संशोधक म्हणतात की अधिकाधिक फळे खाल्ल्याने इरेक्टाइल डिसफंक्शनचा धोका 14% कमी होतो. याचे कारण म्हणजे काही फळांमध्ये फ्लेव्होनॉइड्सचे प्रमाण जास्त असते. बेरीज, द्राक्षे, सफरचंद आणि लिंबूवर्गीय फळे यासारख्या फळांमध्ये फ्लेव्होनॉइड्स भरपूर प्रमाणात असतात. टरबूज देखील इरेक्शन सुधारू शकते आणि तुमची कामवासना (Libido) वाढवू शकते, कारण त्यात सिट्रुलीन असते जे शरीरात आर्जिनिनसारखे अमीनो ऍसिड सोडते. याव्यतिरिक्त, बीटमध्ये उच्च प्रमाणात अँटिऑक्सिडंट्स (Antioxidants), जीवनसत्त्वे आणि नायट्रेट्स (Vitamins and nitrates) असतात, जे सेक्शुअल परफॉर्मन्सला प्रोत्साहन देऊ शकतात. बीटच्या रसातील आहारातील नायट्रेट्स सेक्स दरम्यान रक्तप्रवाह आणि स्टॅमिना (Blood flow and stamina) सुधारू शकतात.

(वाचा :- Bad Habits : विषासमान आहेत तुमच्या सकाळच्या या 5 सवयी, लवकरात लवकर बदला अन्यथा धोक्यात येईल आयुष्य..!)

हेही वाचा :  Lalu Prasad Yadav health : लालू प्रसाद यादव आहेत ‘या’ 8 भयंकर आजारांनी ग्रस्त, अवस्था झालीये गंभीर, करावं लागलं हॉस्पिटलमध्ये भरती..!

नट्स व बिया

बदाम (Almonds), अक्रोड (Walnuts), काजू (Cashews), शेंगदाणे (Hazelnuts) यांसारख्या विविध नट्स आणि बियांमध्ये झिंक आणि ऍग्रिनिनचे प्रमाण जास्त असते. ड्रायफ्रूट्समधील अक्रोड विशेषतः खूप फायदेशीर आहेत कारण त्यात ओमेगा -3 फॅटी ऍसिड भरपूर प्रमाणात असतात. याव्यतिरिक्त अक्रोड शुक्राणूंची गुणवत्ता सुधारू शकतात त्यामुळे ते पुरुषांची प्रजनन क्षमता सुधारू शकतात.

(वाचा :- Weight loss drink : अगदी वेगाने गळून पडेल संपूर्ण शरीरावरची चरबी, फक्त सकाळी रिकाम्या पोटी प्या एक ग्लास या पदार्थाचं पाणी!)

टीप : हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. हे कोणत्याही प्रकारे कोणत्याही औषधाचा किंवा उपचारांचा पर्याय असू शकत नाही. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधावा.

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

पत्नीचं हॉस्पिटलचं बिल पाहून पतीचं धक्कादायक कृत्य, थेट ICU मध्ये गेला अन्…

पतीने रुग्णालयातच पत्नीची गळा दाबून निर्घृणपणे हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अमेरिकेत हा …

बारामतीमध्ये सर्वात मोठा ट्विस्ट, मतदान सुरु असतानाच सुप्रिया सुळे अजित पवारांच्या घरी

Loksabha 2024 Baramati : लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यासाठी आज मतदान पार पडतंय. राज्यातील अकरा मतदारसंघात …