डायबिटीज, ब्लड प्रेशर, खराब कोलेस्ट्रॉल शरीराबाहेर फेकण्यासाठी खा हे 5 पदार्थ, चहा-कॉफीला चुकूनही लावू नका हात

बहुतेक लोकांना सकाळी उठल्याबरोबर कॉफी पिण्याची सवय असते. अशा या कॉफीत मुख्य घटक कॅफिन असतो, जो की कॉफी पावडरमध्ये मोठ्या प्रमाणात आढळतो. त्याचे अतिसेवन हाय कोलेस्टेरॉलसोबतच अनेक गंभीर आजारांचे मूळ कारण बनू शकतो.हार्वर्डच्या मते, कॉफी पिण्याआधी पेपर फिल्टरद्वारे गाळून घेतली पाहिजे. कारण, त्यात अशी संयुगे असतात जी खराब कोलेस्ट्रॉल वाढवण्यास कारणीभूत ठरू शकतात आणि नसा ब्लॉक करू शकतात.

न्यूट्रिशनिस्ट मनोली मेहता यांनी कॉफीऐवजी अन्य 5 पदार्थ खाण्याचा सल्ला दिला आहे, जे कॉफीपेक्षा अधिक हेल्दी आहेत आणि शरीराला सकाळी सकाळी एनर्जी सुद्धा देतात. यामुळे तुम्हाला कॉफी पिण्याची गरज भासत नाही आणि कॉफीच्या शरीरावर होणाऱ्या नुकसानांपासून सुद्धा तुम्ही वाचू शकता. (फोटो सौजन्य :- iStock)

खजूर

खजूर

खजूरांमध्ये नैसर्गिक साखर असते, जी लगेच शरीराची ऊर्जेची पातळी वाढवण्यास मदत करते. त्यामुळे, सुस्तीपासून मुक्त मिळवण्यासाठी तुम्ही कॉफीऐवजी मूठभर खजूर नक्की खाऊ शकता. जर तुम्हाला खजूर आवडत नसतील तर ही एक तुमची मोठी चूक सुद्धा ठरू शकते कारण खजूरचे असे काही फायदे आहेत हे तुमच्या शरीराला अगदी सुपरफिट ठेवू शकतात.

हेही वाचा :  अन् जसप्रीत झाली जैनब, भारतीय तरुणीने इस्लाम स्विकारत पाकिस्तानी प्रियकराशी केला निकाह

(वाचा :- मुळव्याध, पोट साफ न होणं, डायबिटीज यासारखे शरीर आतून पोखरणारे तब्बल 20 भयंकर आजार मुळापासून उपटतात या 6 गोष्टी)​

लिंबू आणि पुदिन्याचं पाणी

लिंबू आणि पुदिन्याचं पाणी

लिंबू आणि पुदिन्याचे पाणी प्यायल्याने फ्रेशनेस किंवा ताजेतवाणेपणा जाणवतो. यासोबतच एनर्जी कमी करणाऱ्या डिहायड्रेशनपासूनही आराम मिळतो. त्यामध्ये तुम्ही किवी, सफरचंद किंवा काकडी देखील टाकू शकता. यामुळे तुमच्या ड्रिंकची चव वाढेल आणि तुम्हाला या फळांचे पोषक घटक सुद्धा याच ड्रिंकमधून सकाळी सकाळीच मिळतील.

(वाचा :- 2023 Budget – खनिज व व्हिटॅमिनचं भांडार आहेत हे पदार्थ, रोज खाल्ले तर वयाच्या 60 नंतरही होणार नाहीत गंभीर आजार)​

संत्री

संत्री

संत्र्यामध्ये भरपूर व्हिटॅमिन-सी आणि एनर्जी असते. त्यामुळे कॉफीऐवजी तुम्ही या फळाचे सेवन करू शकता. संत्र्यामध्ये फॉस्फरस, खनिजे आणि फायबर देखील असतात, जे शरीराच्या चांगल्या कार्यासाठी आवश्यक असतात.

(वाचा :- शास्त्रज्ञांचा शोध – हाडांचा भुगा होऊ नये म्हणून Vitamin D नाही ही 1 गोष्ट खाणं गरजेची, प्रत्येक घरी सहज मिळते)​

बदाम

बदाम

बदाम हे उच्च प्रथिनेयुक्त फूड आहे, जे हेल्दी फॅटसह फायबर सुद्धा उच्च प्रमाणात प्रदान करते. या ड्रायफ्रूटमधील व्हिटॅमिन बी हे शरीराला ऊर्जा देण्यास मदत करते आणि यातील मॅग्नेशियम हे स्नायूंचा थकवा टाळते. त्यामुळे मंडळी म्हणूनच तुम्ही बदाम हे अवश्य खाल्ले पाहिजेत.

हेही वाचा :  तहानभूक विसरून मराठ्यांसाठी संघर्ष करणारे मनोज जरांगे आहेत तरी कोण?

(वाचा :- आरोग्य मंत्र्याला गोळी झाडून ठार करणा-या पोलिसाला हा भयंकर आजार, हे रूग्ण छोट्याशा गोष्टीसाठी करतात थेट हत्या)​

भाजलेले तीळ

भाजलेले तीळ

एनर्जी मिळवण्यासाठी कॉफीऐवजी तुम्ही सकाळी सकाळी भाजलेले तीळही खाऊ शकतात. त्यात हेल्दी फॅट आणि ओमेगा -6 असते, जे थकवा आणि आळशीपणाशी लढण्यास मदत करते. तर मंडळी सकाळ सकाळ कॉफी पीत असाल र काही काळासाठी ती कॉफी थांबवून आम्ही सांगितलेले हे फूड ऑप्शन ट्राय करा. तुम्हाला फरक नक्की दिसेल.

(वाचा :- आतड्यातील विषारी घाण झटक्यात काढून फेकतात हे 5 पदार्थ, गॅस, अपचन, पोट साफ न होणं सर्व समस्यांचा उपाय किचनमध्ये)

टीप : हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी असून यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. अधिक जास्त माहितीसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य ते बदल करा.

कॉफीऐवजी खा या 5 गोष्टी



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

राज ठाकरे खरंच दुपारी झोपेतून उठतात का? स्वत: खुलासा करत म्हणाले, ‘माझ्याबद्दल…’

Raj Thackeray Morning Wake Up Time: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे सध्या त्यांनी लोकसभा …

महाराष्ट्रातले उद्योगधंदे गुजरातला कसे गेले? राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंना सवाल

Raj Thackeray Kankavli Slams Uddhav Over His Comment On Gujrat: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी …