‘आता दगडींच्या बदल्यात हा निलेश राणे….’ गुहागरच्या सभेत भास्कर जाधवांना खुले आव्हान

Nilesh Rane On Bhaskar Jadhav: भास्कर जाधव यांचा एक दिवस भंगार नक्की करणार, असे निलेश राणे म्हणाले. गुहागरच्या सभेच त्यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांच्यावर टीका केली. काही वेळापुर्वीच चिपळूणमध्ये उद्धव ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव आणि निलेश राणे यांचे समर्थक भिडले. दोन्ही बाजूंकडून एकमेकांवर दगडफेक करण्यात आली आहे. यावेळी निलेश राणेंच्या गाडीवर दगडफेक करण्यात आल्याचे बोलले जाते. या पार्श्वभूमीवर निलेश राणेंनी भास्कर जाधवांवर ही टीका केली.  

सभेची गरज होती असं मला वाटत नाही. पण उबाठा गटाचे गटप्रमुख उद्धव ठाकरे सिंधुदुर्गात आले. कणकवलीला त्यांची सभा झाली.  उद्धव ठाकरेंच्या सभेत भास्कर जाधव नको नको ते बोलले. निलेश राणेला काहीही चालत पण राणे साहेबांना वेड वाकडं बोलायचं नाही. आमच्या नेत्याला वेड वाकडं बोलायचं नाही, असे यावेळी निलेश राणे म्हणले. 

बाळासाहेब बोलले असा उल्लेख भास्कर जाधव करतात पण त्यांना मातोश्रीमध्ये थारा नव्हता, असे ते यावेळी म्हणाले. ठाकरे, पवारांना आम्ही घाबरलो नाही. मुंबईत राहतो, मातोश्रीच्या बाहेरुन रॅली काढतो. कोणाच्या बापाने काय केलं नाही, असे राणे म्हणाले.  

हेही वाचा :  पहिला बालदिन कधी साजरा केला, 14 नोव्हेंबरलाच का होतो बालदिन साजरा, जाणून घ्या!

लांबून काय दगडी मारतो समोर ये. सरळमार्गाने आम्ही जात होतो. हा पोलिसांच्या मागे. पोपटी रंगाचे शर्ट घातला होता. आधी पोलिसांच्या गराड्याच्या मागे. नंतर महिलांच्या मागे. दोन-चार दगड मारले असतील. आता दगडींच्या बदल्यात निलेश राणे काय पाठवणारेय हे लक्षात ठेव बघ…तू नख लावलयस आम्हाला…मोजून शंभर लोक होते.

तूला शेजारी बसवायला बाळासाहेबांचे वाईट दिवस नव्हते. नारायण राणेंनी बाळासाहेबांवर इतकं प्रेम केलं त्याच्या 25 टक्के प्रेमही तू केलं नसशील, असे ते भास्कर जाधवांना म्हणाले.  

आमच्या शेपटीवर पाय ठेवलास. या जन्मात तुला विसरणार नाही असे ते म्हणाले.
भास्कर जाधव यांची चिपळूणची भाईगिरी याच निलेश राणेंनी संपवली होती, असे ते म्हणाले. भास्कर जाधव यांचा एक दिवस भंगार नक्की करणार, असेही ते यावेळी म्हणाले. 

उद्धव ठाकरेंच्या सभेत भास्कर जाधव नको नको ते बोलले. निलेश राणेला काहीही चालत पण राणे साहेबांना वेड वाकडं बोलायचं नाही. आमच्या नेत्याला वेड वाकडं बोलायचं नाही, असे ते म्हणाले. 

काय आहे प्रकरण?

उद्धव ठाकरेंची सिंधुदूर्ग जिल्ह्यात सभा पार पडली होती. या सभेत भास्कर जाधव यांनी राणे कुटुंबावर जहरी टीका केली होती. निलेश राणे यांनी भास्कर जाधव यांच्या टीकेला उत्तर देत आव्हानही दिलं होतं. गुहागरमध्ये येऊन मी जशास तसं उत्तर देईन असा इशारा त्यांनी दिला होता. त्यानुसार आज निलेश राणे यांची सभा आज आयोजित होती. या सभेला ते जात असतानाच हा राडा झाला आहे. पोलिसांनी दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला असून, परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न आहे. तसंच वाहतूक विस्कळीत झाली असून तीदेखील सुरळीत करण्याचा प्रयत्न सुरु आहे. 

हेही वाचा :  LokSabha: ...जेव्हा विरोधकांच्या महारॅलीला उत्तर देण्यासाठी सरकारने दूरदर्शनवर लावला 'बॉबी' चित्रपट, पुढे काय झालं?



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

‘आनंद दिघेंच्या निधनानंतर उद्धव ठाकरेंनी त्यांच्या संपत्तीची…’, CM एकनाथ शिंदेंचा गौप्यस्फोट

Eknath Shinde on Uddhav Thackeray: धर्मवीर आनंद दिघे (Anand Dighe) यांच्या निधनानंतर मी उद्धव ठाकरेंना …

Godrej Family Tree : लहानपणी तुमच्याही घरात असेल या कंपनीचे कपाट, आता 14 लाख कोटींची कंपनी

देशातील सर्वात जुन्या कुटुंबांपैकी एक असलेले गोदरेज कुटुंब आज तब्बल 127 वर्षांनंतर विभक्त होणार आहे. …