डायबिटीज किंवा ब्लड शुगर रूग्णांनी दूध पिणं सुरक्षित आहे? शास्त्रज्ञांनी दिलं सायंटिफिक उत्तर

Diabetes च्या रुग्णांना सगळ्यात जास्त काळजी घ्यावी लागते ती आपल्या आहाराची! सकस आहार अर्थता हेल्दी डाएट घेतल्यास मधुमेहामुळे होणाऱ्या अनेक समस्या आणि त्रास टाळता येतात. Healthy Diet म्हणजे ज्यात फॅट कमी आणि फायबर जास्त असते. असा आहार घेतल्यास Blood Sugar वाढण्यापासून रोखता येते. मधुमेहाच्या रुग्णांना सामान्यत: कमी GI असलेले अन्न खाण्याचा सल्ला दिला जातो ज्यामुळे त्यांना रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यात मदत होते. विविध प्रकारचे धान्य, हिरव्या पालेभाज्या, लीन प्रोटिन्स, नट्स आणि विविध फळांच्या बिया हे सर्व पदार्थ डायबिटीजच्या रूग्णांसाठी चांगले मानले जातात.

पण तरी काही लोकांना शंका आहे की दुग्धजन्य पदार्थ अर्थात Dairy Products डायबिटीजच्या रुग्णांसाठी योग्य आहेत की नाही? सर्वाधिक प्रश्न तर हा विचारला जातो की, दूध हे डायबिटीजच्या रुग्णांनी प्यावे का? तर मंडळी, दुधामध्ये फॅट असते, ज्यामुळे रक्तातील साखरेची पातळी वाढू शकते, परंतु त्यामध्ये प्रथिने, कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डी यासारखे महत्त्वाचे पोषक घटक देखील असतात जे अनेक आजार पळवून लावतात. चला जाणून घेऊया डायबिटीजच्या रुग्णांसाठी दूध हा योग्य पर्याय आहे की नाही? (फोटो सौजन्य :- iStock)

हेही वाचा :  किचनमधील या १० गोष्टींनी डायबिटिस ठेवा कंट्रोलमध्ये, आयुर्वेदिक उपाय ठरतोय फायदेशीर

फॅट नसणारे दूध आहे उत्तम

फॅट नसणारे दूध आहे उत्तम

diabetes.org.uk वरील रिपोर्टनुसार, दूध हा एक परिपूर्ण द्रव पदार्थ आहे आणि जर डायबिटीजच्या रुग्णांना दूध प्यायचे असेल तर त्यांनी फॅट नसलेले दूध प्यावे. तसेच, प्रत्येक व्यक्तीच्या शरीराची स्थिती वेगळी असते, म्हणून दुधाचे सेवन केल्यानंतर मधुमेहाच्या रुग्णाने आपल्या रक्तातील साखरेच्या प्रमाणाचे निरीक्षण केले पाहिजे आणि ते किती वाढले ते पाहावे आणि त्यानुसार दूध पिण्याचा वा न पिण्याचा निर्णय घ्यावा.
(वाचा :- लिव्हरच्या भयंकर आजाराने गेला प्रसिद्ध इंडियन कॉमेडियन व Tv Host चा जीव, आजच खायचं बंद करा हे 7 पदार्थ नाहीतर)​

दूध प्यायल्याने मधुमेह होतो का?

दूध प्यायल्याने मधुमेह होतो का?

दुधामुळे मधुमेह होऊ शकतो किंवा मधुमेह वाढतो याचा कोणताही पुरावा नाही. टाइप 2 मधुमेह असलेल्या लोकांसाठी दूध हे फायदेशीर असू शकते. विशेषतः गरोदर महिला आणि वाढत्या मुलांसाठी दूध हे कॅल्शियमचा खूप चांगला स्रोत आहे. त्यामुळे दूध प्यावे.
(वाचा :- Belly Fat Burn : पोटाची लटकणारी चरबी जाळून मिळवायचंय सपाट पोट व आकर्षक फिगर? मीठ खाताना करा हे काम व बघा कमाल)​

हेही वाचा :  शास्त्रज्ञांचा शोध - हाडांचा भुगा होऊ नये म्हणून Vitamin D नाही ही 1 गोष्ट खाणं गरजेची, प्रत्येक घरी सहज मिळते

मधुमेहाच्या रुग्णांसाठी किती दूध चांगले आहे?

मधुमेहाच्या रुग्णांसाठी किती दूध  चांगले आहे?

जर तुम्ही डायबिटीजचे रुग्ण असाल तर तुम्ही रोज एक ग्लास दूध प्यावे. जरी तुम्ही डायबिटीजचे रूग्ण नसाल तरीही तुम्ही एक ग्लासपेक्षा जास्त दूध अजिबात पिऊ नये. डायबिटीज ऑर्गनायझेशनचा असा दावा आहे की, तुम्ही 190 ML पेक्षा जास्त दूध पिऊ नये. याव्यतिरिक्त, ज्या लोकांना लॅक्टोजची एलर्जी आहे आणि त्यांनी दुग्धजन्य पदार्थ खाल्ले तर त्यांना जुलाबाची समस्या सतावू शकते.

(वाचा :- Mental Health : स्ट्रेस व डिप्रेशन पहिल्या स्टेजचे मानसिक आजार, त्याहीपेक्षा या 8 गोष्टी करतात आयुष्य उद्धवस्त)​

दुधाशिवाय अन्य दुग्धजन्य उत्पादने फायद्याची आहेत का?

दुधाशिवाय अन्य दुग्धजन्य उत्पादने फायद्याची आहेत का?

दूध आणि इतर दुग्धजन्य पदार्थांमध्ये सामान्यतः कमी ग्लायसेमिक इंडेक्स (GI) असतो. दुधात नैसर्गिक साखर असते आणि ते प्रथिनांचा उत्तम स्रोत आहे. यामुळेच दूध प्यायल्याने पोट भरते आणि रक्तातील साखर वाढत नाही. दूध आणि इतर दुग्धजन्य पदार्थांचा कमी ग्लायसेमिक इंडेक्स सूचित करतो की ही उत्पादने तुमच्यासाठी उत्तम आणि आरोग्यदायी पर्याय आहेत.
(वाचा :- Weight Loss Food : हे 8 पदार्थ मनसोक्त खाल्ले तरी वाढणार नाही टिचभरही वजन, 40 पेक्षाही कमी कॅलरीने भरलेत ठासून)​

हेही वाचा :  Blood Sugar कंट्रोल करतील हे गावटी रोपं, अगदी फुल, पानं आणि खोड सगळंच गुणकारी, खर्च अवघा २५ रुपये

मधुमेहाच्या रुग्णांनी दूध पिणे आहे फायद्याचे

मधुमेहाच्या रुग्णांनी दूध पिणे आहे फायद्याचे

तज्ज्ञांचा असा विश्वास आहे की मधुमेहाच्या रुग्णांसाठी दूध खरोखरच फायदेशीर आहे परंतु आपण हे लक्षात ठेवले पाहिजे की तुम्ही त्यात अतिरिक्त साखर घालू नये आणि फुल क्रीम दूध पिणे टाळावे.
(वाचा :- Cancer Fever Symptoms : ज्याला तुम्ही साधारण ताप समजत आहात तो असू शकतो कॅन्सरचा ताप, या 5 लक्षणांवरून ओळखा..!)​
टीप : हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी असून यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. अधिक जास्त माहितीसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य ते बदल करा

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

‘माझ्याकडे चीप..ईव्हीएम हॅक करतो’ दीड कोटींचा सौदा; धक्कादायक कहाणी

EVM Machine Hack call: देशभरात लोकसभा निवडणुकीसाठी मतदान सुरु आहे.  ईव्हीएम मशिनच्या माध्यमातून हे मतदान …

पत्नीचं हॉस्पिटलचं बिल पाहून पतीचं धक्कादायक कृत्य, थेट ICU मध्ये गेला अन्…

पतीने रुग्णालयातच पत्नीची गळा दाबून निर्घृणपणे हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अमेरिकेत हा …